विधवा कुमारी | Vidhavaa Kumaari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vidhavaa Kumaari by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) ही कोकणची मनोभूमि आजच्या पिढीच्या फारशी परिचियाची नाहीं. पूर्वीच्या काळीं पुष्कळांना तिचा परिचिय होता, पण साहित्याच्या क्षेत्रांत कॉकणची दखल घेतली जात नव्हती, आजसुद्धा, आजच्या युगाचे एकमेव कादंबरीकार श्री. ना. पेंडसे या सिद्धहस्त लेखकाखेरीज, कोकणचे निदर्शन कथासाहित्यांतून सहसा कोणी केलेलें नाहीं. दक्षिण कोकणच्या कांहीं कथा वि. स. खांडेकर आणि ना. ग. गोरे यांनीं लिहिल्या आहेत खऱ्या, पण त्या लघुकथा आहेत. “दोन ध्रुव” या कादं- बरीचे कार्यक्षेत्र दक्षिण कोंकणांतच दाखविलें गेले आहे, पण दक्षिण कोकणची मनोटृत्ती आणि वातावरण तींत पुरेसे आलेले नाहीं, दक्षिण कोंकण आणि उत्तर कोंकण-विद्येषतः रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग-यांच्या संस्कृतींत आणि मनोटृत्तींत बराचसा फरक आहे. प्रस्तुत कथाही त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागांतील-म्हणजे चिपळूण तालुक्यांतील आहे. लोकमान्यांची माठृभूमि असलेल्या या तालकक्‍्याचें ऐतिहासिक महत्त्व त्या काळांत फार मोठें मानले जात होतें, चिपळूण आणि दापोली या दोन तालुक्यांत जन्मलेल्या व्यक्तीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांत महान ठरल्या होत्या आणि याचा अभिमान या दोन तालुक्यांतील लोकही मोठ्या अभिमानाने मिरवीत असत, आज नांव होत आंहे पुण्याचं, पण चिपळूण दापोली तालुके सर्वांच्याच नजरेभाड' झाले आहेत. लहानपणापासून मला हरिभाऊंच्या कादंबऱ्यांचे मोठे वेड होतें. करमणूक साताहिकांतून त्या क्रमशः प्रसिद्ध होत असतांना मी आधाशासारखा त्या वाचीत असें, हरिभाऊंच्या त्या लेखनद्ोलीप्रमाणेंच त्यांच्या विशिष्ट रृष्टी- कोणाचा माझ्यावर जो फार मोठा परिणाम झाला होता, त्याचा परिणाम प्रस्तुत कादंबरीवर दिसणें अपरिहार्य होतें. प्रस्तुत कर्थेतील कांहीं कांहीं प्रसंग या विशिष्ट कालखंडांतील परिस्थितीचे द्योतक आहेत. मथू पहिल्यानेंच आपल्या सासरीं आली त्याचवेळीं लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला होता-म्हणजे १८९७ सालीं ती सुमारें बाय वर्षांची होती. हा काल ध्यानीं घेतला म्हणज त्या वेळची सांस्कातिक परिस्थिती कोणत्या प्रकारची होती याची कल्पना करतां येईल, महर्षि कर्वे यांच्या कार्याला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now