रावराजे सर दिनकरराव राजवाडे | Ravraje Sir Dinakarraw Biography

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रावराजे सर दिनकरराव राजवाडे  - Ravraje Sir Dinakarraw Biography

More Information About Author :

No Information available about विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok

Add Infomation AboutVinayak Kondadev Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग पहिला. डे वाटत असतो; आणि त्यास त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. अशा दोन पक्षांची सेवा करून त्यांस संतुष्ट ठेवणें हें कर्म परम दुष्कर आहे. ह्मणजे सिंह आणि व्याघ्र ह्या दो- घांची सेवा एकदम एकाग्रतेने करून त्यांस संतुष्ट ठेवणें, हें एक वेळ माणसाला कदाचित्‌ सुकर जाईल. कां कीं, ते कसे झाले तरी पशु, तेव्हां, युक्तिप्रयुक्तीनें, एकादे वेळेस तरी त्यांस झकवितां येईल. परंतु, राजा आणि प्रजा ह्यांच्या सेवेत तस कांहीं चालावयाचे नाहीं. कां कीं, त्यांची उभयतांची दृष्टि एकसारखी कुशाग्र असते. ह्मणून, हें तरत अगदीं प्रखर दुधारी तरवारीसारखें आहे. तें अगदीं नीट चालवायास पाहिजे. त्यांत तिळमात्र अंतर पडलें कीं ते कोपास आणि नाशास कारण व्हावयाचें. त्यांते कधीं चूक पडावया'ची नाहीं. इतकें हें व्रत अतिशयित कठिण आहे, तरी त॑ उत्तम रीतीनें साधून यशस्वी होणारीं--ह्मणजे उभयतांची सेवा करून उभयतांकडून शाबास शाबास आणि धन्य घन्य ह्मणवून घे- ण्यास समर्थ-माणसे एथ्वीच्या पाठीवर उत्पन्न होत असतात. तीं अगदीं थोडीं “वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा” अशीं असतात. परंतु, एका चंद्राने जशी सगळ्या आकाशाला शोभा येते, तशी अशा प्रकारच्या माणसांची वृत्ति त्यांच्या सगळ्या राष्ट्रास अत्यंत लाभदायक आणि अत्यंत भूषणावह द्रोते. आणखी, कोकिळेला मधुरस्वर प्राप्त होण्यास अथवा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now