रम्य रात्री | Ramy Raatrii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रम्य रात्री  - Ramy Raatrii

More Information About Author :

No Information available about रघुनाथ वामन दिघे - Raghunath Vaman Dighe

Add Infomation AboutRaghunath Vaman Dighe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गनीम ९ पण मला तेथ तीन महिन्यांत ञज पाहावयाला मिळार्ल त्याच मी ह बाचकां- कारितां वर्णन करीत आहें. माझी स्हिस जरी मिलिटरींत निरनिराळ्या कमान्डस्‌मध्ये झाली असली तरी माझी नोकरीची बरींचशीं वर्षे पुण्यास गेली होतीं. पुण्याची हवा मला फार मानवे. शिवाय पुण्यास माझे स्नेही-सोबती पुष्कळ होते. म्हाप्रळ सोडून पुण्यास येण्याचे हद एक दुसरे कारण होतें, या तीन महिन्यांत मला. माझे ओळखीचे म्हातारे पेन्शनर किती तरी भेटले, त्यांतले कोणी मला आपल्या बर्‍या न होणाऱ्या रोगाचे वर्णन सांगून त्याची बिनाखी करा- वयास सांगत; तर कोणी मला मुनसफ समजून पेनशनवरून होणाऱ्या घरां- तील भांडणांच्या हकीकती सांगत, किंबा वांटपावरून होणाऱ्या मारा- माऱयांचीं वर्णन करीत; कोणी मला त्यांच्या त्रासिक झालेल्या तिसऱ्या कुटुंबाच्या मनःस्थितीची परीक्षा करावयास सांगत, तर कोणी माझे कानां्शी लागून ओकासाच्या गुणावयुणांची चचचा करीत, सर्वच पेनश्ननर वर वर्णन केल्याप्रमाणे नव्हते, त्यांतील कांही प्रामाणिकपणा व निःस्एहता या दोन गुणांमुळे सरकारच्या मर्जीतून उतरलेले वब बढतीस मुकलेले होते; तर कांहींना पांढरे केस खरोखरच खुलून दिसत होते, एका पेनशनरबद्दल तर मला फारच कौतुक वाटे, तो माझेआधीं पेनशन घेऊन जाई. मी धरीं परत येतांना तो बुधवारांत नातवंडांकारेतां खाऊच्या पुड्या विकत घेतांना दिसे, याप्रमाणे मी पेनशनरांचे ओळींत नित्याप्रमाणें त्यांच्या स्वभावांचे निरीक्षण करीत उभा राहिलों, सुभेदार माझ्या मागोमाग उभा होताच, आम्ही दोघे पेनशन घऊन कांपौंडांत नोटा मोजीत उभे राहिलों. इत- क्यांत एक अठरा एकोणीस वर्षांचा गोरापान जवान तरुण एक नवी कोरी सायकल हातांत घेऊन सुभेदारापाशीं येऊन उभा राहिला, त्याच शरीर भरदार होतें, त्याची कांति तेजस्वी होती, तो अतिशय देखणा होता. तो अतिशय बळकट व चपळ दिसत होता. तो “राजबिंडा? या पदवीला योग्य होता. त्याचें हास्य सुमधुर होतें. त्याला पाहिल्याबरोबर त्याचेविषर्यी माझे मनांत स्नेहभाव उत्पन्न झाला, मला वाटलें, जांवई असावा तर असा, “ हरिश्चंद्र, हे घे पैसे आणि तुला पाहिजे तं फूलपान, फळफळावळ व मेवामिठाई आण, ?”? सुभेदार त्याला म्हणाले,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now