माळती माधव नाटक | Malati Madhav Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Malati Madhav Natak by कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

More Information About Author :

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१9 मालतीमाधव. आपण येथेच गोष्टी सांगत बसूं, असें ह्मणून लवंगिका व बुद्धरक्षिता ह्यांनी सदयंतिकेजवळ हळूच मकरंदाची गोष्ट काढली. मदयंतिका विश्वासानें आपल्या हितगुजाच्या गोष्टी सांगूं लागली असतां त्यांनीं तिला विचारिलें कीं, 'मकरंदावर आपलें प्रेम इतकें आहे ह्मणून तूं सांगतेस, पण मकरंद ह्यावेळी येथें येऊन पाणिग्रहण करण्याविषयी बोलूं. लागल्यास तं. होय ह्यणशील १? मदयंतिकेनें “होय ह्मणेन,' असें भावार्थांनें उत्तर दिलें. त ऐकतांच मकरंदानें यलंगावरून उठून तिला ओळख दिली. नंतर त्या सर्वांचा कामंदकीच्या मठांत जाण्याचा विचार ठरून तीं तिकडे चालती झालीं. तीं जात असतां वाटेनें शहरच्या रखवालदारांनीं त्यांनां अटकाव केला. त्या घालमेलींत, एका चाकराबरोबर त्या सर्व ख्रियांस कामंदकीच्या मठाकडे लावून देऊन, मकरंद रखवालदाराशीं मारामारी करित राहिला. ल्या स्रिया योहोंचल्यावर आपला मित्र मारामारीत सांपडला आहे, ही बातमी कळतांच माधव मोठ्या त्वरेचें त्याच्या साह्यास आला. व्या दोघांनीं मोठा पराक्रम करून रखवालदारांचा पराभव केला. ही बातमी राजाला कळल्यावरून, त्यानें त्यांस बोलावून नेलें, व त्यांची हकीगत ऐकून व त्यांचा पराक्रम पाहून त्यांच्यावर राजा प्रसन्न झाला आणि द्यांनीं पराक्रमाने जिंकिलेल्या कन्यांचीं लग्न करण्याची त्यांनां परवानगी दिली. र परंतु इकडे मालती, मद्यंतिका, वुड्धरक्षिता व लवंगिका, कामंदकीच्या मठांत असतां कोणी कांहीं कामासाठीं तर कोणी दुसऱ्या कामासाठीं अशा जाऊन मालती मात्र एकटी उरली होती. अघोरघंटाची शिष्यीण कपालकुंडला, आपल्या उर्तच्या वघाबद्दल सूड उगवण्याकरितां संधि पाहतच होती. तिनें मालतीला एकटी गांठून तिला बलात्काराने उचळून मंत्रसामर्थ्यानें आकाशमार्गानें श्रीपर्वतावर नेलें. तेथें ती मालतीचा घात करणार होती, परंतु त्याच पर्वतावर सौदामिनी ह्यणून कामंदकीची एक पुरातन शिष्यीण तपश्चर्या करित होती, तिला ती गोष्ट कळून तिनें त्या दुष्ट कपाळकुंडळेपासून मालतीला सोडविळें. . इकडे माधव व मकरंद राजवाड्यांतून मोठ्या हर्षीनें परत येऊन पाहतात, तों मालती नाहीं. पुढें शोध करतां तिचा कांहींच थांग लागेना. मग शोकाने वेडा होऊन माधव वनांत फिरूं लागला व मकरंद मित्रत्वासुळें त्याजबरोबर असे. ते दोघे शोक करित असतां, माधवाला मूछी येऊन तो निक्चेष्ट पडला.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now