तुडवळेळें घर कुळ | Tudavalelen Gharakul

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
10 MB
                  Total Pages : 
177
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तुहवललें घरकुल रे
तोडण्याचा प्रसंग निर्माण झाला. बनविहारींची पत्ती हरिमती आपल्या
तृतीय कन्यकेला, मणालिनीला केरसुणीनें बडवीत आंत येऊन पोंचली.
वय अंदाजें अडतीस, किडकिडी'त बांधा, गौरवर्ण, समोरचे दांत पुढे आलेले,
लांब सडक नाक, नेहमी मलेरियाच्या कृपेमुळे आजारीपण' सुरू, त्यामुळें
गौरवर्णावर पिवळ्या रंगानें आपला शिक्का उमटविलेला, अशी हरिमती
आणि वय तेरा वर्षे, शरीराचा बांधा दरे सर्व आईसारखेंच, अशी मृणा-
लिनी, हीं सुरू झालेल्या प्रवेद्यांतील पात्रे.
आंत आल्यावरही केरसुणीचे रट्टे सुरू ठेवीत हरिमती म्हणालो, *थांब !
आज तुझी पाठ फोडूनच काढतें! तुझी धडगत नाहीं आतां! कारटे !
सांग ! कां गेली' होतीस बसूंकडे ? तीं पोरटीं रसगृल्ले खात होतीं बोटे
चाटीत, तर कां त्यांच्या तोंडाकडे टुकत बघत बसलीस ? कां बसलीस
सांग. *
तडाखे चुकवीत आणि रडत मृणालिनीनें आपली कफियत मांडली, 'मी
गेलें होतें का आपण होऊन ? उल्कीनेंच तर बोलविलें होतें मला ! '
* नाहीं, पण तूं कां गेलीस या वेळीं? हजारदां सांगितलें तुम्हांला,
लोकांकडे खायच्या वेळेस जाऊ नये म्हणून. साग कां गेलीस ? '
असें म्हणत हरिमतीनें मार चुकवीत असलेल्या मृणालितीच्या पाठीवर
केरसुणीच्या बुडख्याचे दोन तडाखे आणखी मारले. ते रट्टे बरगड्यांबर
लागले. कळवळून मणालिनी खालीं पडली, आणि ओक्साबोक्शी रडूं लागली.
आतां मात्र वतनबिहारींच्यानें केवळ प्रेक्षक या नात्यानें तो अभिनय बघणे
होईना. हेमूला मांडीवरून उठवीत आणि मृणालिनीजवळ जात ते म्हणाले,
' पुरे नाहीं का झालें आतां ? कों मारून टाकणार आहेस ? *
मृणालिनीला मारून मारून हरिमती अगोदरच थकली होती. तिनें हातां-
तली केरसुणी फेकन दिली, आणि खालीं बसत ती हताक्ष स्वरांत म्हणाली,
“ तर ! तेवढ्याकरतांच तर जन्म दिला आहे या पोरींना ! आतां असें तरी
करा ! अफू आणून द्या दोन रुपयांची. पाण्यांत कोळून पिऊन जाऊं
सगळ्याजणी ! '
* कां बोलतेस हें भलतेंसलतें ? हौस का आली आहे तुला मरायची ?
देवानें सोन्यासारखी पोरें दिलीं.
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...