तंतकवि तथा शाहीर | Tantakavi Tathaa Shaahir

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तंतकवि तथा शाहीर  - Tantakavi Tathaa Shaahir

More Information About Author :

No Information available about यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

Add Infomation AboutYashvant Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आाहिरी वाड्मय ७ असतील त्यांचीच त्यांना केव्हांहि अपूर्वाई. खालच्या बहुजन समाजाची ही अपेक्षा कीतन-पुराणापेक्षां शाहिरांच्या फडांत किंवा तमाशांच्या कड्यांत तृप्त होणे शक्‍य होतें. कीतनें देवळांतून व्हावयाचीं. देवळांत ब्राह्मण, द्यूद्र इत्यादिकांसाठी बंधने होतीं. यामुळेंहि तेथे खालचा समाज मनमोकळेपणानें मिसळून समरस होऊ शकत नव्हता. या सगळ्या अडचणी शाहिरांच्या किंवा गोंधळ्यांच्या तमाशांनीं नाहीशा करून टाकल्या. तमाशे वाटेल तेर्थ मोकळ्यावर होत. त्यास तिकीट नाहीं आणि प्रेक्षकांत उच्चनीच वर्णाचे भेदहि नाहीत. कीर्तनांत सोंग न घेतां कीतेनकार एकटाच निरनिराळ्या भूमिकांचा अभिनय करी. तमाश्यांत तर अनेक पात्रे असून ती सोंगे घेत व त्यांत स्रियांचा अभिनय करणारे खास नाचे पोरे असत. एवढेच नव्हे तर न्त्रियांची कामे प्रत्यक्ष स्त्रियाहि करीत. नाटकाप्रमाणे त्यांत संभाषण, गायन सर्व कांही असे. आणि मोठी गोष्ट ही कीं तमाशांतून सव भाषण व गायन अस्सल मराठमोळ्या बोलीत चाले. संस्कृत छेक घेऊन मग मराठी आर्यांनी त्याचे विवरण करीत बसावयाचे असा घ्रकार त्यांत नव्हता. तमाशांत म्हटल्या जाणाऱ्या सर्वे लावण्या-पोवाड्यांचे विषय मराठ्यांच्या नेहमीच्या व्यवहारांतले आणि हुबेहूब वर्णिलेले असत. त्यामुळे आपण पाहतो आहो किंवा ऐकती आहों ते सर्व आपलेच चित्र आहे, अशी जाणीव उत्पन्न होत असल्याने तमाशे ही मराठ्यांची म्हणजे ब्‌हुजन-समाजाची सवात आवडती संस्था बनली यांत आश्चय नाही. कीतनसंस्थेसारखीच बहुजनसमाजाची गोंधळ ही एक संस्था होती. तींत गायन, वादन, नर्तन असून शिवाय कीर्तनकार म्हणजे गोंधळी बहुजन- समाजांतला म्हणजे अशिक्षित माणूसच असे. पण गोंधळ हाहि कतिना- प्रमाणेंच धार्मिक प्रकार असल्यामुळें त्यावर बंधने पडत. तमाशासारखी त्यांत स्वेर आणि मनमुराद मजा छुटतां येत नसे. सारांश समाजापेकीं शंकडा पंचाण्यव लोकांचें साऱ्या करमगणुर्काचे अत्यंत आवडते आगर म्हणजे शाहिरांचे किंवा तमाद्यांचे फड एवढं एकच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now