ळाडकी ळक्ष्मी आणि इतर गोष्टी | Laadaki Laqsmi Aani Itar Goshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laadaki Laqsmi Aani Itar Goshti by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ छाडकी छक्ष्मी सुधारणांपैकीं आम्हांला ज्या योग्य वाटतात त्यांचा अंमल आमच्या संस्थानांत आम्ही करीत असतों. स्त्रीशिक्षणाकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. अहो, आमच्या एका छोट्याशा बोरवाडी नांवाच्या गांवांतली एक मुलगी पुण्याच्या फीमेल हायस्कूलमधें शिकत आहे...” राजेसाहेबांच्याकडून देणगी काढण्याच्या आदोने सभा-संमेलनांचं अध्यक्ष- स्थान देणारीं माणसं, कोणत्याहि विषयावरच्या व्याख्यानांत दडपून दिलेले हे त्यांचे उद्गार ऐकले कीं, टाळ्यांचा गजर करीत. त्या टाळ्या ऐकल्या कीं राजेसाहेब मनांत म्हणत, “काय बनवते आहे आपण लोकांना, आणि लोक मनार्शी म्हणत, “काय बनवतो आहत आपण या संस्थानेकाला.' संस्थानच्या श्रीमंतांनी लोकप्रियता लाटायसार्ठी कितीहि थापा मारल्या तरी, सोनी इंग्रजी शिकायसार्ठी पुण्यास कां गेली त्याचं खरं कारण निराळच होतं हें त्याना माहीत होतं. त्या कारणाची आठवण झाली, कीं त्यांच्या मनाला मोठी गमत वाः, व बोरवाडी आणि आबेवाडी या दोन गांवांच। प्रश्न जत्ता चिकट तसाच मनोरंजक आहे हा त्यांचा आवडता उद्गार ते आपल्या मनार्शी काढल्यावांचून राहत नसत. सोनी पांच वर्षांपूर्वी इंग्रजी शिक्षणासाठी पुण्यास गेली ती कांहीं स्त्रीशिक्षणासारठी राजेसाहेब तळमळत होते म्हणून नव्हे, सोनीन शिकायचा हट्ट घेतला म्हणूनहि नव्हे, किंवा आपली लेक फार हुशार आहे तेव्हां तिला इंग्रजी शिक्षण द्यावं असं वाटण्याची अक्कल बापू पाटलाला होती म्हणूनहि नव्हे, आपल्या लेकीला ईंग्रजी शिकवून मोठी करायची कल्पना बापूच्या डोक्यांत जोरानं आली याच खरं कारण फार वेगळंच होतं. आंबवाडी आणि बोरवाडी या गांवांत हरएक बाबर्तीत जी कित्येक वर्षांची जुनी स्पा होती तिच्यामुळे हा चमत्कार घडला होता. बापू पाटील जता बोरवाडीचा पुढारी होता तसा आंबेवाडीचा पुढारी येसू जगदाळे होता. याच्याकडे पाटीलकी वगेरे कांहीं नव्हती, परंतु याची शेती मोठी होती. गेल्या पांच पिढ्या जगदाळ्यांच्या घरांत कर्ती माणस एकाहून एक हुद्यार व कल्पक निघार्ली होतीं. त्यांनीं आपली शेती तर विशेष यशस्वी केली होतीच, पण शिवाय साऱ्या लोकांवर वचक ठेवून आंबेवाडीचं पुढारीपण टिकवलं होतं. बापू पाटील आणि येघू जगदाळे यांच्यांतली चुरस इतकी तीव्र होती, कीं तिऱ्हाइताला ती कर्धी कर्धथी हास्यास्पद वाटावी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now