आत्मवृत्त | Aatmavritt

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
223
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :

रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar
No Information available about रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)( १० ) आत्मवृत्त
कोल्हटकरांना त्यांच्या स्वत.च्या पिढींत जे महत्त्व प्राप्त झालं आणि
त्यांच्या नंतरच्या दोन पिढ्यांत जे शिष्य-प्रशिष्य मिळाले, ते कश्ामुळं !
कोल्हटकरांनी आपल्या काळांतल्या मराठी वाझ्मयाला अगदी नवीन अशा
कोणत्या गांष्टी दिल्या, साहित्याच्या प्रगतीला त्यांनी कोणत्या प्रकारें हातभार
लावला, हें सार सविस्तर सांगितल्याशिवाय त्यांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन होऊं
टाकणार नाही. पण तो एका प्रबंधाचा विषय असल्यामुळे इथे त्यांनी मराठीला
दिलेल्या देणग्यांचा विचार सूत्ररूपानंच करणं इष्ट होईल.
कोल्हटकरांच्या साहित्यावर ज्यांच्या प्रतिभेचे प्रारंभीचे पोषण झालं त्या
गडकऱ्यानी त्यांच्या फार मोठ्या बलस्थानावर नेमक बोट ठेवळं आहे. *श्री
महाराष्ट्र गीतां*त गुरूविषयी लिहितांना गडकरी म्हणतात * -जिर्थ रंगली साधी
भोळी जनाईंची गाणी । तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ।* या
कलावती वाणीनंच श्रीपाद कृष्णांनी त्या काळच्या सुशिक्षित वाचकाला प्रथम
आकृष्ट केले. कल्पना, भावना किंवा विचार शक्य तितक्या साध्या, सरळ:
पद्धतीनं व्यक्त करण्याची चिपळूणकरांच्या पूर्वीची परंपरा होती. कनित्
अलंकारिक भाषेचा उपयोग केला जाई. पण त्या अलकारांच्या मागं प्रतिभेची
चमक नसे. “कादंबरी? किवा *दशकुमारचरित ? या सस्कृत ग्रथांतल्या वर्णनाच्या
निजीव नकला हरिभाऊंच्या पूर्वीच्या कादंबरीत आढळत. पण नवी चमकदार
कल्पना, सौंदये आणि माधुर्य यांनी नटलेला तिचा आविष्कार आणि चमत्कृति,
सूचकता, वक्रोक्ति यांच्या साहाय्यानं त्या आविष्काराला आलेली लज्जत या
साऱ्या गोष्टी कोल्हटकरांच्या आधी ललित गद्यांत फारशा आढळत नसत.
श्रीपाद कृष्णांना चमत्कृतिप्रिय कल्पकतेची जी देणगी लाभली हाती तिच्यामुळं
या सवे गोष्टी त्यांच्या शैलीत पहिल्यापासून प्रगट होऊं लागल्या. * वीरतनय ”
हें त्यांचे पहिलं नाटक. पंचविशीच्या आंतबाहेर लिहिलेलं. पण त्यांतसुद्धां
त्यांनी मराठी गद्याला दिलेल्या या नव्या शैलीच्या खुणा जागोजाग आढळ-
तात. “मृत्यु हा स्वतः जर मृत्यूचा विषय असता तर मला किती आनद
झाला असता ! १ असं या नाटकाचा नायक झूरसेन आपल्या दिवंगत पत्नीची
तीन्रतेने आठवण झाल्यावर म्हणतो. हे उद्गार त्याच्या अतरंगीचं दु:ख तर
सांगतातच, पण त्याबरोबरच आपल्या चमत्कृतीनं बुद्धीला गुदगुल्या करतात.
या नाटकाची नायिका शालिनी श्रूरसेनाविषयी आपल्या मनांत निर्माण झालेली
कोमल भावना ज्या नाजूक नऱ्हेने व्यक्त करते ती मोठी मनोज्ञ आहे. हा
संवाद असा आहे :
शालिनी :- महाराज, ज्या पुरुषावर माझं प्रेम आहे त्याचं नांव सांगून
काय उपयोग ! त्याच माझ्यावर प्रेम नसलं तर उगीच---
User Reviews
No Reviews | Add Yours...