विमळेची ग्रहदशा | Vimalechii Grahadasha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vimalechii Grahadasha by नाथ माधव - Nath Madhav

More Information About Author :

No Information available about नाथ माधव - Nath Madhav

Add Infomation AboutNath Madhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यावरून पट्टा बांधून घेतला आहे. आतां बरोबर पंधरा दिवसांनीं हे पट्टे सोडायचे. तोपर्यंत तुम्ही उठण्याचा किंवा बशण्याचा बिलकुल प्रयत्न करूं नका, मी रोज येऊन तुम्हाला पाहून जाईन, ही विमला तुमची योग्य काळजी घेईल अशी माझी खात्री आहे. आमच्या मिशनमध्ये असतांना रोग्याची श्षुक्षप्रा कशी करावी याचा तिनें सहा महिने चांगला अभ्यास केला आहे. तुम्ही कांहीं काळजी करू नका. आमचा नोकर तुम्हाला रोज औषध आणून देईल. तुम्ही लवकर बरे व्हाल,---बरं पण ही तुमच्या पंक्लिडेन्डची खबर कोणाला सांगावयाची आहे काय १” “ होय. येथं बागडपट्टींत प्रार्थनासमाज जवळ माझे मामा --रामदेवराव काकडे राहतात, त्यांना ही माझी हकीकत कळली तर फार बरें होईल. ?' “ ठीक आहे. मी त्यांना कळविण्याची व्यवस्था करतों. ?” असें म्हणून डॉक्टरानें आपल्या खिशांतून नोटबूक काढिलें आणि त्यावर पत्ता लिहून घेऊन “तुमचें नांव काय १? असा त्या तरुणास प्रश्न केला. “: प्राझ नांव नरसिंगराव. ” नंतर विमलेला औषधाची योजना कशी करावयाची तें सांगून डॉक्टर आणि मिशनरीबाई जाण्याकरितां निघाले, विमला त्यांना पोंचविण्याकरिता जिना उतरून खालीं गेली, थोड्या वेळानें डॅक्टर आणि मिशनरी बाई निघून गेल्यावर एक उतार वयाची स्त्री आंतून दरवाजाजवळ येऊन म्हणाली, “ विमले, ही तुळा उठाठेव सांगितली होती कुणीं १ तो कोणाचा कोण, आणि तूं त्य'ला वेलाशक्र घरांत घेऊन आलीस ती तुला कांहीं लाजल्ज्ञा तरी ! तं आतां घरीं आली आहेस, आतां तूं॑ काय काय धुडगूस घालशील तें खरं । आतां घरीं तर येणें होऊं दे म्हणजे तुझी चांगलीच बत्तिशी रंगवितें. ? “ पण आई---” “ गप्प ]-- एक शब्दही बोलूं नकोस ! तुझे हे चाळे मला नाही खपायचे सांगतें. तूं आपली उद्यां त्या द्याळेंत जाऊन रहा कशी आणि घाल तेथें वाटेल तसा धिंगाणा ! माझ्या घरांत नकोत हे तुझे चाळे. लोक थुंकतात माइया तोंडावर ! इतकीं वर्षे पडली होतीं लोकांच्या तोंडाला कुलुपं पण झालं परवांपातून पुनः गाडं सुरू!” ““ पण आई, लोक काय बोलतात! त्यांना बोलायला काय ---”? “ विमले, आतां तुला साफ सांगतें, तूं मला * आई-आई * म्हणून विमलेची ग्रहद्शा '७'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now