उजाडळं पण सूर्य कुठें आहे | Ujaadalan Pan Suurya Kuthen Aahe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ujaadalan Pan Suurya Kuthen Aahe  by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण प्रहिल डे “ इं घेऊन जा. दादूची घार संपली कीं तो कासंडी घेऊन येईल म्हशीचे आणि गाईचं दूध वेगवेगळ्या पातेल्यांत चुलीवर 'चढवायचचं कपाटांतले दही घुसळायसाठीं तपेल्यांत नीट काढून ठेव, नीट करशील नॉ सारं १ आतां तं पुन्हां इकडे येऊं नकोस, ही शेवटची धार काढून येतेच मी. जा. ” रिकामी 'चरवी सासूबाईच्या हातांत देऊन उषा गोळ्यांतून बाहेर पडली, आणि मोठं परसू ओलांडून वाड्याच्या मुख्य भागाकडे जाऊं लागली. पावसाची सर थांबली होती, पण शेवग्याच्या झाडांनी तिच्या डोक्यावर पाण्याचे थेब टाकले. डोंगरी वाऱ्याची झुळूक तिच्या अंगाला क्षणभर बिल- गून पुढ गेली. उजव्या डाव्या अंगांना मांडवांवर छोटीं मोठीं घोसाळीं आणि काकड्या लोंबत होत्या. धान्याच्या कोठाराच्या कौलारावर भोपळीचा वेल माजला होता, त्यानं ठिकठिकाणीं हिरव्या काळ्या भोपळ्यांचीं गाठोडीं मांडून ठेवलीं होतीं. मोरीलगतच्या गुलबाशीच्या झाडांवर पांढऱ्या, तांबड्या, केशरी रंगाच्या लांबट कळ्या माजल्या होत्या. ती 'चार पावलं पुं गेली. उजव्या हाताच्या वेलावर लगडलेल्या तोंडल्यांपैकीं एक अगदीं लाल्चटुक झालेले तिला अंधुक उजञेडांत दिसलं, ती क्षणभर थबकली ब त्याकडे बघत राहिली. . .ति'च प्रभाकरशीं लम होण्यापूर्वी तो तिला एकदां म्हणाला होता, “ इतके दिवस बायकांच्या ओठांना पिकलेल्या तोंडल्यांची उपमा कां देतात मला कळत नसे, ” तिन विचारलं होतं, “ते का! पिकलेले तोंडले कधीं पाहिले नाहीं काय तुम्हीं १” तो म्हणाला होता, “ कितीदां तरी पाहिलं आहे. आमच्या वाड्याच्या मागच्या परसांत वेला- वर सदा लागलेलीं असतात. तं कधीं आलीस तर दिसतील तुला. आमचा दादा म्हणतो, तोंडलीं खाऊं नयेत. आयुर्वेदाचा अभिमानी वेद्ययाज आहे ना तो १ पण आमच्या बाबांना तोंडलीं फार आवडतात. अन्‌ मलाहि. तोंडलीं रगड पाहिलीं आहेत मीं. ” तिन विचारलं होतं, “ मग ओठांना दिलेली उपमा कां कळत नव्हती १” प्रभाकर हंसून म्हणाला होता, “ कारण, इतके दिवस तोंडल्यासारखे ओठ पाहिले नव्हते, ” ते ऐकून ती एकदम गप्प झाली होती, तो तिच्याशी प्रथमच असं बोलला होता. आणि व्याच्या त्या बोलण्यानं ती थोडी दंचकली होती. तिच्या मनांत आले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now