अर्वाचीन मराठी वाड्मयसेवक १ | Arvachin Marathi Vangmayasevak 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
40 MB
Total Pages :
332
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर देवराव - Gangadhar Devrav
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आगरकर गोपाळ गणेदा
त्यांचे मामा दत्तोपंत बी. ए. झाल्यानंतर एखएल्. बी. च्या अभ्यासाकरितां
सुंबईस गेले व गोपाळराव कॉलेजांतच फेलो होऊन एम्. ए. चा अभ्यास करूं
लागले. गोपाळरावांचे ऐच्छिक विषय इतिहास, तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान हे असल्या-
सुळें बी. ए. च्या वर्गात असतांनाच त्यांनीं मिळ'च्या ग्रंथांचें सूक्ष्म परिशीलन
केलें होतें; व वादविवादांत स्वपक्षमंडनार्थ व परपक्षखंडनार्थ लागणारी तकेशुद्ध
विचारसरणी हस्तगत करून ठेविली होती. बी. ए. चें वर्ष हें गोपाळरावांचे आयु-
ष्यांत अनेक दृष्टींनी महत्त्वाचें आहे. आच्चुवंक्िक दारिद्याप्रमार्णे आपल्या माता-
पितरांपासून दम्याच्या विकाराचीही पैदास गोपाळरावांनीं करून ठेविली होती
दारिद्याप्रमाणें या दम्याच्या विकारानेंही गोपाळरावांचा पिच्छा ते' मरेपर्यंत
सोडला नाहीं. अजूनपर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या या विकाराचें गोपाळराव बी. ए
च्या वर्गांत असतांना उचल खाल्ली व त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव
करून दिली. गोपाळख्वांच्या केलिजांतील द्गदगीच्या आयुष्याचा परिणाम अशा
रीतीनें त्यांना यावेळीं भोवला. बी. ए. ची परीक्षा होण्याच्या सुमारासच गोपा-
ळराव विवाहबद्ध झाले. गोपाळरावांची पत्नी यशोदाबाई. यांचें माहेरचें नांव
अंबुताई असून, त्यांचे वडील मोरभट फडके हें कऱ्हाड जवळील उंत्रण गांवचे
राहाणारे. ल्नानंतर गोपाळरावांनीं आपल्या पत्नीस थोडे बहुत वाचावयास
द्रिकविलें, आगरकरांचा पुढें समाजानें जो छळ केला व त्यांच्यावर जी आग
पाखडली त्याची झळ यशोदाबाईंना बरीच लागली असावी असें वाटतें.
“रूढ धमांचारांतील आणि लोकाचारांतील व्यंगांचें निर्भयपणे आविष्करण
करण्याचें भयंकर पाप हातून घडत असल्यामुळें देशाभिमानी व धर्माभिमानी
म्हणविणाऱ्या पत्रांतून होत असलेल्या दिव्यांचा व शापांचा प्रचंड भडिमार
ज्याला व ज्याच्या निरपराधी ख्रीला एकसारखा सोसावा लागत आहे...”
या त्यांच्या महाराष्ट्रास लिहिलेल्या अनाइत पत्रांतील वाक्यावरूनही वरील
शुंकेस बळकटी येते. खुद्द गोपाळराव यांचे धार्मिक विचार कसेही असळे
तरी त्यांनीं आपल्या पत्नीच्या धार्मिक भावनांना कधींही दुखविलें नाहीं
हे लक्षांत ठेवलें पाहिजे. आगरकरांचें बरें वाईट झाल्यास “ तुमच्या मागें
तुमच्या कुटुंबाचा सर्व भार मजवर आहे. त्यांना मी अंतर देणार नाहीं.
त्यांची तुम्ही काळजी करू नका. ” असें अभिवचन त्यांचे मामा दत्तोपंत यांनीं
त्यांना दिलें होतें. या वचनाला जागून आगरकरांच्या निधनानंतर दत्तोपंतांनीं
User Reviews
No Reviews | Add Yours...