भारतमाता वनवासी | Bhaaratamaataa Vanavaasi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतमाता वनवासी  - Bhaaratamaataa Vanavaasi

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॅ भारतमाता वनवासी “ सोपाना वाघमारेच ना त्याचे नांव १ त्या न्हावी कामगाराचे १? पुष्पा्रेनने प्वित्राबेनळा हलक्या स्वरांत विचारले. पण शकुंतला जोशीच्या भाषणाकडे चित्ताचा ल्य लागलेल्या चित्रा- बेननें तो प्रश्न ऐकून न ऐकलासा केला. शकुंतला जोशी दहा पांच वाक्ये बोलत न बोलते, तोंच सभास्थानी जमलेल्या जनसंमदांतून वेड्या पिसाटासारखा दिसणारा, पिंजारलेल्या' गुंताळ कॅसांचा, दादी मिशांनीं 'वरबटलेल्या चेहऱ्याचा व तारवटलेल्या नजरेचा एक कंगाल मवाली तरुण मध्येंच उठून उभा राहिला. तो व्यास- पीठाकडे टक लावून पाहूं लागल्य. रस्त्यावरील विनच्या दिव्यांचा इतक्या लांबवर मंद प्रकाश पडत होता; व सभेसाठीं म्हणून आणलेली किंटसन'ची एक बत्ती भडकून नुक्तीच विझली होती. त्यामुळे त्या तरुणाचा चेद्दरा सवाना नीट दिसत नव्हता. त्या तरुणाचा तो अवतार पाहून कुणालाही भय वाटले असते, कीं ह कांहीं स्थिर मनाच!, पूर्ण शुद्धीवर असलेला माणूस नाहीं. “ए बाबा! खालीं बेस. ”” एक कामगार त्या कंगाल तरुणाल्य म्हणाला. पण तो तरुण खालीं बसेना, तो कोण काय बोलत इकठटे लक्षच देईना. तोंच आणखी दोघे तिथ म्हणाले, ““अरे ए.! खालीं तरी बस, नाही तर बाजूला तरी जा. असा मर्ध्ये उभा राहूं नकोस. ” त्या तरुणानं ते ऐकून एकदां तिटकाऱ्याने कपाळाला आं्या घाळून मार्गे वळून पाहिले व ऐकले न ऐकलेस केलें. त्याची नजर बेडकीवर खिळ- लेल्या सापाच्या नजेरसारखी व्यासपीठावरील मायलेकरांवर खिळली होती. आणि सारे लोक तर वक्ती स्त्री काय बोलते हद ऐकण्याला उत्सुक होते. हा एक तरुण रानदांडगेपणाने मध्येंच उभा राहिलेला विशेषतः त्याच्या मागील लोकांच्या डोळ्यांत खुपूं लागला. अखेर त्यांतील एकाने त्याला बकोटीला घरून सभेच्या बाहेर एका बाजूला काढून लावले. “ जा, आतां बस तिकडे, डोकें शुद्धीवर आहे ना! कीं पुन्हां जायचे आहे ठाण्याला १” त्या कंग्राल तरुणाला बाजूला काढून लावणाऱ्या' त्या दुसऱ्या कामगार तरुणाने कांद्दीशा सहानुभूतीनं, पण किंचित्‌ रागांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now