पालकनीती - जून 2014 | PALAKNEETI - JUNE 2014
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
19
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पालकनीती ७ जून २०१४
'रचनावाद राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत
वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय
की, शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे .
रचनावादाची तयारी करताना एकेका मुद्द्यासाठी कोणकोणतं
साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार
करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार
केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वतःहून
वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार शब्दचित्र-
कार्ड तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित
वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर
लागला! ज्या शिक्षकांना मूल स्वत:हून शिकतं हे समजलं तिथले वर्ग
वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही
मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना
व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी
मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं,
त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती
होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात
सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती.
काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे
गुलामगिरीतून सुटका होती.
रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं
लागलं. आज माझ्या बीटमध्ये 'मुलं स्वत: शिकत आहेत.
प्रतिभा भराडे , सातारा
सातारा पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी. त्यांच्या
कार्यक्षेत्रातील कुमठे बीटमधल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून
रचनावादी पद्धतीनं शिक्षणासाठी प्रयत्नशील. सर्जनशील लेखिका.
'प्रकल्प/नवउपक्रम आणि कवाडे उघडताच ही दोन पुस्तके प्रकाशित.
॥0/8/109/)810॥8/806(822॥/6011008/1. ९0100
अक्टिव टीचर्स फोरमच्या वतीने होत असलेल्या शिक्षण संमेलनाची बातमी लोकसत्तात वाचली आणि भाऊ चासकरांशी संपर्क
साधून मी पुणे येथील शिक्षण संमेलनात दाखल झाले. संमेलन म्हटलं की उद्घाटन, स्वागत समारंभ असं चित्र समोर असतं.
पण अशा सोपस्कारांना फाटा देऊन हे संमेलन भरवण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या या संमेलनात अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी विविध विषयावर
संवाद साधला. विशेषत: ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती हा विषय केंद्रस्थानी ठेवून या चर्चा झाल्या.
ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तो कसा कार्यान्वित करायचा? यासाठीचे मार्ग कोणते? साहित्य काय असाव? याचबरोबर वर्गात
संख्या कमी असो वा जास्त, ज्ञानरचनावादी पद्धतीनं मुलांच्या हाताला काम देऊन त्यांचा विकास साधता येतो या गोष्टीवर जाणीवपूर्वक
प्रकाश टाकण्यात आला. वयानं मोठ्या होणाऱ्या मुलांशी संवाद, विशेष मुलांशी जुळवून घेणं, त्याच्यासाठी विविध संधी निर्माण करणं
यात शिक्षकांबरोबर पालकांचाही सक्रिय सहभाग याविषयी संजीवनीताईंचं विवेचन महत्त्वपूर्ण ठरलं.
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शिकणं कसं कृतिशील होऊ शकतं यावरचं एमकेसीएलच्या विवेक सावंत
यांचं प्रश्नोत्तरांचं सत्र मार्गदर्शक झालं. व्यक्तिश: मला असं वाटलं की वर्तनवादी शिक्षणपद्धती शिकलेल्या आपल्या पिढीला ज्ञानरचनावाद
हा शब्द नवा असला तरी त्या पद्धतीनं आपण काम केलं आहे.
संमेलनातले तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आणि शिक्षकांचे अनुभव ऐकून, लातूरमध्ये ज्ञानप्रकाशच्या माध्यमातून आपण करत असलेलं काम
योग्य दिशेनं जात आहे असा विश्वास वाटला. अर्थात प्रवाहाच्या विरोधात पोहताना होणारी दमछाक गृहीत धरलेलीच आहे.
संमेलनात आणखी एका विषयावरचं सत्र हवं होतं, ते म्हणजे 'उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता यातील फरक किंवा
'उपक्रमशीलता म्हणजेच प्रयोगशीलता आहे का? कारण आज, उपक्रमशील शाळा म्हणजेच प्रयोगशील शाळा, असा काहीसा समज
झाल्याचं दिसत आहे. या संदर्भात पुढील संमेलनात संबाद् व्हावा ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. संमलेनाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट
होतं. अँक्टिव टीचर्स फोरमच्या या पहिल्या यशस्वी प्रयोगाचं अभिनंदन!
सविता नरहरे,
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प, लातूर
55587048/704/6(8220018//. 60101
User Reviews
No Reviews | Add Yours...