पालकनीति - सितम्बर 2013 | PALAKNEETI - SEPTEMBER 2013

PALAKNEETI - SEPTEMBER 2013 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सप्टेंबर २०१३ ७6 पालकनीती हेतूपुरस्पर दिली आणि पुण्याजवळ मुळशीच्या कोळवण खोऱ्यात, साधना व्हिलेज वसाहत उभारली गेली. येरळा प्रॉजेक्टस्‌ सोसायटीची जबाबदारी माझा मुलगा राजा (उर्फ नारायण) यानं घेतली आणि साधना व्हिलेज'च्या कामात मी आणि माझ्या सहकारी मेधाताई टेंगशे, विजयाताई कुलकर्णी व इतर सक्रिय झालो. गरज अधिक संवेदनशीलतेची प्रौढ मतिमंदांचा प्रश्न नेमका कोणता आहे? त्यांचं जीवन कसं असावं? ह्याबाबत अनेकदा ऊहापोह केला जातो. मला वाटतं, समाजातला हा गट, ज्याला आवाज नाही, जो सर्वार्थानं कुठल्याही अत्याचाराला बळी (४४00618016) पडणं शक्‍य आहे, त्याच्या हिताबाबत, शारीरिक, मानसिक स्वास्थ्याबाबत फार संवेदनशील, सजग असायला हवं. हे दयाच्या अनुभवांतून जाणवत होतंच; त्यातूनच एक सूत्र आम्ही सर्वांनी ठरवलं की, ह्या कामाचा ढाचा संस्थात्मक स्वरूपा 'चा ठेवायचा नाही तो गृहात्मक स्वरूपा'चा ठेवायचा. हे मुलांसाठीचं वसतिगृह नसेल तर घर असेल. प्रत्येकाला स्वतंत्र अवकाश', निवडीचं स्वातंत्र्य असेल आणि त्यापूर्वी त्याची / तिची अन्न, वख, निवारा, सुरक्षितता (शारीरिक, भावनिक / मानसिक) ह्या मूलभूत गरजा सर्वार्थानं भागवल्या जातील. त्यात दर्जाचा आग्रह (अंमलबजावणीतही) धरायचा. या मुलांच्या भावनिक गरजा मोठ्या असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं कोणीतरी आहे असं त्यांना वाटणं महत्त्वाचं असतं. वैयक्तिक भावबंधातूनच असं नातं निर्माण होऊ शकतं. साधनामध्ये आमचा तोच प्रयत्न असतो. प्रत्येक मुलाच्या भावनिक गरजा वेगळ्या असतात, प्रत्येक मुलाचं वैशिष्ट्य वेगळं असतं, हे लक्षात घेऊन वागायला लागतं. अमूक काम महत्त्वाचं, अमूक बिनमहत्त्वाचं असे आपले निकषही यांच्यासाठी लावणं योग्य नाही. उदा. र योगेश नाष्टा नेऊन देण्याचं काम मनापासून, जबाबदारीनं करतो हे ओळखून त्याला ते आठवणीनं करायला देणं किंवा रात्री गेट लावायचं, दारांना कुलूप लावलंय का हे पहायचं काम गिरीश जबाबदारीनं करतो. कुणाला नेमकं काय आवडतं हे अचूक ओळखणं आवश्यक असतं. ही छोटी छोटी कामं त्यांना आत्मभान देतात, त्यांचा आत्मसन्मान वाढवतात. प्रौढ मतिमंदांचा उल्लेख आम्ही साधना व्हिलेज मध्ये “विशेष मित्र किंवा 'साधक' असा करतो. त्यांचं पहिल्या घरा'तलं (म्हणजे, जिथे ते जन्मले / लहानाचे मोठे झाले) स्थान पक्क ठेवायचं आणि ती सारी वैशिष्ट्यं ह्या दुसऱ्या घरात (म्हणजे केंद्राच्या घरांमध्ये) अबाधित राखायची; असा आग्रही दृष्टिकोन आम्ही अगदी पहिल्यापासून ठेवलेला आहे. इथे समवयस्कांमध्ये राहणाऱ्याचा आनंद मुलांना मिळतो. छान मैत्र तयार होतं. आपापल्या परीनं एकमेकांना मदत करावीशी वाटते. दुसरं एक म्हणजे विशेष मित्रांच्या योगदानाचं मोल “आर्थिक मोबदल्यात परिवर्तित करायचं नाही, तर रोजच्या दैनंदिन कामांत त्यांचा सहभाग घ्यायचा. एखाद्याला तेही करायची इच्छा नसल्यास, नाही म्हणायचा हक्क आहे आणि तो त्याच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनी मान्य करायला हवा असं मला वाटतं. काही वेळेस मी विशेष मित्रांचे अधिक लाड करतो, शिस्तपालनाबाबत आग्रही राहत नाही, असा माझ्याबद्दल आक्षेपही घेतला जातो. तेव्हा - मेधाताई गमतीनं, विजयाताईंना म्हणतात, “आपणही विशेष मित्र असतो तर बरं झालं असतं.” मला नेहेमी वाटतं की, विशेष मित्रांना आपलं आयुष्य आपल्या आवडीप्रमाणं जगण्याची संधी मिळाली आहे, पण आपण सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षांच्या आणि नियमांच्या चौकटीत त्यांना बसवतो. ग्रामविकासाच्या वाटेनं जाणारं पालकत्व ज्या निसर्गरम्यतेचा, साधनाच्या विशेष मित्रांना उपचारात्मक' स्वरूपाचा उपयोग होतो आहे, त्याच डोंगराळ भागामुळं कोळवण खोऱ्याचा ग्रामीण भाग मागासलेला राहिला. दळणवळणाच्या साधनांचा अभाव, राजकीय नेतृत्वाचं दुर्लक्ष, मुंबई-पुणे दह्या दोन्ही महानगरांच्या जवळ असल्यामुळं स्थानिक जनतेचं सातत्यानं होणारं स्थलांतर हे इथले प्रश्न लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यातूनच ग्रामीण महिलांचं संघटन / सबलीकरण, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयोग सुरू झाले. खोऱ्यातल्या तरुणांना जोडून घेण्यात यश येईना, म्हणून मग लहान मुलांसोबत काम केलं तर अधिक परिणामकारक होईल अशा विचारानं, लहान मुलांसाठी 'गंमतघर', 'पूरक शिक्षण वर्ग', दत्तक पालक योजना, उपक्रम केंद्र' आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणारं 'साधना इंग्लिश स्कूल' सुरू करण्यात आलं. मुलांसाठीच्या या सर्व कामांमध्ये माझ्या धाकट्या मुलीचा, रंजनाचा पुढाकार होता, अद्यापही आहे. मला वाटतं हा एकात्मिक दृष्टिकोन हे साधना व्हिलेजचं वैशिष्ट्य आहे. या कामामुळं मतिमंदत्वाचा स्वीकार व्हायला, त्याविषयीची समाजातली जागरूकता आणि
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now