सन्दर्भ - अंक 96 | SANDARBH - ISSUE 96

SANDARBH  - ISSUE 96 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डोंगरकडे एका अर्थाने सारखेच असतात. त्यांच्याजवळची स्थितीऊर्जा ते जवळच्या पाण्याला / दगडामातीला देत जातात. त्यात थोडी यांत्रिक ऊर्जा असते, त्यामुळे पाण्याची / दगडमातीची जागा बदलते; थोडी ऊर्जा घर्षणामुळे उष्णतेत रूपांतरित होते. एखाद्या व्हिडीओमध्ये तुम्हाला जर पाण्यातून उसळून दहा मीटर उंचीवर येणारा पाणबुड्या दिसला, तर तुम्हाला हसायला येईल आणि लगेच कळेल की ही फीत उलट फिरवली आहे. तुम्हाला अशी घटना घडली असे चुकूनही वाटणार नाही. तुम्ही तुमच्या अनुभवाशी सतत ताडून बघत असल्याने तसे फसवता येत नाही. ऊर्जा ही जास्त उंचीकडून कमी उंचीकडेच वाहते हे कळण्यासाठी नियम पाठ असण्याची काही गरज नसते. ऊर्जा आपली आपण संपृक्त होऊ शकत नाही, पण ती आपण होऊन पसरू मात्र शकते. त्यामुळे काळाची दिशा आपल्या मनात पक्की माहीत असते. एक लक्षात घ्यायला हवे की गरम त्यामधून उष्णता पसरायला ताबडतोब सुरुवात होते, किंवा ढोल बडवल्याक्षणी आवाज पसरू लागतो, त्यांना काहीच अडथळा नसतो. पण अशा कितीतरी घटना असतात, तिथे पसरण्याचा वेग अगदी कमी असतो. त्या वाटेत काही अडथळे असतात. एक पाहूया - समजा मी एखादा दगड हातात उचलून धरलेला आहे. त्याच्यात स्थितिऊर्जा शैक्षणिक संदर्भ अंक - ९६ साठवलेली आहे. मग उष्मगतिकीच्या दुसऱ्या नियमानुसार तो खाली पडून ऊर्जेचे भोवतालात वितरण का होत नाही? कारण सरळ आहे - तो तसे करू शकत नाही म्हणून. मी ज्या क्षणी तो सोडून देईन त्या क्षणी तो पडणार आहे. ऊर्जा वाहू बघतेच आहे, ज्या क्षणी ती वाहू शकेल त्या क्षणी ती पसरू लागणार आहे. नियम मोडलेला नाही. ऊर्जा वाहू बघते हे लक्षात ठेवायला हवे. वाहते असे म्हणणे अचूक ठरणार नाही. आपल्या दुनियेत या नियमाला असणारे असंख्य अडथळे कार्यरत आहेत, गेली कोट्यवधी वर्षे ते तिथे आहेत. डोंगरकडे त्याच्या जागीच उभे आहेत, बाजूच्या अणुरेणूंशी भौतिक किंवा रासायनिक बंधांनी बांधलेले आहेत. बाह्य ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचून हे बंध सैल करण्यासाठी अनेक वेळा त्या प्रक्रिया घडाव्या लागतात. पावसाचे पाणी शिरणे, ते गोठणे, वितळणे, वादळे, भूकंप यांच्या जोराने काही बंध सुटे होतात, डोंगराला भेगा पडतात, सुटे झालेले दगड खाली पडू लागतात. त्यांना मधेच अडवणार्‍्या झाडा- टेकड्यांची कमी नसतेच. थोडक्यात असे अडथळे भरपूर असतात. आणि या अडथळ्यांमुळेच आपण जिवंत आहोत! 1 ग न0:/5600008४४.02(/.6वप/४४०.नाणक्ष16 वरून साभार लेखक : फ्रँक लँबर्ट, रूपांतर : नीलिमा सहस्त्रबुद्धे ७
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now