पालकनीती - जनवरी 2013 | PALAKNEETI - JANUARY 2013

Book Image : पालकनीती - जनवरी 2013 - PALAKNEETI - JANUARY 2013

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विपुला अभ्यंकर यांच्या पत्राला किशोर दरक यांनी पाठवलेला प्रतिसाद १. मुद्दे क्र. १ ते ३ विषयी : १.१ प्रमाणभाषा ही अपरिहार्य आहे हे विपुला अभ्यंकरांनी सुचवलेलं विधान मला अंशत: मान्य आहे. जगात सगळीकडंच प्रमाणभाषा आहेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे. पण माझ्या मते - प्रमाणभाषा ही सगळ्यांनी स्वीकारलेली असते, की ती बहुसंख्यांवर लादलेली असते. हे संपूर्ण समाजाला माहिती असणं गरजेचं असतं. जगभरात सगळीकडं 'अभिजनांची भाषा प्रमाणभाषा बनते' हे खरं असलं तरी बनते या क्रियापदात जो ७858४6 (निष्क्रिय) किंवा 87000 (आपोआप घडणारी क्रिया) असा भाव आहे तसं प्रमाणभाषेबाबत घडत नसतं. प्रमाणभाषा लादली जाते* असं म्हटल्यावर लादणारी 90600/ शोधावी लागते, त्या 90600/ चा हेतू शोधावा लागतो अन्‌ लादली जाण्या च्या अंगानं शोध घेतला तर भाषेचा निराळा इतिहास आपल्याला समजू शकतो. शालाबाह्य मुलांचा अभ्यास करताना काही अभ्यासक गळतीचं प्रमाण (७00 07816) बघतात तर काही अभ्यासक तेच आकडे ७४5 ०7 186 म्हणजे बाहेर फेकलं जाण्याचं प्रमाण म्हणून बघतात. एकाच संख्येविषयीच्या संपूर्ण भिन्न आकलनामुळं शिक्षणाचं पूर्णत: वेगळं चित्र दिसतं, तसंच आपण प्रमाणभाषा बनणे अन्‌ लादली जाणे विषयी करायला हवं. १.२ एक तर प्रत्येकाला त्याच्या बोलीभाषेतून शिकवा नाहीतर इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करा'* असं विधान अभ्यंकरांनी माझं विधान म्हणून ५५०16 केलंय. १.२.१ माझ्या लेखात बोलीभाषा म्हणजे 096८1 असा उल्लेख मी केलेला नाही. किंबहुना राजकीय भूमिका म्हणून मी माझ्या लेखनाच्या- संभाषणाच्या भाषेशिवाय इतर भाषांना, विशेषत: आदिवासी, दलितांच्या भाषांना बोलीभाषा म्हणण्याची चूक किंवा धूर्तपणा करत नाही. “बोलीभाषा ही संज्ञाच जगभरात प्रमाणभाषकांकडून इतर भाषकांचं खच्चीकरण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळं आपण बोलीभाषा हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. १.२.२ मी मराठी-इंग्रजी अशा मिश्र माध्यमाच्या शाळांचा उल्लेख केलाय तो अभ्यंकरांच्या वाचनातून सुटला असावा (दिवाळी अंक पान ४१) मुलांना त्यांच्या-त्यांच्या परिसराच्या किंवा परिचयाच्या भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं मी म्हटलंय. पण ते शक्‍य नसेल तर अपरिचित भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही महत्त्वाची निवड आहे, बहुजनांना 'प्रमाणमराठी' काही शब्दांच्या अन्‌ व्याकरणीय रचनेच्या स्वरूपात परिचित असली तरी आपल्याकडच्या प्रमाणभाषेचं राजकारण त्याच्या पुढचं आहे. प्रमाणभाषेतून जे अनुभव शिकवले जातात, ज्या दैनंदिनीची (6४6॥/ 08४) नोंद घेतली जाते ते जवळपास पूर्णत: ब्राह्मणी असतात. म्हणूनच तर भाषेचा वापर हा शाळांमधल्या हिंसे'चा पहिला प्रकार मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारतीय शिक्षणाचा आढावा घेताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ च्या 5.0... मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या झोत गटाने ब्राम्हणीकरण' व ससंस्कृतीकरण' (णक्षीक्षांडक्षांली क्षाप $008त(5क्षा00) ही त्याची व्यवच्छेदक लक्षणं असल्याचं म्हटलंय. या लक्षणांचे निर्देशक म्हणून पहिला उल्लेख ब्राम्हणी भाषेचाच करण्यात आलाय. १.२.३ बहुभाषक समाजांमध्ये मुलांना त्यांच्या त्यांच्या भाषेत शिक्षण देणं शक्य आहे का? माझ्या भूमिकेला व्यवहाराचा काही आधार आहे का? अशा रास्त शंका अभ्यंकर यांनी उपस्थित केल्यात. २००६ नंतर ओडिशामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत १० आदिवासी भाषा माध्यमभाषा म्हणून शाळांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. या भाषा घटनेतल्या अनुसूचनातल्या (3006016) नाहीत हे विशेष. त्याहून महत्त्वाचा प्रयोग १९९० च्या दशकापासून पपुआ न्यूगिनी (28004 ५७४ तरेप68 - ?1५७) इथं पाहता येऊ शकतो. फक्त ५५ लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या देशात ८०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. १९९०च्या दशकात एकाच वेळी ३५० पेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा तिथल्या सरकारनं सुरू केल्या. जगातली सर्वाधिक बहुभाषकता असणारा इतका छोटा देश (हा देश जगाच्या नकाशात वाचकांनी शोधावा) मुलांच्या शिक्षणाविषयी अभूतपूर्व असं काय करू शकतो याचं 1५५ हे उदाहरण आहे. त्यामुळं व्यवहाराचा, अनुभवाचा आधार आहे, प्रश्न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा अन्‌ प्रमाणभाषकांच्या भाषिक किल्ल्यांना हादरे देण्याचा. १.३ लिखित किंवा प्रमाणभाषा कशी ठरवावी या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे काय? प्रमाणभाषेचं एखादं 0165071000 असत नाही. पण तिच्या काही ४65 असतात, शालेय व्यवहारात क्रमश: प्रमाणभाषे* सोबतच त्या भाषेच्या इतर प्रकारांमधले व तदनुषंगिक संस्कृतीमधले शब्ददेखील प्रमाणभाषा म्हणून आले तर एक म्हणजे भाषा प्रवाही राहील अन्‌ दुसरं म्हणजे संपूर्ण शिक्षणव्यवस्थेची भाषाविषयक संवेदनशीलता वाढू शकेल. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात अनेकांनी आपल्या हयाती घातल्यात. त्या प्रश्नांचं थोडक्यात' उत्तर देणं शक्‍य नाही. या लेखात माझा प्रयत्न प्रश्न समजावून घेण्याच्या पातळीवर रेंगाळतोय. २. मुद्दा क्र. ४ विषयी : मी प्रमाणीकरणाला म्हणजे प्रमाणीकरण या प्रक्रियेलाच आक्षेप घेतला नाही (दिवाळी अंक पान ३५, कॉलम ३) तर भाषेच्या ब्राह्मणी, पुरुषी प्रकारच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया समजावून घेण्याचा प्रयत्न केलाय. समाजाची सचना मी वर्गीय* अशा स्वरूपात देखील मानतो पण त्याहून जास्त समाजाच्या 'जातीय' रचनेबद्दल पालकनीती ७ जानेवारी २०१३ र द्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now