पालकनीती - अप्रैल -2013 | PALAKNEETI - APRIL 2013

Book Image : पालकनीती - अप्रैल -2013 - PALAKNEETI - APRIL 2013

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती ७ एप्रिल २०१४ सात मित्रांनी एकत्र येऊन सांगत्यसाठी ही जागा विकत घेतली. दरम्यान श्रीनं त्याच्या स्वतःच्याच कॉलेजात, ।(£१७ मध्ये, शिकवायला सुरुवात केली होती. तरुण मुलांच्या शिकण्याच्या क्षमता, त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल वाटणाऱ्या चिंता, व्यावहारिक जगाशी कसं वागावं याबद्दलची भीती ह्या सगळ्यासकट त्यानं तरुणाई जाणून घेतली. त्याचा विषय आणि तो शिकवण्याचं कौशल्य त्यानं आत्मसात केलं. (६१0 मधे ॥॥.180॥0 करणाऱ्या केमिकल इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना थर्मोंडायनामिक्स शिकवताना शाश्‍वततेशी असलेला या विषयाचा संबंध श्री मुलांपर्यंत पोचवत राहतो. प्रत्येक तासाला पाचतरी मिनिटं या विषयावर चर्चा होतेच. शिवाय त्याचं बोलणं आणि त्यानुसार साधं जगणं मुलांना डोळ्यापुढे सतत दिसतं. त्यामुळेही त्याचं बोलणं अधिक परिणामकारकारक होत असावं. आजही त्याचा सल्ला घेण्यासाठी अनेक व्यावसायिक त्याला शेतावर फोन करतात. विद्यार्थी तर करतातच. त्याच्याबरोबर शेतावर राहण्यासाठी त्याचे विद्यार्थी चार-दोन दिवस, तर काहीजण महिना-महिना येतात. मुलांनी केलेलं काम, प्रकल्पाचे अहवाल, अगदी नेहमीच्या परीक्षांचे पेपर तपासतानाही, विद्यार्थ्यांना सुधारण्यास मदत व्हावी म्हणून तो अत्यंत विस्तारानं त्यावर टीपा लिहितो. त्यात रात्ररात्र घालवतो. त्याची ही संवेदनशील दृष्टी विद्यार्थांच्या हृदयापर्यंत पोचत असणार. मग विद्यार्थ्यांचा तो अत्यंत आवडता शिक्षक आहे, यात काही नवल नाही. 'सांगत्य'मध्ये येणार्‍्यांचं स्वागत अगदी सहज होतं. पाहुणा आरामात आहे ना इकडे श्रीचं लक्ष असतं. तो शांतपणे तुम्हाला शेती- जमीन दाखवेल, सध्या काय चालू आहे ते दाखवेल, तिथल्या अडचणी- प्रशश्‍न-चिंता याबद्दल सांगेल. तुम्ही तिथे रुळलात आणि तुमची इच्छा आहे असं दिसलं तर एखादं कामही सांगेल. तो स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक करतो. उरकून टाकणं हा त्याचा स्वभावच नाही. अगदी वाटण-घाटण करून खास पदार्थसुद्धा निगुतीनं सुंदर बनवतो. त्यात कधी घरचा नारळ असतो, तर कधी शेतावस्च्या भाज्या-तांदूळ असतात. तो काही शेतकरी कुटुंबातून आलेला नाही. वाचन आणि दृष्टिकोन यातूनच त्याचा शेतीतला रस तयार झालाय. श्री संपूर्ण क्रांती विद्यालयात गेला, तिथं थोडी शेती होत असे. तेव्हा तो चाळिशीत होता, आणि प्रत्यक्ष जमीन घेईपर्यंत आणखी सात वर्ष॑ मध्ये गेली. शेतीचा अनुभव त्यानं स्वत:च शेती करताकरता मिळवलाय. संवेदनशील मन, नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आणि क्षमता, शेजारपाजाऱ्यांशी लगेच जुळणारं नातं, त्यांना आपलेपणानं केलेली मदत या सगळ्यातून श्रीचं शेती करणं आणि जगणं वाहतं झालं आहे. शेती करणं, आणि ती विशिष्ट पद्धतीनं करणं एवढं महत्त्वाचं असण्याचं कारण आपण समजावून घ्यायला पाहिजे. सजीवांना लागणारं मी सांगत्यमध्ये अगदी काहीच म्हणजे, साताठ दिवसच राहिले होते. त्यात माझ्या मनात भरून राहिलेली गोष्ट होती ती, श्रीकुमार नावाच्या माणसाचं अत्यंत डोळस तरीही साधं-सरळ असणं आणि तसंच वागणं. त्या काळात त्यांना कॉलेजच्या मुलांचे बरेच पेपर तपासायचे होते. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ते तपासण्याची त्यांची पद्धत असल्यानं त्यांना एरवी कॉलेजच्या प्रोफेसरांना लागतो त्याच्याहून खूपच जास्त वेळ लागायचा, त्यामुळे दिवसरात्र काम सुरू होतं. आम्हीही ते जरा इकडे तिकडे रमलेले दिसले, की दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरातले दटावत असतात तसे कामाकडे ढकलत होतो. अर्थात दिवसभर शेतात काम होतंच. चारपाच विद्यार्थी काम करायला, सरांच्या सोबत राहायला आलेले होते. हा माणूस अक्षरश: प्रचंड कष्टाळू आहे, पण नुसताच कष्टाळू नाही, त्याचं जगण्यावर, मातीवर, आसपासच्या कुणाही माणसावर कमालीचं प्रेम आहे. सहदेवनची दोन मुलं त्यावेळी आलेली होती. ती तर लाडकी भाचरंच. त्यांचे लाड होत होते. विद्यार्थ्यांकडे सजग लक्ष होतंच. त्यांना मोकळीक होती, पण स्वतःसोबत घेऊन घामटं निघेपर्यंत काम होतं. शेजाऱ्यांशी तर ते इतकं समजूतदार वागत की “अशा माणसाला काय कुणीही फसवणारच' असले सोपे निष्कर्ष काढून आमच्यासारखे पाहुणे मोकळे होत होते. पण थोडं शांतपणानं पाहिलं की जाणवायचं, की तो बावळट भोळेपणा नाहीय, ती समज आहे, इतरांना बदलवून टाकण्याची त्यात क्षमता आहे. सांगत्यमध्ये आलेल्यांना अकिरा कुरुसोवांची ड्रीम्स (विशेषतः भाग ८, पाणचक्क्यांचा गाव,) ही फिल्म बघायला मिळते. (वाचकांनीही ही फिल्म मिळवून पाहावी, अशी या निमित्तानं विनंती. नि 0शक्लि.एगातछ&वाब.प/एगात016800058%281990$॥0%29) आपल्या म्हणण्याचं सार असलेली ती फिल्म आहे, असं श्रीकुमारना स्वतःलाच वाटतं, त्यामुळे एक दिवसतरी त्यांच्याच संगणकावर ती लागते आणि खोलीभर बसून सगळे बघतात, नंतर अर्थातच मोठी चर्चा. एका संध्याकाळी जेवणानंतर गप्पागाणी झाली तेव्हा श्रीकुमारनं भाचरांच्या आग्रहानं गाणं म्हटलं. 'आ चलके तुझे मै लेके चलू एक ऐसे गगन के तलें.... अगदी साधेपणानं, प्रोजेक्शन वगैरे म्हणतात तसलं काही त्यांच्या आवाजात कुठेच नव्हतं, तरीही त्यातून एक गोष्ट प्रतीत होत होती, अत्यंत प्रांजळ खरेपणा! या माणसाचं अस्तित्वच या प्रांजउपणावर उभं आहे, त्याकडे ज्या कुणाचं लक्ष वेधलेलं असेल त्याला ते दिसल्याशिवाय राहत नाही. संजीवनी कुलकर्णी. 1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now