पालकनीती - जुलाई -2014 | PALAKNEETI - JULY 2014

Book Image : पालकनीती - जुलाई -2014 - PALAKNEETI - JULY 2014

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती ७ जुलै २०१४ “वाईट वाटतंय, पण आता वेळ संपलीये,* असं सांगितलं, पुन्हा आक्रस्ताळेपणा सुरू झाला. आता पुन्हा मागच्यासारखी शाळाही बुडणार की काय? असं वाटून माझ्या पोटात गोळा आला. पण यावेळी फक्त एकदाच मला त्याला उचलून खाली ठेवावं लागलं त्यानंतर मात्र तो, नाहीतरी मला नाष्टा नकोच होता. असं बडबडत तो बाहेर निघून गेला. यावेळी त्यानं शाळाही बुडवली नाही. त्यानंतर मात्र मुलांना २-३ मिनिटांपेक्षा उशीर झाला नाही. माझ्या तंत्राचा उपयोग झाला होता. मात्र या प्रसंगानंतरच मी न्याय्य भरपाईच्या उपयुक्ततेबाबत अधिक बारकाईनं विचार करायला लागले. मुलांना उपाशी ठेवणं ही काही भरपाई नाही, ही शिक्षाच आहे हे माझ्या लक्षात आलं. अशा प्रकारच्या कडक वागण्याला मी कितीही ठामपणा वगैरे नाव दिलं तरी ते सहृदय नक्कीच नाही. या परिस्थितीत मला काय करता आलं असतं? मुलांसमवेतच्या चर्चेतून ठरवून घेतलेले नियम मुलांनी काही दिवस पाळले. पण त्यातला उत्साह कमी झालाय असं लक्षात आल्यावर परत या विषयावर चर्चा करता आली असती. त्यातून कदाचित अधिक व्यवहार्य उपाय समोर आले असते ! धाकट्याला नियम पाळणं आवडत नाहीये, हे लक्षात आल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधू शकले असते. त्याच्या वागण्यामागचं कारण समजून घेऊ शकले असते. त्याला काय वाटतंय, तो ह्या प्रश्नाच्या उत्तरांच्या दिशेनं काय सुचवतोय,' ह्या मुद्यांवरच्या चर्चेचा अधिक उपयोग झाला असता. मला त्याला मिठीत घेऊन, रोज सकाळी घरात छान, शांत वातावरण असावं यासाठी त्याच्या मदतीची सर्वांना कशी गरज आहे,' हे समजावून सांगता आलं असतं. प्रत्येक वेळी आपल्याला तारतम्यानं विचार करून उत्तरांची सुयोग्य दिशा ठरवावी लागते. कुठल्याही परिस्थितीत आपल्या वागण्यातली सहृदयता गमवायची नाही हे नक्की ! मुलांसाठी प्रश्न सोडवण्याऐवजी मुलांबरोबर प्रश्न सोडवा ! ही दक्षता घ्यायला हवी ! न्याय्य भरपाई हे तंत्र अगदी टोकाचे प्रश्न सोडवताना, इतर सगळे उपाय हरल्यानंतरच वापरावं. कारण या तंत्राच्या वापरात थोडी जरी चूक झाली तरी हे तंत्र फार सहज शिक्षेकडे झुकू शकतं. विशेषतः ज्यावेळी मूल आणि मोठी माणसं यांच्यात सत्ता - संघर्षाचं वातावरण आहे, संताप आणि सूड यासारख्या भावना जोरदार काम करताहेत तेव्हा आधी दोन्ही बाजूंनी शांत होण्याकरता वेळ घेणं, मुलाचं सहकार्य मिळवणं ह्या पद्धती वापरायला हव्यात आणि मगच योग्य उपाय शोधण्याकरता न्याय्य भरपाईचं तंत्र वापरावं. खरं तर, नुकसान-भरपाई होणं, हा तात्पुरता अथवा तातडीचा उपाय आहे. घरातलं /वर्गातलं वातावरण छान राहणं, नातेसंबंधांतली क्रजुता टिकणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांचा सह्दयतेनं विचार करणं, समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी मुलं आणि मोठी माणसं यांच्या दोघांच्याही दृष्टिकोनांमध्ये बदल व्हायला हवा आणि वर्तन अधिक जबाबदार व्हायला हवं. भरपाईच्या तंत्रानं हे कायमस्वरूपी साधेलच असं नाही. मग काय करायचं? थोडं पुढे जाऊन आपण भभरपाई'मधून मनानं बाहेर पडून 'उपायां'च्या दिशेनं विचार केल्यानं कसा फरक पडतो हे पाहूया. उपायांवर लक्ष केंद्रित करूया आता अनेक अनुभव घेतल्यानंतर “भरपाई'च्या दिशेनं जाण्यापेक्षा 'उपायां'च्या दिशेनं विचार केला तर ते फार उपयोगी ठरतं, असं मला म्हणावंसं वाटतं. पारंपरिक शिस्त लावण्याच्या पद्धतींमध्ये काय करावं आणि “काय करू नये हे दुसऱ्या कुणीतरी सांगितलं म्हणून प्रमाण मानणं आवश्यक असतं. पण सकारात्मक शिस्तीच्या पद्धतीमध्ये आपण मुलांनाच विचार करायला आणि उपायांचा शोध घ्यायला प्रवृत्त करतो. मुलांवर दाखवलेला विश्वास आणि आदर मुलांना आवडतो आणि ती बिचार करायला प्रवृत्त होतात. मुलं पहिल्या काही प्रयत्नांत कदाचित सुयोग्य उपायांपर्यंत पोचू शकणार नाहीत पण या प्रक्रियेतून ती इतरांशी जमवून घ्यायला शिकतात, हे मात्र निश्चित ! या पद्धतीत नेमका प्रश्न समजावून घेणं आणि त्यानंतर उत्तरांच्या दिशांचा शोध घेणं, ह्या क्रमानं विचार होणं आवश्यक आहे. शिक्षकांच्या मदतीनं मुलं उत्तम रितीनं प्रश्न सोडवू शकतात. आपण न्याय्य भरपाईच्या दिशेनं जाण्यासाठी ज्या चार निकषांचा विचार केला त्यातले तीन इथंही उपयोगी पडतात. १) भरपाई चुकीशी संबंधित असावी. २) चुकीच्या प्रमाणात असावी. ३) कुणासाठीच अपमानकारक नसावी. हे तीनही निकष उपाय शोधतानाही लक्षात ठेवायचे आहेत. मात्र चौथा निकष, तुम्ही ठरवलेल्या भरपाईबद्दल मुलांना आधी माहीत हवं, ' हा आता सयुक्तिक नाही. कारण उपाय तुम्ही ' शोधणार नाही आहात. तो सर्वांनी मिळून शोधायचा आहे. या पद्धतीचा उद्देशच वेगळा आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. 'चुकीची भरपाई' होणं, हा उद्देश नाही, तर प्रश्न कसा सोडवायचा हे समजणं हा आहे. त्यामुळे या पद्धतीत एक वेगळा चौथा निकष तयार होतो : जे उपाय निश्चित होतील ते सर्वांच्याच विकासात मदत करणारे हवेत. आपण एक उदाहरण पाहूया - इयत्ता पाचवीतली दोन मुलं मधल्या सुट्टीनंतर नेहमी उशिरा वर्गात यायची. त्यांना घंटा ऐकू यायची नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. वर्गसभेमध्ये या संदर्भात न्याय्य भरपाई' काय असू शकते असं विचारल्यानंतर मुलांकडून खालील पर्याय आले - - त्यांची नावं फळ्यावर लिहावीत. - जेवढा वेळ त्यांना उशीर होईल तेवढा वेळ शाळा सुटल्यावर त्यांना वर्गात थांबायला सांगावं. - नंतस्च्या मधल्या सुट्टीत त्यांना तेवढा वेळ उशिरा जाऊ द्यावं. - त्यांना रागवावं. त्यानंतर मुलांना सांगितलं की, भरपाई'चा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now