पालकनीति -मार्च 2014 | PALAKNEETI - MARCH 2014

PALAKNEETI - MARCH 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती ७ मार्च २०१४ नोकरी चालू ठेवायची जबाबदारी स्त्रीची आहे असं गृहीत धरलं जातं. आमच्या बाबतीत हा प्रश्‍न लग्न लागल्याबरोबरच निर्माण झाला. कारण माझ्या कामाची पद्धत आणि भूमिका यामध्ये कुटुंबाचा विचार फारसा केलेला नव्हता. कुटुंबासाठी वेणूनं नोकरी करावी असं माझं मुळीच म्हणणं नव्हतं. माझ्याप्रमाणेच तिनंही आवडेल ते काम करण्याला प्राधान्य द्यावं आणि दोघांनी मिळून संसाराचा भार उचलावा, असं माझं म्हणणं होतं. हे तिला अमान्य नव्हतं, पण कॉलेजमध्ये शिकवणं हे तिनं आवडीनंच निवडलं होतं. त्यामुळे ते सोडायचा तिचा विचार नव्हता. तिच्या पगारात आमचं भागू शकेल अशी आमची समजूत होती. त्यामुळे माझं काम मला पूर्वीसारखंच निर्वेधपणे चालू ठेवता आलं. रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून ती नोकरी करत होती. माझं काम मी तिच्या नोकरीच्याच ठिकाणी करेन असं आमचं बोलणं कधी झालं नाही. ते व्यवहारातही शक्‍य नव्हतं. माझं राहणं इतस््र, बहुतेक सारं पुण्याला झालं. याचा परिणाम अपरिह्यर्यपणे आमच्या घरावर झाला. मुलांची व घराची जबाबदारी वेणूनं स्वीकारली. याचा तिला पुष्कळ भार पडला. घरी असलो तर मी घरकामात मदत करत असे पण असं अगदी कमी वेळा व्हायचं. मुलांची जबाबदारी मी पूर्णपणे घेऊ शकलो नाही. मुलांचं शिक्षण. .. शाळेतलं आणि शाळेबाहेरचं आम्हाला तीन मुलं. अनु-माधव जवळजवळ बरोबरीचे. अनु सात वर्षांची असताना मेघनाचा जन्म झाला. मुलांची आबाळ होऊ नये म्हणून काही वेळा मी माझं काम सोडून दिलं किंवा त्या काळात घरी राहिलो. पण हे थोड्या काळासाठी झालं. श्रीरामपूरला असताना मुलं शाळेत जायला कंटाळली. शाळेत जाणं-येणं फार वेळखाऊ होतं. शिक्षकही शिकवण्याबद्दल अनुत्सुक होते. सुट्टीत दोघं माझ्या आई- वडिलांकडे गेलेली असताना तिथं राहिली. तिथं खेळायला माझ्या भावाबहिणींची मुलं सोबत होती. घराभोवती प्रशस्त आवार होतं. त्यामुळे परत येऊन शाळेला जाण्याच्या बाबतीत त्यांनी कंटाळा केला. एकदा जी शाळा सुटली ती तीन वर्ष सुटली. (चौथी, पाचवी, सहावी). घरीच राहून थोडाफार अभ्यास केला. शेजारपाजारची मुलं खेळायला सोबत होती. घरी त्यांचं काहीकाही शिक्षण झालं. पण शाळेचा अभ्यासक्रम करून घ्यायचा ही दृष्टी नव्हती. या काळातही व्याख्यानं, लिखाण, शिबिरं असं माझं काम परगावी चालूच होतं. त्यामुळं हा काही जाणीवपूर्वक केलेला उपक्रम नव्हता. सहजपणे जे घडलं ते मात्र असं होतं. त्या सगळ्या काळात त्यावरून आम्हा दोघांमध्ये काही वाद झाला असं झालं नाही. घरी राहूनही मुलांचा पुरेसा अभ्यास होतो असं आमचं म्हणणं होतं. पण नातेवाईकांमध्ये याबद्दल खूप असमाधान होतं. मुलं स्वत:ही पूर्णपणे समाधानी नसणार कारण इतर मुलांना ती शाळेत जाताना पाहात होती. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला जेव्हा शाळेत जायचं असेल तेव्हा मी त्याची जबाबदारी घेईन. आमच्या हौसेपायी तुम्ही शाळेपासून वंचित राहणार नाही.'' त्यामुळे तीन वर्षांनंतर दोघं शाळेत गेली आणि तेव्हा ती काही मागं पडली नाहीत. पालकत्वाचा विचार आम्ही फार केला होता असं मला आठवत नाही. जो काही केला तो माझ्या मुलांचा म्हणून वेगळा केला असं झालं नाही. शिक्षणाबद्दल एकूणच व्यापक विचार करत होतो, त्याचा भाग म्हणून मुलांच्या शिक्षणाचा विचार केला. मुलं अगदी लहान असताना, त्यांना शिक्षा करण्याबद्दल वेणूची भूमिका वेगळी होती. पण पुढे तिच्या-माझ्या विचारांत त्या प्रकारचं अंतर राहिलं नाही. एकदा रागाच्या भरात माधवला मारलं होतं, ते सोडता मुलांना मारल्याची आठवण मला अजिबात नाही. नंतर माधवची माफी मागितल्याचंही मला आठवतं. कामं करण्यात ती आईला नेहमीच मदत करत असत. घरी मित्र-मंडळी, भाचे-पुतणे येत जात असत. त्या सगळ्यांचं प्रेमानं करणं चालू असे. वेणूला माणसांची - त्यातही मुलांची जात्याच खूप मार्जरी साइक्स भारतामध्ये पुष्कळ वर्ष॑ राहिल्या. इथल्या मिशनरी शाळेत त्यांनी काम केलं. शिवाय रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजी यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षणसंस्थांत काम केलं. त्या दोघांच्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगत असत. त्या म्हणत की ते दोघे विरुद्ध दिशेला नव्हते, त्यांची तत्त्वज्ञानं दोन वेगळ्या टोकाची तत्त्वज्ञानं नाहीत, तर त्या दोघांच्या भर देण्याच्या जागा वेगळ्या आहेत. इतर सर्व कामं सांभाळून त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर ग्रंथलेखन केलं. आचारविचारांचा सुमेळ कसा घालायचा, आपला दिवसभराचा वेळ वेगवेगळ्या कामात कसा कारणी लावायचा आणि हे सर्व करत असताना राहणी बिनखर्चिक कशी ठेवायची याचा उत्तम वस्तुपाठ त्यांच्या सहवासात मिळत असे. अत्यंत कमी संसाधनांमध्ये त्या जगत असत. स्वतःचे कपडे त्या हातानंच शिवत, तेही रेल्वे प्रवासादरम्यान. चहा-कॉफीसाठी काळ्या गुळाचा पाक करून ठेवत. कमीत कमी जळणात भात शिजावा म्हणून गोधडीच्या टोपीत भांडं ठेवत. सारं अगदी निष्ठेनं चालू असे. ग्रामीण भागामध्ये काम करायचं ते कसं, कोणत्या वृत्तीनं, कोणती सूत्रं पाळायची हे सारं आपल्या राहणीमधून त्या पोचवायच्या. आवड आहे. तिचे मुलांशी संबंध फार चांगले आहेत. मुलांसाठी ती कष्टही पुष्कळ घेत असे. मेघना लहानपणी घरात मांजरं, ससे पाळायची. त्या प्राण्यांनापण घरात इतरांसारखंच पूर्ण सामावून घेतलं जाई. मुलं सात-आठ वर्षांची झाली की स्वतंत्रपणे विचार करायला लागतात. आपण जर त्यांना वाव दिला तर आपल्यासोबत अनेक प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होतात. उदा. आम्ही मंचरला राहात असताना शेजारच्या गावी कुसुम कर्णिक राहात असत. त्यांच्याशी आम्हा दोघांचा दाट परिचय. साहजिकच अनुची कुसुमशी दोस्ती झाली. त्यावेळी कर्जतजवळच्या कशेळ्याला अँकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये माझं जाणं पुष्कळवेळा होत असे. तिथल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now