सन्दर्भ - अगस्त-सितम्बर -2018 | SANDARBH - AUG-SEP 2018

Book Image : सन्दर्भ - अगस्त-सितम्बर -2018 - SANDARBH - AUG-SEP 2018

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संगीत समजतं की समजत नाही, याच्याशी त्या महानतेचा काहीही संबंध नाही; परंतु कमल पाध्येंनी बाबासाहेबांची शास्त्रीय संगीतासंदर्भातली ही गोष्ट सांगितल्यानंतर कमल ताईना अनेकांच्या आक्षेपाला तोंड द्यायला लागलं. “तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल असं विधान करूच कसं शकता?', असं त्यांना विचारल गेलं. त्यामुळे सामान्यपणे आपण आता महापुरुषांचे दैवतीकरण किंवा उदात्तीकरण केलेलं आहे. त्यामुळे आजच्या समाजव्यवस्थेमध्ये कोणतीही चिकित्सा करणं ही गोष्ट दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत चाललेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यामागची चौथी अडचण म्हणजे, रूढी-परंपरेची प्रचंड पकड आजही आपल्या समाजमानसावर आहे. म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही वटसावित्रीची पूजा साजरी केली जाते- अगदी सुशिक्षषितांच्याकडूनही साजरी केली जाते - ते बघितल्यानंतर खरं म्हटलं, तर आश्चर्याचा धक्का बसतो. वटसावित्रीच्या पूजेबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय म्हटलेलं आहे? त्यांनी असं म्हटलेलं आहे की, “वडाचं झाड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पांथस्थाला सावली देणार. तेच वडाचं झाड जीर्णशीर्ण झाल्यानंतर त्याच्याखाली झोपलेल्या पांथस्थावर कोसळून पडणार आणि त्याचा जीव घेणार. आपल्याखाली झोपलेल्या अथवा बसलेल्या पांथस्थावर कोसळून पडायचं का त्याला सावली द्यायची, हे ज्या वडाच्या झाडाला समजत नाही, त्याची स्वत:च्या मनोकामनांसाठी पूजा करणं ही असत्याची पूजा आहे”. “सत्यमेव जयते? असं देशाचं ब्रीदवाक्य आहे आणि “असत्यमेव वर्तते? असं आजचं आपलं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे चालत आलेली कोणतीही कर्मकांडं आपण का करतो? म्हणजे हजारो-लाखो वडाच्या फांद्या तोडल्या जातात, “पर्यावरण जिंदाबाद' म्हणत स्वत:च्या घरी आणून पूजल्या जातात आणि “जन्मोजन्मी सात जन्मी मला हाच नवरा मिळावा', अशी बायका कामना करतात. आता याच्यामधला अंतर्विरोधदेखील आमच्या एका शिक्षकाने अन्य शिक्षिकांना सांगितला होता. हे सगळे प्राथमिक शिक्षक पेपर तपासत बसलेले होते. गप्पा मारत होते. तो शिक्षक म्हणाला, ““आपल्या नवऱ्याला लवकर मारायचं हे तुमचं वटसावित्रीचं व्रत बरं आहे बरं का!” शैक्षणिक संदर्भ अंक - ११३, १६
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now