सन्दर्भ - अंक 114 | SANDARBH - ISSUE 114

Book Image : सन्दर्भ - अंक 114 - SANDARBH - ISSUE 114

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपण नुसता हवेत हात फिरवला तरी आपल्याला हवा हललेली जाणवते. मग पृथ्वीच्या एवढ्या वेगामुळे हवा हललेली काहीच कशी आपल्याला जाणवत नाही? पृथ्वी जर १,००,००० कि.मी. प्रतितास इतक्या वेगाने फिरत असेल तर आपण उडून जाऊ इतक्या जोरात वादळ व्हायला पाहिजे. विचार तर करून बघा. थोडं इतिहासात डोकावूया! इतिहासात वारंवार अशा प्रश्नांची वादळे उठली. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं जेंव्हा दीड हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने प्रतिपादन केलं तेंव्हा कित्येक खगोलशासख्ञांना हे पटत नव्हतं कारण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असंच लोक समजत होते. पृथ्वी फिरते हे जर आपल्याला जाणवतच नाही तर ते का म्हणून मान्य करायचं असंच विद्वान आणि खगोल शाखर्ञांचं म्हणणं होतं. आर्यभट्टाने पाचव्या शतकात लिहिलेल्या “आर्यभट्टीय' ह्या ग्रंथात म्हटलंय की पृथ्वी ४३,२०,००० वर्षांमध्ये १,५८,२२,३७,५०० वेळा फिरते आणि नक्षत्र स्थिर आहेत. त्यात एक श्छोक आहे अनुलोम गतिनौस्थ: पश्यत्यचलं विलोमगं यद्टत | अचलानि भानि तदूत्‌ समपम्निमगानि लडूकायाम || (नौस्थ: नावेत बसलेला, भानि: तोरे) अर्थ : ज्याप्रमाणे वाहत्या पाण्यातून पुढे जाणाऱ्या नावेतील व्यक्तीला स्थिर वस्तू मागे जाताना दिसतात त्याप्रमाणे ल॑केतून (भूमध्य रेखेवरून) स्थिर ताऱ्यांकडे बघितल्यास ते पश्चिमेकडे जाताना दिसतात. आर्यभट्टांच्या ह्या म्हणण्याला खूप विरोध झाला. सहाव्या शतकातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर याने त्याच्या “पंचसिद्धांतक' ग्रंथात म्हटलं की “पृथ्वी स्थिर आहे. एखाद्या कुंभाराच्या चाकावर फिरत असल्याप्रमाणे ती फिरते असं काही लोक म्हणतात. पण जर असं असतं तर पक्षी त्यांच्या घरट्यात परत कसे आले असते. एवढंच नाही तर पृथ्वी जर एका दिवसात एक चक्कर पूर्ण करत असेल तर तिच्यावरच्या सगळ्या वस्तू पश्चिमेकडे वाहत शैक्षणिक संदर्भ अंक - ११४ १६
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now