व्हाट इज वर्थ टीचिंग | WHAT IS WORTH TEACHING

Book Image : व्हाट इज वर्थ टीचिंग  - WHAT IS WORTH TEACHING

More Information About Authors :

कृष्ण कुमार - Krishna Kumar

No Information available about कृष्ण कुमार - Krishna Kumar

Add Infomation AboutKrishna Kumar

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्रमिक पुस्तके ही जगभर सर्व देशात वापरली जातात. पण त्याचे साध्य मात्र प्रत्येक देशात भिन्न आहे. त्यांचा शाळेतील दैनंदिन व्यवहारातील उपयोग व त्यांचे प्रतिकात्मक मूल्य हे प्रत्येक शिक्षण व्यवस्थेत वेगवेगळे मानले गेले आहे. काही देशात क्रमिक पुस्तके ही केवळ खाजगी प्रकाशकच प्रसिद्ध करतात, तर काही देशात फक्त सरकार मार्फतच प्रकाशित केली जातात. काही देशात सरकार फक्त योग्य पुस्तकांची शिफारस करते व शाळांना व शिक्षकांना त्यातून निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. काही देशात सरकार काही क्रमिक पुस्तकांना अधिकृत मान्यता देते व त्यापेक्षा वेगळे साहित्य वापरण्याची परवानगीच नसते. काही देशात शाळा पुस्तके खरेदी करून मुलांना पुरवितात. काही देशात मुले पुस्तके खरेदी करून ती रोज सकाळी भल्या थोरल्या दप्तरात भरून शाळेत वाहून नेतात. शिक्षणशास्त्र व अभ्यासविषय यांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर पुस्तकांचा वापर शिक्षणात कशा पद्धतीने केला जातो यावर बरेच मोठे परिवर्तन अवलंबून असते. काही शिक्षण व्यवस्थेत मुलांनी पुस्तकाचा आधार कधी घ्यावा ते शिक्षिका ठरवितात. अभ्यासविषय कसा शिकवायचा या विषयी तिची स्वतःची योजना असते. मूल्यमापनाची योजना असते. आणि शिकवताना कुठले साहित्य, मग ते छापील पुस्तक असो वा अन्य काही, केव्हा वापरायचे ते ती स्वतः ठरविते. क्रमिक पुस्तके ही तिला उपलब्ध असलेल्या अन्य अनेक शिक्षणसाहित्यांपैकी एक गोष्ट असते. सर्वसाधारणपणे पाठ्यपुस्तकाशी करकचून बांधलेल्या आपल्या देशातील शिक्षकांच्या दृष्टीने इतके स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वप्नवत अवस्थाच आहे. आपल्या देशात अभ्यासविषय, साहित्य, मूल्यमापन कशातही त्यांना स्वत:करण्याचा काही अवकाशच नसतो. प्रत्येक विषयासाठी एक निर्धारित क्रमिक पुस्तक असते. शिक्षकाला धड्यामागून धडे शिकवित ते संपवावे लागते. धड्याखाली दिलेला स्वाध्याय मुलांना सोडविता येतो की नाही याबाबत तिला खात्री करून घ्यावी लागते. कारण तेच तर अंतिम परीक्षेत त्यांना करायचे असते. क्रमिक पुस्तक हे शिक्षणातील हुकूमतीचे प्रतिनिधीत्व करीत असते. व शिक्षकाने या हुकूमतीखाली विनातक्रार काम करायचे असते. शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाला असलेले दुय्यम स्थानही यातून स्पष्ट होत असते. क्रमिक पुस्तकांच्या निमितीपासून, शिक्षकांच्या जीवनात क्रमिक पुस्तकाला असलेल्या स्थानापर्यंत, सर्व गोष्टी या प्रत्येक देशात भिन्न असते. तरीही क्रमिक पुस्तकांविषयी जागतिक पातळीवर काही सार्वत्रिकता गृहीत धरून बोलले मात्र जाते. शिक्षणशास्त्रीय लेखनात क्रमिक पुस्तकांना जणू काही एक जागतिक अधिमान्यता आहे असे गृहित धरून लिहिलेले असते. शिक्षणशास्त्रातच कशाला अगदी शैक्षणिक योजना आखतांना व पार पाडतांनाही क्रमिक पुस्तके ही जणू पक्षपातरहीत व जागतिक पातळीवर सर्वांनी स्वीकार करावी अशी असतात असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय संशोधन, अभ्यास व सहाय्य यातून तयार करण्यात आलेली पुस्तके याच समजुतीवर आधारलेली असतात. तरीही जागतिक बँक जेव्हा फिलीपाईन्समधील क्रमिक पुस्तकांच्या सुधारणेसाठी निधी देते तेव्हा, किंवा कॅनडातील एखादा प्रकाशक वेस्ट इंडिजमध्ये खपविण्यासाठी पुस्तकात बदल करून छापतो तेव्हा, किंवा भारतीय पुस्तके तयार करण्याच्या समितीमधील सदस्य नवीन कल्पनांसाठी अमेरिकन पुस्तकांचे सहाय्य घेतात तेव्हा या सर्व ठिकाणी क्रमिक पुस्तक म्हणून संबोधल्या जाणा-या वस्तूचा प्रत्यक्ष व प्रातिनिधीक वापर हा ती वस्तू वापरणा-या समाजाच्या सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक स्थितीवर अवलंबून असतो. सर्व ठिकाणी तयार झालेले पुस्तक हे शैक्षणिक व्यवस्थेचे अंग असले तरी त्याचा अर्थ लावणे मात्र त्या समाजात रूढ असलेल्या स्थितीवर अवलंबून असते. शासन, शिक्षक व विद्यार्थी यांचे परस्पर संबंध कसे आहेत व त्यांच्या अधिकाराचे क्षेत्र कशा प्रकारचे आहे यावर हे ठरते. सर्वसामान्यपणे भारतीय शाळांमध्ये क्रमिक पुस्तक हे अभ्यास विषयांपेक्षा प्रभावी असते. शिक्षक हा पाठ्यपुस्तकाला बांधील असतो. कारण ते शासनाने प्राधिकृत केलेले असते. केवळ शिफारस केलेले नसते. प्रत्येक विषयासाठी अधिकृतपणे निश्‍चित केलेल्या पुस्तकांची प्रत प्रत्येक विद्यार्थ्यांने घेणे सक्तीचे असते.सर्व क्रमिक पुस्तके व वह्या विद्यार्थ्यांने रोज शाळेत घेऊन जायच्या असतात. पुस्तकातील विषय हा सोपेपणाने मुलांना समजावून सांगण्यात शिक्षकांचा सर्व वेळ खर्च होतो. क्षपण 9क्षत्पा 72882९८ 16 35/14/2008




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now