पालकनीति - अगस्त 2014 | PALAKNEETI - AUGUST 2014

PALAKNEETI - AUGUST 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॅ कठ गस्ट २० १ (७ पालकनीती ७ त्याला काहींना आपले मानता येते आणि काहींना परके मानता येते हेही खरे आहे. ज्यांना त्याने आपले मानले त्यांच्याशी तो अनुभवसाधर्म्याशिवायही समरस होऊ शकतो, त्यांची सुखदुःखे कल्पनेने जाणू शकतो; आणि ज्यांना परके, गैर, उपरे असे मानतो त्यांच्याशी अनुभवसाधर्म्य असूनही (दुजाभाव असल्यामुळे) त्यांच्या सुखदुः:खामध्ये तो भाग घेऊ शकत नाही. स्वत:च्या मनाला तो त्यांच्या बाबतीत सहजपणे अलिप्त राखू शकतो. हा आपणा सर्वांचा अनुभव आहे. लोकांच्या संघटनेशिवाय तर तरणोपाय नाही. संघटना केल्याशिवाय आपले प्रश्‍न सुटू शकणार नाहीत. परक्या राज्यकर्त्यांना हटविता येणार नाही. सामाजिक सुधारणा करता येणार नाही. परकीय संस्कृती'चे आक्रमण थोपविता येणार नाही. संघटना करावयाची असले तर लोकांच्या पचनी पडणार नाहीत असे फार नवे विचार सांगणे इष्ट होणार नाही. लोक बिथरतील, ते आपल्यालाच परके मानू लागतील. आपल्यापासून दुरावतील. म्हणून ते करावयाचे नाही. क्रांती करावयाची नाही. क्रांती सफल होण्यासाठी बहुसंख्याक लोक स्वतः प्रत्यक्ष सक्रिय नसले, तरी नवीन विचाराला मनातून पाठिंबा देणारे असावे लागतात. जोवर तसा पाठिंबा नसेल, तोवर क्रांती सफल होत नाही. आपल्याला नव्याने भेटलेल्या माणसाचा आपल्या विचारांना मनातून काही पाठिंबा आहे की नाही हे जोवर माहीत नसते, तशी खात्री नसते तोवर जे सर्वसामान्य आहेत त्यांच्या पलीकडचे विचार बोलता येत नाहीत. त्यामुळे अगदी नवीन विचारांच्या बाबतीत संघटनावादी कधीच आघाडीवर नसतात. ते त्याबाबतीत नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीवर असतात. त्यांना विपद्धयरहित मार्ग स्वीकारावा लागत असतो. ज्यांची संघटना करावयाची आहे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्यामध्ये आपापसात व आपल्यामध्ये स्नेहाचा धागा निर्माण करणे जसे आवश्यक असते, तसे जे परके आहेत त्यांच्याविषयीचा सार्वत्रिक आणि सर्वसाधारण दुजाभाव हाही लोकांना एकत्र बांधणारा धागा असू शकतो हे जाणून त्याचाही वापर करणे आवश्यक होऊन बसते. जे आचारविचाराने वेगळे आहेत त्यांच्यावर शत्रू* असा शिक्का मारला की बाकीच्यांची संघटना सोपी होऊन जाते. हे श्रद्धेने , आचारविचाराने वेगळे असलेले लोक संख्येने अल्प असले, तर एका श्रद्धेच्या व संख्येने अधिक असलेल्या लोकांचे वाकडे करू शकणार नाहीत, त्यांना त्यांची पायरी दाखवून देऊन त्यांचा उपद्रव कधीही थांबविता येईल ह्याची खात्री वाटते. त्यामुळे त्यांच्याविषयी जे लोक “आम्ही अल्पसंख्याक वा “आम्ही बहुसंख्याक' असे मानत राहतात ते राष्ट्रीघात विलीन होऊ इच्छित नाहीत व लोकशाहीला गटबाजीचे स्वरूप देत असतात, असे मला वाटते. दुजाभाव, परकेपणाची भावना जोपासणे हे आण्ट्रहित मानले जाते. हिन्दुनेतृत्वाने आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असे म्हणत म्हणत नेमके हेच केले आहे. समाजाचा जो अंश श्रद्धांनी, म्हणजे ॥6॥0ांशाने वेगळा आहे त्याला त्याने सतत परके मानले आहे. मुसलमानांना परके ' मानण्याची हिंदुनेतृत्वाची ही गरज स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वाढली. (सर्वांना परका वाटणारा इंग्रज तेव्हा निघून गेला होता). हिन्दूंच्या संघटनेसाठी त्यांना देशाच्या फाळणीचा साहजिकच फायदा झाला. निर्वासितांबद्दल राज्यकर्त्यांनी दाखविलेल्या कळवळ्यापेक्षा हिन्दुनेतृत्वाने नि:संशय जास्त कळवळा आणि मुस्लिमांविषयी दुजाभाव प्रकट केला. राज्यकर्त्यांचे कार्य त्यांच्या कर्तव्यातून आणि स्वयंसेवी संघटनांचे कळवळ्यातून झाले असे जे मानले गेले ते योग्यच होते. पण त्यामुळे हिन्दू हे धर्मनिरपेक्ष म्हणविता म्हणविता 1॥619101सापेक्ष झाले . मुसलमानांच्या खऱ्याखोट्या सुखदु:खाशी आम्हा हिन्दू ना तद्रूप होता आलेले नाही. मुस्लिमांची दुःखे त्यांनीच सोसावीत अशी आमची एकूण वृत्ती राहिली आहे. हिन्दूंमधील जात्युपजातींच्या अंतर्गत दर्जामधील अंतर कमी करण्यासाठी आमचे मन तयार करण्यासाठी जितका प्रयत्न झाला तितका हिंदू-मुसलमानांचा दर्जा समान व्हावा ह्यासाठी झाला नाही. उलट तो बुदृध्या मागे टाकला की काय अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. रामजन्मभूमीसारख्या नव्या समस्या निर्माण करून संघटनेसाठी त्यांचा लाभ घेण्यात आला. जसे दर्जाचे तसेच विश्‍वासाचे! हिन्दू- मुसलमानांना एकमेकांविषयी वाटणारा अविश्‍वास कमी करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न हिन्दनेतृत्वाने सातत्याने केल्याचे मला माहीत नाही. उलट त्यांच्यामधील तेढ चिरकाल कशी टिकेल ह्याकडे त्यांचे लक्ष आहे की काय अशी शंका वाटते. कारण अयोध्येच्या रामजन्मभूमीसोबतच त्याच राज्यातल्या काशी आणि मथुरा येथलेही प्रश्‍न, तेथे एकच शासन असून आणि ते प्रश्‍न शासनाच्या हस्तक्षेपाने सोडवून हवे असून, त्यांच्यासाठी एकत्र प्रयत्न होत असताना मला दिसत नाही. शासनाला त्यांच्याविषयीचे निर्णय एकावेळी करणे शक्य आहे असे मला वाटते. पण हा विषय जितका लांबेल तितका बरा, तेवढेच पक्षबळ वाढेल असा हिल्दुनेतृत्वाचा विचार आहे, अशी शंका येऊन माझे मन व्यथित होते. ह्या परकेपणाच्या जोपासनेमुळे हिन्दुनेतृत्व इतरांपेक्षा वेगळे पडते. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक वादाविषयी आणखी थोडे आपण आपल्या संविधानामध्ये समता आणि लोकशाही ही मूल्ये मान्य केल्यानंतर कोणतीही व्यक्‍ती जन्मामुळे (कुळामुळे, जातीमुळे, धर्मामुळे) कोणत्याही गटात पडावयाला नको. ती जातिधर्माच्या पलीकडे मानली गेली पाहिजे. द्या जाती, धर्म वगैरे बाबी एकदा माणसाला चिकटल्या की त्या
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now