पालकनीति - आनंद निकेतन वारदा | PALAKNEETI - SPECIAL ISSUE- ANAND NIKETAN WARDA

PALAKNEETI - SPECIAL ISSUE- ANAND NIKETAN WARDA by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिक्षणाच्या परिवर्तनाचे श्वप्न अनिता रामपाल स्विधानातील मूल्ये आणि शिक्षणाचे उद्दिष्ट एकदा आनंद निकेतनमध्ये सहावी ते दहावीच्या मुलांबरोबर चर्चा चालली होती. विषय होता- शिक्षण-हक्क-कायदा. मी मुलांना विचारले की परीक्षेत नापास झाल्यावर कसे वाटते, वर्गात मागे ठेवले तर कसे वाटते... कुणाला अनुभव आहे का... बर्‍याचशा मुलांना मागच्या वर्गात ठेवण्याचा काही अनुभव नव्हता. पण द्‌हावीतला एक मुलगा उभा राहिला आणि विचार करून बोलायला लागला. तो दुसऱ्या शाळेतून या शाळेत आला होता. त्या शाळेत नापास केल्यावर तो संपूर्ण निराश झाला होता. पण या शाळेत आल्यावर त्याला आपण कुणीतरी आहोत' याची जाणीव झाली होती, तो विचार करायला लागला होता. “आपल्याला काय काय येत नाही आणि ।। १७ ।। पालकनीती * जानेवारी २०१७ 'परीक्षेतले गुण यांच्या पलीकडे विचार करायला त्याला इथे आल्यावर प्रोत्साहन मिळाले होते. आपल्याला काय येते, आपल्याला काय करावेसे वाटते याचा विचार करायला जागा मिळाली होती. सगळ्यांनाच हे पटत होते. मुलांचे हक्क, मुलांची बाजू मोठ्यांनी ऐकून घ्यावी म्हणून काय करता येईल याबद्दल आम्ही बोलत राहिलो. नुकत्याच एका मोर्चात मुलांनी भाग घेतला होता, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर हा मोर्चा निघाला होता. विवेकाच्या बाजूने उभे राहण्यासाठी मुले त्यात सामील झाली होती. माणूस नसला तरी विचार जिवंत राहतील असे मुले सांगत होती. आपापले अनुभव, आणि त्यांचा आपल्या संस्कृतीच्या संदर्भात घेतलेला शोध यांच्या आधारावर मुले त्यांचे ज्ञान कसे रचत जातात यावर ।१0- २००५ ने भर दिला आहे. शिक्षकाच्या तोंडून किंवा पाठ्यपुस्तकामधून दिली जाणारी माहिती हे शिकवण्याचे माध्यम होऊ शकत नाही. शिकणे ही सामाजिक प्रक्रिया आहे, समाजात इतर मुलांबरोबर, मोठ्यांबरोबर, शिक्षकांबरोबर वावरतानाच ती घडू शकते. त्यामुळे शिक्षकाने शिकण्यायोग्य वातावरण निर्माण करायला हवे, शिकण्याला आधार देतील अशा रचना तयार करायला हव्यात. पाठ्यक्रमसुद्धा समग्र आणि एकात्मिक असायला हवा, त्यात अभ्यासाचे विषय आणि पूरक विषय अशी कृत्रिम विभागणी नको. संगीत, कला, हस्तव्यवसाय हे भाषा, गणित, विज्ञान, इतिहासापासून वेगळे काढू नयेत. हे विषय एकमेकांपासूनदेखील स्वतंत्र करू नयेत, ते एकमेकात मिळून जावेत. म्हणजे थोडक्यात, त्यांची रचना अशी हवी की उदा. गणित शिकवताना मुलाच्या आयुष्याशी तर त्याचा सांधा जुळलेला असेलच, (रि्षा09, 8क्षा9$/क्षा भप रिक्षा्षाप]्षा, शिवाय हस्तकला, भाषा आणि इतिहासाशीसुद्धा ते जोडलेले असेल. (2000) हे करणं म्हणजे एक आव्हानच आहे, कारण आजची शिक्षण-बव्यवस्था मुळीच लवचीक नाही आणि विषयांचा मुलांच्या रोजच्या जगण्याशी काही संबंधच नाही. हे केवळ अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्यांनाच अवघह वाटेल असे नव्हे, तर शिक्षकांनादेखील! वर्ग नियंत्रणात हवा आणि तिथे सर्व मुलांनी गप्प राहून आपले ऐकावे, सूचना पाळाव्यात, विचारले तेवढेच सांगावे अशी अपेक्षा असेल तर हे अवघड आहेच. आजचे मूल्यमापन देखील पुस्तकातली माहिती पाठ करून बिनचूक लिहिता येण्याच्या ओझ्याखाली दबलेलेच आहे. विचारशीलता, संशोधन,अभिव्यक्ती, कल्पकता, नावीन्य या कशालाच प्रोत्साहन द्यायचा प्रयत्नच मुळी केला जात नाही. आपल्या संविधानात जी मूल्ये मार्गदर्शक म्हटलेली आहेत, त्यानुसार समता, न्याय, स्वातंत्र्य, दुसऱ्याच्या भल्याची काळजी, सर्वधर्मसमभाव, मानवी हक्क आणि प्रतिष्ठा याप्रति आदर यांना बढती मिळावी/ यांची स्थापना व्हावी हे शिक्षणाचे ध्येय स्पष्टपणे मांडले गेलेले आहे. हे पाठ्यपुस्तकात म्हणणे तर सोपेच आहे, विशेषतः पाठ्यपुस्तकातून किंवा शिक्षकाने नीतीमत्तेवर प्रवचन द्यायचे असेल तेव्हा... पण केवळ ते कानावर पडल्याने मुले चांगले वागू लागतील का? इतरांबद्दल त्यांना आपलेपणा वाटला, त्यांच्या अनुभवाबद्दल प्रश्न पडले, त्याबाबत बोलणे झाले तरच कुठेतरी मुलांना इतरांशी आपले काही नाते आहे, त्यासंबंधी काही कर्तव्य आहे, ते पूर्ण करायला हवे असे वाटेल. त्यासाठी प्रोत्साहन मिळेल. समाजातली विषमता, लोकांवर होणारा अन्याय अशा गैरसोयीच्या मुद्द्यांकडे शाळा सामान्यपणे लक्ष देत नाहीत, खरे तर ते प्रामाणिकपणे, धैर्याने मान्यदेखील करत नाहीत. (07 ने म्हटले आहे की धर्म, जाती, भाषा, संस्कृती, लिंगभाव, अपंगत्व यासंदर्भात केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल वर्गात थेटपणे बोलले गेले पाहिजे. दिल्या जाणाऱ्या कामामधून आणि होणाऱ्या चर्चांमधून हे करता येईल. ॥५८६८ारा च्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशी विविध जीवनपद्धतींमधली उदाहरणे दिलेली आहेत. यावरून वर्गात उलटसुलट चर्चा घडू शकतात. आपापल्या श्रद्धांसह झालेल्या बोलण्यानंतर या मूल्यांबद्दल एक वचनबद्धता निर्माण होऊ शकते. खरे तर लिंगभाव, धर्म, जाती या संदर्भातल्या समतेच्या कल्पना नव्याने निर्माण करणे मोठ्यांसाठीच अवघड जाते. मिश्र गटात वाढणाऱ्या मुलांना न्यायाची आणि
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now