पालकनीति - सितम्बर 2014 | PALAKNEETI - SEPTEMBER 2014

PALAKNEETI - SEPTEMBER 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७ पालकनीती ७ सप्टेंबर २०१४ ते काम इथे राहूनच गेलंय. गांधीवादींचा किंवा गांधीभक्तांचा एक बंदिस्त गट झालाय. तो आपल्याआपल्यातच काम करत राहिलाय. सामान्य लोकांपासून ते वेगळेच पडलेत. सामान्यांना वाटतं की गांधी यांचे* यांनाच ते समजतात! एका बाजूला डाव्यांनी गांधींना शत्रू मानून बाजूला टाकलंय, दुसरीकडे गांधीभक्तांनी त्यांना माणूसपणाच्या पलीकडे नेऊन ठेवलंय, प्रत्येक गोष्ट शिरोधार्य मानून. त्यांच्याही काही चुका असू शकतील, हे मान्यच केलं जात नाही. त्यामुळे गांधी समजून घेण्याच्या संधी इथे दुर्मिळ होऊन गेल्यात. गांधीविचाराची सकारात्मक बाजू पाहिली जायला हवी, गांधी विचारावर गंभीर चर्चाही व्हायला हवी म्हणून, नारायणभाई देसाईंनी लिहिलेलं पुस्तक 'मारु जीवन एज मारी वाणी, मी मल्याळममधे आणायचे ठरवलं. त्याचा इंग्रजी अनुवादही मी सुरुवातीला पाहिला. पण त्यात भाषांतरकारानं मुळापेक्षा बरंच जास्त स्वत:चंच लिहिलंय असं दिसलं. म्हणून तो अनुवाद बाजूलाच ठेवला. मूळ पुस्तकावरून काम सुरू केलं. २००७ ते ०९ या काळात वेडछीला राहूनच मी हे काम केलं. नंतरची दोन वर्षं मात्र उडपीला सांगत्य संस्थेत राहून ते काम पूर्ण केलं. ऑक्टोबर २०११ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी नारायण भाईंनी गांधी कथा सांगावी अशी माझी इच्छा होती. मग ५ दिवसांचा कार्यक्रम ठरवला. पहिल्या दिवशी पुस्तक प्रकाशन. प्रकाशनासाठी तिबेटचे प्रमुख लामा रिंपोचे आणि तिबेटी स्वातंत्र्य योद्धा तेन्झिंग झिंदू आले होते. पुढचे तीन दिवस रोज सकाळी ५ ते ८ नारायणभाईंची हिंदीतून गांधीकथा, दुपारच्या वेळात गटागटानं विविध विषयांवर चर्चा असा कार्यक्रम आखला होता. केरळमध्ये हिंदी जाणणारे लोक कमी असतात, म्हणून या कथेचं ताबडतोब मल्याळममधे भाषांतर करून ते एफ. एम. रेडिओवरून प्रसारित करण्याची व्यवस्था केली होती. साधारण ३५०-४०० तरुण कार्यकर्ते, विद्यार्थी शिबिरात हजर राहिले होते. साधारण ४० कार्यकर्ते देशभरातून आले होते. पाचव्या दिवशी समारोप करून कार्यक्रम संपला. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, तेव्हा जमलेले तरुण सध्या यूथ फोरम फॉर एनव्हायरन्मेंट अँड जस्टिस' मधून एकमेकांच्या संपर्कात आणि कामातही आहेत. रचनात्मक कामाचं महत्त्व सांगण्यासाठी नुसतं भाषण देण्याऐवजी मी यूथ फोरमचं एक शिबिर घ्यायचं ठरवलं. ५०० लोकांचं ५ दिवसाचं शिबिर. या शिबिरात लागेल ती भातभाजीसुद्धा आपण पिकवू असं ठरवलं. ५- ६ महिने आधीच आम्ही काम सुरू केलं. एरनाकुलम जिल्ह्यातल्या अंगमाली तालुक्यात करयाम्परम्बल नावाचं गाव आहे. तिथं भातशेती करणार होतो. गावाजवळ थोडी पडीक जमीन आहे. त्याचा मालक शहरात राहतो. ती खरं तर चांगली भातशेतीची जमीन आहे. पण त्यावर अधूनमधून राडारोडा टाकला जातो आणि मग हळूच प्लॉट पाडून ते बांधकामासाठी विकले जातात. कोणी हरकत घेत नाही, तोपर्यंत हे चालू राहतं. या गावातली शेतजमीन वाचवायची असं आम्ही ठरलं. कार्यक्रमाच्या आधी ४-५ महिने मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या गावाला जाऊन भेटलो. सगळ्यांशी बोलून मगच कार्यक्रम पक्का केला. या निमित्तानं मार्क्स, एंगेल्स आणि गांधी यांच्या विचारातला आजच्या जीवनाला लागू पडणारा भाग मला चर्चेत आणायचा होता. तरुणांपर्यंत पोचवायचा होता. गांधींच्या विचारातला सगळाच्या सगळा भाग मला पटतो असं नाहीये. पण निसर्गाच्या उपभोगासंदर्भात, विकासाच्या संदर्भात गांधींनी जे म्हटलंय आहे, ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की निसर्ग तुमच्या हावरेपणासाठी नाही, पाश्‍्चात्यांनी निवडलेला अधिकाधिक उपभोग म्हणजे विकास हा मार्ग बरोबर नाही. हे अगदी न्यायाचं आहे, आज घडीला अत्यंत युक्त आहे. खरं तर एंगेल्सनंही डायलेक्टिक्स ऑफ नेचर मध्ये हेच म्हटलंय, पण कुणा मुख्य प्रवाहातल्या मार्क्सवाद्यांनी ते उचलून धरलेलं नाही. पश्‍्चिमघाट संवाद यात्रा पर्यावरणवादी चळवळ आणि ट्रेड युनियन यांचीही दिशा नेहमी वेगवेगळी असते. प्रत्यक्षात जेव्हा एखादा कारखाना प्रदूषण करत असतो, तेव्हा त्याचा पहिला घाव कामगारावरच बसतो. पण त्याची रोजीरोटी तिथून येत असल्यामुळं तो विरोध करू शकत नाही ही समजून घ्यायची गोष्ट आहे. केरळमध्ये मी या पर्यावरणवाद्यांना आणि ट्रेड युनियन्सना एकत्र आणायचा प्रयत्न सुरू केला. पर्यावरणासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी त्रिसूरला (केरळच्या साधारण मध्यभागी असलेल्या) एक सभा बोलावली. २० सप्टेंबरला शंकर गुहा नियोगींचा शहीद दिन असतो, त्या दिवशी ठरवली. विषय लोकांसमोर ठेवला. त्यानंतर पश्‍चिम घाट संवाद यात्रा ठरली. १२ एप्रिल २०१४ पासून पुढचे ५० दिवस. सर्व गावांमधल्या लोकांना भेटण्यासाठी आम्ही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now