पालकनीति - मई 2014 | PALAKNEETI- MAY 2014

PALAKNEETI- MAY 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती ७ मे २०१४ बेशिस्त ठरवून मोठी माणसं मुलांना शिक्षा करतात. खरं तर स्वत:मधले बदल आणि आजूबाजूची परिस्थिती यांचा अर्थ लावून आपण कसं वागायचं हा निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नसते. त्यांना जे करावंसं वाटतं ते योग्य आहे का हे ठरवण्यासाठी, कारण आणि परिणाम यांचा पुरेसा मेळ घालण्यासाठी, आपलं म्हणणं मोठ्यांना पटवण्यासाठी ती अजून लहान असतात. अनेकदा भुकेनं किंवा अतिश्रमानं कासावीस झालेली मुलं बेशिस्त वागतात. याला जबाबदार कोण? कधी कधी परिस्थितीच याला जबाबदार असते. अशा वेळी त्या मुलाला प्रेमानं मदत करणं सयुक्तिक आहे की शिक्षा करणं ? 'इतरांना मी नको आहे अशा नकारात्मक भावनेनं, नाकारल्या गेलेल्या मुलांच्या मनाचा ताबा घेतला तर मुल चुकीच्या पद्धतीनं वागू शकतात. त्यांचं हे वागणं स्वतःसाठी आणि इतरांसाठीही हानीकारक असू शकतं. कारण त्या वागण्यामागच्या त्यांच्या मनातल्या धारणा चुकीच्या असतात. आपलं नाकारलं गेलेलं महत्त्व परत मिळवणं हा या वर्तनामागचा उद्देश असतो. सर्वसाधारणपणे मुलांच्या वागण्याचं वर्गीकरण चार प्रकारे होऊ शकतं. १) सातत्यानं इतरांचं '*लक्ष' मिळवण्यासाठी प्रयत्न - इतरांना सतत स्वत:त गुंतवून ठेवणं, स्वत:च्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणं. मनातली धारणा : माझ्याकडे सर्वांनी लक्ष दिल, माझे लाड झाले; तरच मी त्यांना हवा आहे. २) सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवं हा आग्रह धरणं. मनातली धारणा : 'मी गटात सर्वश्रेष्ठ असेन, सगळे माझं ऐकत असतील तरच मला गटात स्थान आहे. ३) सूड- सतत बदला घेतल्यासारखं वागणं. मनातली धारणा: हहे मला त्रास देतात का, मग मीही त्यांना त्रास देणार! नाही तरी यांना मी नकोच आहे. त्यांच्या वागण्याची परतफेड केली तरच मला बरं वाटेल. ४) न्यूनगंड- माघार घेणं, एकटं एकट राहणं. मनातली धारणा : 'जाऊ दे! यांनी मला स्वीकारणं शक्यच नाही. मी असाच आहे. मी काहीच करू शकत नाही. 'माझ्याकडे इतरांनी लक्ष द्यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यात चूक काहीच नाही. मुल जेव्हा सततच या ना त्या प्रकारानं आपण लक्ष द्यावं म्हणून प्रयत्न करत राहतात, तेव्हा प्रश्‍न येतो. आपण ताबडतोब त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यावीत अशी त्यांची अपेक्षा असते. अशा वेळी त्या मुलांना इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकारात्मक मार्ग उपलब्ध करून द्यायला हवेत. आपण करत असलेल्या कामामध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं त्यांनीच शोधावीत यासाठी मार्ग सुचवणं, त्यांच्यावर एखादी जबाबदारी देणं, ती त्यांना पार पाडता येईल यासाठी मदत करणं अशा अनेक सकारात्मक मार्गांनी आपण त्यांच्याबरोबर राहू शकतो. मुलाला इतरांचं लक्ष वेधणारी एखादी विधायक गोष्ट सुचवता येईल. ' रोज जेवण्याच्या थोडा वेळ आधी येऊन, आवरून, पाटपाणी घेण्याचं काम केलंस तर सगळ्यांनाच जेवताना प्रसन्न वाटेल आणि तू हे केल आहेस हे लक्षातही येईल. यानंतर, ''तुला आणखी काही वेगळं सुचत असेल तर सांग अशी विचार करायची संधी आवर्जून द्यावी. याबरोबरच, ' तू मला आवडतोस. मी तुझ्याबद्दल सततच विचार करत असतो. असं आश्‍्वस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी खास 'आपली-तुपली अशी एक खुणांची भाषा तयार करता येईल. आपण एक उदाहरण पाहूया - आई एका समारंभाची बोलावणी करायला फोन करत होती. तिची चार वर्षांची छोटी मुलगी सारखी मधेमधे करत होती. पुढच्या फोनच्या वेळी आईनं तिच्या हातात घड्याळ दिलं आणि सांगितल की, हे बघ, मोठा काटा तीनदा बारावर येईपर्यंत माझा फोन झालेला असेल. तू लक्ष ठेवशील? मुलीला हे काम आवडलं. प्रत्यक्षात तीन मिनिटं संपण्याआधीच आईनं फोन ठेवला. मुलगी म्हणाली, ' अगं तुझ्याकडे आणखी वेळ होता.'*' आईवर लक्ष ठेवण्याच्या ह्या छोट्याशा संधीमुळे मुलीला एक छोटी सत्ता हातात मिळाली होती. 'सत्ता ही काही वाईट गोष्ट नाही. ती कशी वापरली जाते, यावर ती चांगली की वाईट हे ठरतं. मुलांना त्यांच्या हातातली सत्ता सकारात्मक पद्धतीनं वापरायची संधी द्यायला हवी. जेव्हा मूल आणि मोठ्या माणसांमध्ये सत्तेवरून भांडण सुरू होतं तेव्हा सर्वप्रथम मोठ्या माणसानं त्या भांडणातून बाहेर पडायला हवं आणि जे काही घडल त्याबद्दल मुलाशी बोलायला हवं. ''आपण बघूयात हं, भांडण कशामुळं झाल... माझं वागणं तुला आवडत नाहीये, दादागिरीचं वाटतंय ना? मला खरं म्हणजे तसं वागायचं नाहीये. पण चांगलं वागण्याकरता मला तुझ्या मदतीची गरज आहे. आपण दोघंही थोडा वेळ घेऊया आणि काय करता येईल याचा विचार कखूया. दोघांनाही छान वाटेल असा उपाय शोधूया. 'आपण दुखावलो गेलो तर आपणही दुसऱ्याला दुखवाव॑ अशी प्रबळ ऊर्मी मनात येणं, हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून तर माणसं वारवार सूडाच्या चक्रात अडकताना दिसतात. 'मोठ्या माणसानं स्वत:वर ताबा मिळवणं हाच हे सूडचक्र भेदण्याचा उपाय आहे. अशा वेळी मुलाच्या मनात काय भावना असतील हे बोलून दाखवणं फार उपयोगी पडतं. ' खूप दुखावला गेला आहेस कारे तू? मी समजू शकतो. अर्थांत या बोलण्याला प्रश्‍न सोडवण्याच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची जोड मिळणं फार आवश्यक आहे. न्यूनगंडाकडे झुकलेल्या मुलाचं वागणं फारसं त्रासदायक नसतं. पण शांतपणे विचार केल्यावर लक्षात येतं की मूल मागं पडतं आहे. 'मला नाही जमणार! अशी माघार घेणाऱ्या मुलाच्या मनात आत्मविश्‍वास जागवण्याची जबाबदारी मोठ्यांची आहे. ''मला नक्की वाटतं की तू हे करू शकशील आणि मी आहे ना तुझ्याबरोबर , हा विश्‍वास या मुलांना वारंवार द्यावा लागतो. अशा मुलाला त्या कामाची सुरुवात करून द्यायला मदत करणं फायद्याचं ठरतं. उदाहरणार्थ, ''चल आपण बांधूया बुटाच्या नाड्या, एका बुटाची मी बांधतो, एकाची तू बांध. मात्र सगळ काम आपणच करून दिलं तर, 'मला नाही येत ही त्याची धारणा
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now