पहिला शिक्षक | PAHILA ADHYAPAK

Book Image : पहिला शिक्षक  -  PAHILA ADHYAPAK

More Information About Authors :

चिंगिज़ एटमाटोव - CHINGEEZ AITMATOV

No Information available about चिंगिज़ एटमाटोव - CHINGEEZ AITMATOV

Add Infomation AboutCHINGEEZ AITMATOV

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुमन ओक - SUMAN OAK

No Information available about सुमन ओक - SUMAN OAK

Add Infomation AboutSUMAN OAK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१6 8 पहिला शिक्षक आहे. तुम्ही आडथळा आणलात तर आम्ही सुद्धा कायद्याचा बडगा दाखवू.” “आलाय मोठा दादा! जरा पहा तर त्याच्याकडे!'” कमरेवर हात ठेवून माझी काकी लढाईच्या पवित्र्यामध्ये उभी राहिली. “कोण शेंबडं पोर यांचे हुकूम मानणार? तिला कोण पोसतं आहे? तू का मी? आवारा बापाचा आवारा मुलगा तू. तुला ना घर ना दार!” एवढ्यात माझे काका कोठारातून बाहेर आले म्हणून बरं, नाहीतर या वादावादीचा शेवट कसा झाला असता कोण जाणे! या घराचा मुख्य तिचा नवरा आहे याकडे दुर्लक्ष करून काकी जेव्हा नको त्या बाबतीमध्ये ढवळाढवळ करी तेव्हा काकांना संताप घेई. कधीकधी ते तिला खूप मारपीट करायचे. आतासुद्धा तसंच काहीसं दिसत होतं, “एक बये चूप बसते का नाही” ते गरजले. “तूच या घराची मुख्य. आणि चांगलं काय आणि वाईट काय हे तूच ठरवायचंस असं समजतेस काय? काम कर मुकाट्यानं. बडबड बंद कर. आणि तू रे ताशतनबेकच्या मुला त्या कार्टीला घे आणि काय शिकवायचं ते शिकव, नाहीतर भाजून खाऊन टाक तिला. काय हवं ते कर. पण माझ्या अंगणातनं चालता हो. चल नीघ इथून.” “म्हणजे तुम्ही तिला भटकायला मोकाट सोडणार. आणि मला घरकामात कोण मदत करील? कोण सांगा नं.” माझी काकी आरडाओरडा करू लागली. पण काकांनी मोठ्यानं ओरडून तिला गप्प केले, “ए तोंड बंद कर पाहू.” प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी कड असते असं म्हणतात. ते खरंच आहे. हा वर वर्णन केलेला सगळा तमाशा झाला आणि मी शाळेत जायला लागले. तिथे पोहचल्यावर दुशेननं जमिनीवर खूपसं गवत पसरून आम्हाला त्यावर बसायला सांगितलं, आम्हाला प्रत्येकाला एक वही, पेन्सिल व लहानसा पुट्टा दिला. “तो पुट्टा तुमच्या मांडीवर ठेवा आणि त्यावर वही ठेवा. त्यामुळे तुम्हाला लिहिणं सोपं जाईल.” त्यांनी समजावलं. त्यानंतर भिंतीवर अडकविलेल्या एका चित्राकडे त्यांनी आमचं लक्ष वेधलं, ते चित्र एका रशियन माणसाचं होतं. “हे आहेत लेनिन,” दुशेन म्हणाले. पहिला शिक्षक १7 “ते चित्र मी कधीच विसरणार नाही. काय असेल ते असो. पण तसं चित्र मला पुन्हा कुठेच दिसलं नाही. आणि माझ्या स्वतःपुरतं मी त्याला दुशेनचं चित्रच अजूनही मानते. त्या चित्रामध्ये लेनिन यांनी एक सैलसे सैनिकांचे जाकीट घातले होते. काहीसा चिमटलेला चेहरा आणि लांब दाढी होती. दुखापत झालेला एक हात स्लिंगमध्ये अडकवलेला होता. टोपी थोडी मागे सारलेली होती. त्यांचे डोळे चलाख असून सुद्धा ते आम्हाला सांगत होते, “मुलांनो, किती सुंदर भविष्य तुमच्या पुढे आहे ते तुम्हाला समजलं तर!” त्या शांत क्षणांमध्ये मला वाटलं की लेनिन खरोखरच माझ्याच भविष्याचा विचार करीत आहेत. हे चित्र दुशेन यांच्याकडे बरेच दिवस असावे. पोस्टरसाठी वापरतात तशा स्वस्त कागदावर ते छापलेले होते. त्याच्या कडा आणि घड्या झिजलेल्या होत्या. भिंतीवर आणखी काहीच नव्हते. हे एवढे एकच चित्र! “मी तुम्हाला वाचायला व अंक मोजायला शिकविणार आहे. अक्षर व आकडे कसे लिहायचे तेही आपण शिकू या.” दुशेन म्हणाले, “मला जे जे येतं ते सारं मी तुम्हाला शिकवेन.'' त्यांना येत होते तेवढे सर्व त्यांनी खरोखरच आम्हाला शिकवून टाकले. आमच्या बरोबरचा त्यांचा सहनशीलपणा थक्क करणारा होता. पेन्सिल कशी धरायची हेसुद्धा त्यांना आम्हाला शिकवावं लागलं. आम्हाला माहीत नसलेल्या सगळ्या शब्दांचे अर्थ ते आम्हाला नीट समजावून सांगत. आता त्यांचा विचार मनात आला की मी आश्चर्यचकित होते. स्वतःच शिक्षणापासून वंचित असलेल्या त्या तरुणाचं केवढं धाडस! त्यांना जेमतेम वाचता येत होतं. पाठ्यपुस्तकांचा तर पत्ताच नव्हता. एखादे बाळबोध वाचनासारखे पुस्तकही नव्हते. या सगळ्या गोष्टींविना शिक्षणाचं महान कार्य करायचं! ज्यांचे बापजादेही कधी शिकले नाहीत अशा आम्हा मुलांना शिकवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. दुशेनना स्वतःला सुद्धा व्याकरण येतच नव्हतं. आणि शिकविण्याची. पद्धती म्हणून काही असतं याची तर कल्पनाही नव्हती. अशा काही गोष्टी असतात याची त्यांच्या मनामधे शंका सुद्धा आली नव्हती. त्यांना जेवढं चांगलं शिकवायला जमलं तेवढं त्यांनी आम्हाला शिकविलं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now