'प्रथम' बाल विज्ञान मेलावा | PRATHAM BAL VIGYAN MELAVA

Book Image : 'प्रथम' बाल विज्ञान मेलावा  - PRATHAM BAL VIGYAN MELAVA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
3३. चाक आणि अक्ष चाक नैसर्गिक स्वरूपात मिळत नाही आणि मानवाशिवाय इतर कोणताही जीव त्याचा उपयोग करत नाही. मानव समाजात चाकाचा उपयोग कांस्ययुगात सुरू झाला. उतरण आणि तरफेच्या तुलनेत खूपच उशिरा. चाकाच्या उपयोगाचे सर्वात प्राचीन पुरावे सुमेरियन संस्कृतीत (सध्याचे इराक) सापडतात. ते सुमारे ६००० वर्ष जुने आहेत. वाहनाच्या स्वरूपात चाकाचा उपयोग हा खूपच नंतर सुरू झाला. सुरुवातीला चाक हे फक्त कुंभाराच्या उपयोगाचेच यंत्र होते. आवश्यक साहित्य : खेळण्यातील प्लास्टिकची गाडी (डबे,स्पोक वगात “कभी र. 3 आणि बाटल्यांची झाकणे वापरूनसुध्दा | रम्य गाडीसारखे खेळणे बनवता येते) दगड किंवा एखादी जड वस्तू, मजबूत दोरा. कृती : १. दगडाला एक मजबूत धागा बांधा आणि खेचा. खेचण्यासाठी लागणारी ताकद किती आहे याचा अंदाज बांधा. २. आता हा दगड गाडीवर ठेवा आणि गाडी खेचा. मागच्या खेपेला लावलेल्या ताकदीशी तुलना करून आता किती ताकद लागली त्याचा अंदाज बांधा. दगड गाडीत ठेवून खेचल्यावर ताकद कमी लागते. गाडीची चाके घर्षण कमी करतात त्यामुळे सामान वाहून नेण्यास कमी ताकद लागते. चाके लावल्यामुळे जमीन आणि सामान यांचा एकमेकांच्या संपर्कात येणारा पृष्ठभाग कमी होतो. त्यामुळे घर्षण कमी होऊन विरोध कमी होतो. आपण जेव्हा एका अक्षाशी जोडलेल्या मोठ्या चाकाला फिरवतो तेव्हा तो टेकू किंवा अक्षसुध्दा फिरू लागतो. मोठ्या चाकाला फिरवणे सोपे असते, परंतु अक्ष किंवा आस फिरवणे खूप अवघड असते. अक्ष किंवा आस एका फेरीमध्ये खूपच कमी अंतर कापतो पण त्यासाठी खूप ताकद लावावी लागते. परंतु एखाद्या मोठ्या चाकाला या अक्षावर जोडल्यास हे काम सोपे होते. एखाद्या वजनदार वस्तूला चाकाच्या मदतीने अगदी सुलभ तऱ्हेने फिरवता येते. वववाह करून पहा : लाकडी आणि रबरी या दोन्ही चाकांपैकी कोणते चाक सुलभ तऱ्हेने काम करू शकेल? चाकाचा आकार मोठा केल्यास काम सोपे होईल की अवघड? &] 3 'प्रथम' बाल विज्ञान मेळावा /५/




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now