पालकनीती - फरबरी -2013 | PALAKNEETI - FEBRUARY 2014

Book Image : पालकनीती - फरबरी -2013 - PALAKNEETI - FEBRUARY 2014

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती « फेब्रुवारी २०१४ बेशिस्त थांबवणं शक्‍य होतं; पण हे परिणाम कायमस्वरूपी नसतात. हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूनं शिक्षांचे मुलांच्या मनावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यामुळे त्यांची स्वयंप्रतिमा बिघडते. ही कधीही भरून न येणारी हानी आहे. शिक्षा झाल्यानंतर मुलांच्या मनात खालील पाच प्रकारच्या धारणा मूळ धरू शकतात - १) राग-संताप : मोठी माणसं हे जे वागताहेत ते योग्य नाही. हा अन्याय आहे. मी यापुढे यांच्यावर विश्वासच ठेवणार नाही.' २) सूड : आत्ता ते जिंकलेत खरे पण मीही माझ्या पद्धतीनं जिंकून दाखवीनच.' ३) प्रतिकार : ते म्हणतात ना मग नाहीच ऐकणार. मी नेमकं उलटच वागून दाखवतो. ' ४) माघार घेणं : आत्मविश्‍वासाचं खच्चीकरण - 'मी काही कामाचा नाही. ५) सुटका करून घेणं नाही. पुढील काळात या धारणांवर आधारित मुलांचं वागणं आकार घेत राहतं. उदाहरणार्थ - मोठ्या माणसांकडून सातत्यानं होणारी टीका झेलावी लागल्यामुळे एकतर मूल, 'मी असाच आहे. असा समज घेऊन पूर्वीप्रमाणेच वागत राहतं, नाहीतर वरच्यांच्या पुढं पुढं करून त्यांना खूष करायचा प्रयत्न करतं. स्वत:च्या वागण्याची समर्थनं देण्यातच मुलं सगळी ताकद वाया घालवतात. यातून मुलांमध्ये सकारात्मक बदल होतच नाहीत. संपूर्ण मोकळीक, लाड ज्या पालकांना शिक्षा करणं योग्य वाटत नाही ते अनेकदा मुलांचे अति लाड करण्याच्या दुसऱ्या टोकाकडे झुकतात. मुलांवर मनापासून प्रेम केलं तर मुले आपोआपच, त्या प्रेमापोटी येणाऱ्या जबाबदारीनं वागू लागतील अशी त्यांची धारणा असते. प्रेम करणं म्हणजे मुलांची काळजी घेणं, त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं, त्यांना काही अडचण येणार नाही याची शक्‍य ती सर्व काळजी घेणं, त्यांच्याकडून अपेक्षा न करणं असं वागलं जातं. खरंतर हे सारं प्रेमापेक्षाही लाडांच्या दिशेनं जाणारं वागणं आहे. पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांची स्वत:च्या वागण्याची जबाबदारी घेण्याची संधीच हिरावून घेतली जाते. त्यामुळे त्यांच्यात अनेक जीवनावश्यक क्षमता विकसितच होत नाहीत. ती इतरांवर : पुढच्या वेळी मी पकडला जाणार मुलांना दोष देऊन आधी त्यांना दुःखी-हताश वाटायला लावलं, तरच नंतर ती 'चांगली' वागतील अशी विचित्र कल्पना आम्हा मोठ्यांच्या डोक्यात कुठून बरं आली असेल? मुलांमध्ये खालील जाणिवा आणि कौशल्यं विकसित होणं फार आवश्यक आहे. १) शहाणपणानं परिस्थिती समजून घेणं. २) स्वतःच्या भाव-भावना जाणणं आणि त्यांचा स्वयंनियमनासाठी उपयोग करणं. ३) इतरांबरोबर सहकार्यानं काम करू शकणं. संवाद आणि वाटाघाटींतून, मैत्रीपूर्ण संबंधांची जोपासना करणं. ४) आयुष्यातल्या प्रश्‍नांना, अडी-अडचणींना जबाबदारीनं, लवचीकतेनं, एकात्मिक पद्धतीनं उत्तरं शोधणं. वरील क्षमतांच्या विकसनाची संधी मुलांना मिळाली की त्यांच्यामध्ये मी सक्षम आहे अशी जाणीव निर्माण होऊ लागते. 'मी विचार करू शकतो. माझे जीवन बदलू शकतो. परिस्थितीला सकारात्मक दिशा देऊ शकतो. मी महत्त्वाचा आहे. इतरांना माझी गरज आहे', अशा आत्मविश्‍वास रुजवणाऱ्या जाणिवा त्यांच्या मनात तयार होतात. लहानपणापासून मुलांना जर मोठ्या माणसांबरोबर लहान- मोठ्या कामांमध्ये, त्यासाठीच्या विचार विनिमयामध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळाल्या, तर वरील जाणिवा आणि कौशल्यं नैसर्गिकपणे रुजू शकतात. अवलंबून राहू लागतात. पुढं जाऊन त्यांना 'सभोवतालच्या लोकांनी माझी काळजी घेणं, लाड करणं हा माझा हक्कच आहे', असं वाटू लागतं. ती मोठ्या माणसांना गृहित धरायला लागतात. कुठलीही गोष्ट 'करायची' सवय नसल्यानं तशी वेळ आली की ती गोष्ट टाळण्याचाच'* विचार अशा मुलांकडून केला जातो. ही मुलं भोवतालच्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावण्यातच आपली सगळी शक्ती खर्च करू लागतात. सकारात्मक शिस्त प्रथम शिस्त म्हणजे नेमकं काय हे समजावून घेऊया. घरात, शाळेत, गटात, समाजात अशा कोणत्याही ठिकाणी सर्वांना आनंदानं राहता यावं याकरता सर्वांचं हित साधलं जाईल आणि कोणावरच अन्याय होणार नाही असे काही नियम बनवावे लागतात. कामांच्या, जबाबदाऱ्यांच्या वाटण्या कराव्या लागतात. असे नियम ठरवणं आणि सर्वांनीच त्यांचं सर्वतोपरी पालन करणं म्हणजे शिस्त, सुयामितता!'* सत्तेच्या उतरंडीची विषम व्यवस्था असलेल्या समाजात मात्र वस्च्यांसाठी आणि खालच्यांसाठी वेगवेगळे नियम बनतात. वरचे त्या नियमांतून आणि जबाबदाऱ्यांतून सूट मिळवतात आणि खालच्यांसाठी आमिषं व शिक्षा या मार्गानं नियमपालनाची सक्ती केली जाते. इथंच भ्रष्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now