पालकनीती - मार्च -2013 | PALAKNEETI - MARCH 2013

PALAKNEETI  - MARCH 2013 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लेखांक - ७ (ऑरईड ल्लॉपं व्छार्यर्च्य? पात दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास होतो म्हणून नवरा तिला घेऊन आला होता. तपासणीच्या खोलीत मी तिला तपासत होते, तेव्हा ती घाबरलेली वाटली. डॉक्टर सब ठीक है ना? इस तकलीफ की वजहसे मुझे बच्चा नही होगा ऐसा तो नही? मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, आत्ता तर तू बावीस वर्षांची आहेस. रक्तस्राव थांबल्यानंतर आपण बघू काय करायचं ते, काही काळजी करू नकोस.” बाहेर येऊन ती नवऱ्याशेजारी बसली. ती गप्पच होती. नवराच काही काही बोलत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला, कामाच्या दृष्टीनं महत्त्वाचा फोन असावा, माझ्याशी बोलणं सोडून तो मोबाईलवर बोलत बोलत केबिनच्या बाहेर गेला. केबिनचं दार त्याच्यामागं बंद झाल्याबरोबर, तिनं माझा हात धरला. पुन्हा मघासारखीच थरथर ' डॉक्टर बताओना मुझे. कुछ नही होगा ना? मुझे बच्चा हो सकता है ना? मेरे ससुरालवाले....'' मी तिच्याशी बोलायला लागले. तिला मूल-मुलगी नकोच डॉ. प्रतिभा कुलकर्णी मासिक पाळीच्या चक्रामध्ये अनियमितता आहे असं कळल्याबरोबर सासरच्या लोकांनी तिला मूल होणार किंवा नाही याची चर्चा सुरू केलेली होती. “माझी पाळी नियमित येत नाही. त्यामुळे मला मूल व्हायला प्रॉब्लेम होणार, त्यामुळे माझे सासूसासरे आणि नवराही नाराज आहे. एवढंच नाही, तर त्या घरातलं माझं स्थानही नक्की नाही किंबहुना माझं काय करतील सांगता येत नाही.” हे सगळं तिनं त्या दोन वाक्यात सांगितलं. तिचा चेहरा आणि डोळे तिच्या शब्दांपेक्षा जास्त बोलत होते. मोबाईलवरचं बोलणं संपवून नवरा परत केबिनमध्ये आला. हिचा चेहेरा परत निर्विकार झाला. पण डोळ्यातील भीती लपत नव्हती. माझ्या मनात विचार आला, बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणही असणाऱ्या घरातल्या मुलीची ही अवस्था आहे. कुठलंही तर्कशुद्ध कारण नसताना तिला इतक्या मानसिक ताणाला सामोरं जावं लागत आहे - वयाच्या बाविसाव्या वर्षी ! आणि कुठे आम्ही स्त्रियांच्या समानतेच्या, न्मानाच्या, सबलतेच्या गप्पा मारत आहोत ! लिंगाधारित गर्भपाताच्या चर्चेमध्ये अनेक मुद्दे येतात. मुलगा हवाच ही पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकता, ख्तरीचं कुटुंबातील दुय्यम स्थान, तिच्या स्थानाची, कर्तृत्वाची अवहेलना, गर्भलिंगनिदान करून घेण्यास नकार देण्याची तिची असमर्थतता, तिच्या वाट्याला येणारा दुय्यमपणा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा चर्चेमध्ये येतात. जनगणनेमधील घटत जाणारं मुलींचं प्रमाण हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. त्याबद्दल चर्चा झाल्याबरोबर सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि जणू काही सोनोग्राफी मशीनच दह्या सगळ्या दुष्टचक्राला कारणीभूत आहे असं चित्र निर्माण झालं. सोनोग्राफी मशीनला सील करून त्या डॉक्टरांवर आरोपपत्र दाखल करणं हाच एक ह्या प्रश्नावरचा उपाय आहे असं वाटू लागलं. पण खरोखरच तेवढाच उपाय आहे का? कडक कारवाईच्या भीतीनं काही दिवस सोनोग्राफी मशीन बंद राहत असणार. काही डॉक्टर थोडा काळ का होईना ह्या प्रवृत्तीपासून दूर झाले असतीलच. ह्याचा अर्थ सरसकट सगळेच डॉक्टर हे गैरकृत्य करत होते किंवा करतात असं नाही. मूठभर स्त्री रोगतज्ज्ञ, रेडिआलॉजिस्ट ह्या गैरवर्तनामध्ये आहेत. तरीही ह्या प्रश्नाचा विचार दह्याच्याही पलीकडे जाऊन करायला हवा असं वाटतं. मुलगा हवाच हा अट्टहासही केवढा असू शकतो हे पाहताना कधी कधी थक्क व्हायला होतं. कधी कधी एकच मुलगा पुरत नाही, दुसराही हवा असतो. संगीता ३६ वर्षांची होती. तिच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइडच्या ३ मोठ्या गाठी होत्या. त्यामुळे प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी खूप रक्तस्राव होऊन तिला त्रास होत होता. तिच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अगदी कमी असंच राहत होतं. ऑपरेशन करून गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याची आवश्यकता होती. तिला दोन मोठ्या मुली होत्या. एक सोळा वर्षाची, दुसरी चौदा वर्षाची. पालकनीती ७ मार्च २०१३ र श्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now