विज्ञान युग -2 | VIGYAN YUG -2

Book Image : विज्ञान युग -2 - VIGYAN YUG -2

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तयार आहे. तुम्ही हा प्रयोग करू शकता...'”_ ह र क्य आनंद क होता. डॉ. शिरीष केतकीकडे पहात राहिले व तिच्या मनाचा चि केबीनमंधनं बाहेर पडतांना केतकीचा चेहरा समाधानानं उजळून निघाला होता. मन्पृत ल गाधळ असला तरी, विज्ञान नवीन,काहीतरी करू पहातंय्‌ म्हणून तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं - तशीच ती केतन होता त्या खोलीत आली. केतन जागा झाला होता. त्याचे अस्थिर डोळे लकलकत होते. चेहरा एखाद्या निरागस बालकाप्रमाणे दिसत होता. केतकीनं पुन्हा मायेनं त्याला न्याहाळल. तोंडात पाण्याचे थेंब सोडताच, केतननं लहान मुलासारखी ओठावरून कि फिरवली. त्याच्या डोळ्यात केतकी विषयीची कृतज्ञता दाटून आली. केतकीनं त्याचं डोकं मांडीवर घेत, केसातनं हात फिरवला-आणि आजच्या चर्चेचाच ती विचार करीत राहिली द्विस जाऊ लागले. केतनच्या चाचण्यांना सुरुवात झाली होती. शस्त्रक्रियेपूर्वी अनेक चाचण्यामधन केतनला जावं लागत होतं. संवेदना नसल्याने त्याला कुठलाच त्रास होत नव्हता ' 'केतकी प्रत्येक वेळी सावलीसारखी त्याच्या जवळ होती. आतापर्यंतचा तिचाही प्रवास जीवघेणाच ठरला होता. अपघातानं ती वाचली होती, पण नंतरच्या असंख्य वेदनांना एकटीनंच सामोरी गेली होती. तिचं भावविश्‍व पार उध्वस्त झालं होतं... आवश्यक तेवढ्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. प्रयोगाची तारीखही ठरली होती. चार- पाच दिवसांचा अवधी उरला होता. केतकी बर्‍यापैकी निवांत झाली होती. आज कधी नव्हे ती कॉरिडॉरमध्ये येऊन उभी होती. वाऱ्याची थंड झुळूक चेहऱ्यावर येत असल्याचे. तिला आल्हाददायक वाटत होतं. डॉ. शिरीष मध्येच तिच्या मनात डोकावून जात होते त्यामुळे उ त्याविषयीचा आत्मविश्‍वास अधिकच बळकट होत असे.... बराच वेळ ती उभी होती मॅडम 55... उ र मागून आलेल्या आवाजानं ती दचकली व मागे वळून पाहिलं. डॉ. शिरीष स्मित हास्य करीत उभे असलेले पहाताच ती सावरली.... आणि तेवढ्याच स्मित हास्यानं प्रतिसाद देत उत्तरली, डॉ. शिरीष !.... आपण?*' र उ ''होमीच!...का?मीयेऊ नये का?” उ ' ' नाही, तसं नाही... '' केतकी ओशाळत म्हणाली होती... मंडम्‌ , बरेच दिवस तुम्हाला भेटावं म्हणून-मनात होतं. पण निवांत वेळच मिळत नव्हता आज तो अशा वेळी मिळाला... एक विचारू ?”' र ज केतकीनं, डॉ. शिरीषाकडे पाहिलं. ... हळूच स्मित करीत तिनं मान डोलावली, 'बिचारा - | त्त र नी टी मला अजूनही बाटत्‌य की तुमच्या मनात या प्रयोगाविषयी गोंधळ आहे, संभ्रम आहे अस का वाटतय्‌ याची कारणमीमांसा मला अजूनही करता येत नाहीये. म्हणूनच मी तुम्हाला २८ 7 विज्ञानयुग “7 दीपावली २००० या विषयी पुन्हा भेटून सविस्तर सांगण्याचा निर्णय घेतलाय्‌... डॉ. शिरीष मनातलं बोलले ' होते. ““तसं नाही डॉ. शिरीष. माझा आपणावर पूर्ण विश्‍वास आहे... “तरीही मागील चर्चेत मला हे सारखं जाणवत राहिलं, की हा निर्णय आपण भावनेच्या भरात घेतलाय म्हणून. त्यावेळी मी फारसं बोललो नाही. कारण आपल्याच संशोधनाबद्दल आपणच फारसं बोलणं बरं नव्हे. पण त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचं ठरवेलय्‌. त्यानं पुन्हा निर्णय घेण्याचं बळ आपणास मिळेल. ' डॉ. शिरीषांचा स्वर गंभीर होता. केतकीनं डॉ. शिरीषांकडे स्नेहपूर्वक पाहिलं. तिला हा तरूण अतिशय बुद्धिमान असल्याची पूर्ण प्रचीती आली. हे खरंच होतं की ती आजही संभ्रमावस्थेत होती. परिणामांविषयीची अथवा डॉ. शिरीषांच्या संशोधनाविषयीची फारशी माहिती तिला नव्हतीच. डॉ. शिरीष म्हणाले, “'पंडम 5 5 ... मीं लहान होतो. कळावं असंच माझ वय होतं. आमचे आजोबा गंभीर पक्षाघातानं आजारी पडले. अचानक आलेल्या आरिष्टानं व घरातील कर्ती व्यक्ति अशी पांगळी झालेली बघून सारेच हबकून गेले होते. मला आजही आठवतंय. पुढे बरेच दिवस ओढाताणीत गेले होते. आजोबांची परिस्थिती खूपच खालावली होती. सगळंच अंग लुळं पडल्याने घरातील ओढाताण अपरिहार्य होती. पूर्वी जो दुःखाचा डोंगर कोसळला होता, तो आता ओसरू लागला होता. घरातील लोकच आतार त्यांचं करायला टाळाटाळ करू लागले. त्यामुळे आजोबांची स्थिती अजूनच दयनीय होत गेली. परावलंबी जीवन वाट्याला आल्याने तेही खचले होते. आजोबांच्या संवेदनाहीन देहापेक्षा, आप्तांच्या त्यांच्याविषयी होत जाणाऱ्या बोथट संवेदनाच मला जास्त झोंबून गेल्या. पुढे ते कधी मरतात याचीच सर्वजण वाट पहात होते. माणसामाणसातील, भावबंधातील हे स्थित्यंतर विलक्षण होतं. ज्या माणसान तुमच्यासाठी आयुष्य वेचलं, त्याच्याच मरणाची वाट पहाणं कृतघ्नताच नव्हती काय? ... पुढे आजोबा नशिबानं गेले; तो प्रसंग मात्र माझ्या मनावर कायमचाच ठसा उमटवून गेला. अशा परिस्थितीत अगदी आई, वडिल, मुलगा, प्रियकर कसे वागतील काहीच सांगता येत नाही. पुढे मी मोठा झालो. खूप शिकलो. परदेशात गेलो..पण मनात कुठतरी आजोबांची होणारी घुसमट तशीच राहिली. उ उ उ डॉ. शिरीष क्षणभर थांबले. आजोबांची प्रतिकृती त्याच्या डोळ्यासमोर आली असावी. केतकीही त्यांच्या या विलक्षण भावविश्वाचा शोध घेऊ पहात होती. डॉ. शिरीष पुढे म्हणाले... ' “अनुषंगाने मला अशाच विषयात रुची निर्माण झाल्याने, संशोधनाची संधी चालून आली. त्या दृष्टीने विचार करून मानवी विचार तरंगांना संवेदन असतील असे अतिसूक्ष्म अग्र मी तयार केले. साधारण १०” सें.मी. एवढे आणि त्या अग्रात मेंदुत निर्माण होणाऱ्या क्रियाशीलतेचा. आलेख तयांर होऊन, त्या आलेखाचं एका इलेक्ट्रानिक युक्तीद्वारे विद्युत संदेशात रूपांतर करून, बाहेर असलेल्या यंत्रमानवाशी लांबून जोडली. अशा बऱ्याच चेतना पेशीकांपासून विज्ञानयुग 7 दीपावली २०००-२९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now