तोत्तोचान | TOTTOCHAN

TOTTOCHAN by तेत्सुको कुरोयांगी - TUTSUKO KUROYANGIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

तेत्सुको कुरोयांगी - TUTSUKO KUROYANGI

No Information available about तेत्सुको कुरोयांगी - TUTSUKO KUROYANGI

Add Infomation AboutTUTSUKO KUROYANGI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
12 तौत्तोचान दिवस कधी उजाडतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोत्तोचान त्या दिवशी मात्र कुणीही न उठवता उठून व्यवस्थित आवरुन शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती, घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे ''रॉकी.'' जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा, त्याला मात्र तोत्तौचानचं आजचं वेगळं वागणं समजेचना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेल या आशेनं. आईला बरीच कामं होती. तिनं '“काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं'' घालून घाईघाईनं डबा भरला. तोत्तोचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून हरवू नये म्हणून. तिच्या गळ्यात घातला. “शहाणी मुलगी हो !*' तोत्तोचानच्या कैसातून हात फिरवीत बाबा म्हणाले. “हो तर !*: बूट घालता घालता तोत्तोचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, '“अच्छा55$5.”' आईच्या डोळ्यात टच्‌कन पाणी आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतून काढून टाकलं होतं यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. “'परेमश्वरा, यावेळी तरी सर्व काही नीट होऊ दे!'* आई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. क्षणातच तोत्तोचनाला गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना पाहून तिला धक्काच बसला. '“अगं राणी तू...'* पण तिनं शांतपणे काय होईल ते बघायचं ठरवलं. शॉकीच्या गळ्याते पास घालून, तोत्तोचाननं खाली वाकून त्याला सांगितलं, ''ए, पण हा पास तुला छान नाही दिसत.'' उ पासाची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. ''हा माझा पास आहे. तुझा नाही. कळलं? तुला नै कै गाडी बसता येणार. पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरच्या माणसाला विचारेन, तुला गाडीत बसू देतील का? आणि तुला शाळेत येता येईल का म्हणून, हं?” रॉकी कान टवकारुन तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्यानं जांभई दिली. तोत्तोचान पुढे सांगत राहिली- ''आमच्या वर्गाची गाडी हालत नाही त्यामुळे त्यात बसायला बहुधा तुला तिकीट पडणार नाही, पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब हॅ55.'” रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं. तोत्तोचाननं पास व्यवस्थित गळ्यात घातला. आणि परत एकदा ओरडून आई-बाबांना 'अच्छा' केला आणि वळूनसुध्दा न पाहाता ती स्टेशनकडे पळत सुटली आणि तिच्या मागोमाग रॉकीही. तोत्तोचान 13 स्टेशनचा आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा रस्ता एकच होता. त्यामुळे तोत्तोचानला रस्त्यात तिच्या ओळखीची 'मनीमाऊ' भैटली आणि तिच्या जुन्या शाळेतील मुलं-मुली सुध्दा. तोत्तौचान आज डावीकडे न वळता उजवीकडे स्टेशनच्या बाजूला का वळली हे बिचाऱ्या रॉकीला उमगेचना. तो इकडे तिकडे बघत असेपर्यंत तोत्तौचान स्टेशनच्या फाटेकापर्यंत पोचली होती. इतक्यात तिच्या लक्षात आलं. ती गांधळलेल्या रॉकीकडे वळून म्हणाली, '“मी आज नेहमीच्या शाळेत नाही चाललेय. आजपासून किनई मी नव्या शाळेत जाणारे.'' तिनं रॉकीच्या गालावर गाल घासले. त्याच्या कानांचा वास तोत्तोचानला फार आवडायचा. 3 ''अच्छा5$55.*' तिन॑ रॉकीला सांगितलं आणि दारावरच्या माणसाला पास दाखवून तिनं स्टेशनच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली, ती नजरेआड होईपर्यंत रॉकी रोपूट हालवत पाहात राहिला. झुक्गाडीतला वर्ग तोत्तोचान जेव्हा आगगाडीच्या डब्यांपाशी पोचली तेव्हा अजून कोणीसुध्दा आलं नव्हतं. तिला जिथे बसायचं होतं तो डबा तिला मुख्याध्यापकांनी सांगून ठेवला होता. तो एक जुन्या पध्दतीचा आगगाडीचा डबा होता, त्याच्या दाराला बाहेरच्या बाजूनं असलेली मूठ धरुन दार सरकवता यायचं. तोत्तौचानचा आनंद गगनात मावत नव्हता. '“अय्या$$5!'* ह्याच्यात बसून शिकायचं म्हणजे मस्त गावाला निघाल्यासारखं वाटणार. खिडक्यांच्यावर अजूनही सामान ठेवायचे कप्पे होते. फरक एवढाच होता, की डब्याच्या एका बाजूला फळा होता आणिं आगगाडीत असलेल्या लांब-लांब बाकांऐवजी एका बाजूला तोंड केलेली शाळेची बाकं होती. हातांनी पकडायचे चामडी पट्टे तेवढे काढून टाकले होते. बाकी सगळा डबा जसाच्या तसा होता. ती आत शिरली आणि एका खुर्चीवर जाऊन बसली. इथल्या लाकडी खुर्च्यासुद्धा मागच्या शाळेतल्यासारख्याच होत्या. तरीही या खुर्चीवर दिवसभर बसावंसं तिला वाटत होतं. तौत्तीचानला ही शाळा इतकी आवडली, की कधीसुद्धा दांडी न मारण्याचा तिनं निशश्‍चयच करुन टाकला. तिनं खिडकीबाहेर बघितलं. खरं तर गाडी एका जागेवर उभी आहे हे तिला माहीत होतं. पण बाहेरच्या बागेत डोलणाऱ्या झाडांफुलांमुळे असेल कदाचित्‌ तिला गाडी हॅलल्यासारखी वाटत होती. किती मज्जा!:' अखेर ती मोठ्यानं म्हणाली. खिडकीच्या काचेला नाक लावून तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ती खुषीत असली, की असंच गुणगुणत असे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now