पालकनीती - अगस्त -2013 | PALAKNEETI - MARATHI - AUGUST 2013

Book Image : पालकनीती - अगस्त -2013 - PALAKNEETI - MARATHI - AUGUST 2013

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती /१६ ऑगस्ट २०१३ २0860 क्ष ब्ष(क्ष/ब10 १50, २९५06 411097. 00 16 01 &्षेली रणा, निव ५०. एकत एडन 2001/4166 -ि60586160 ४०. “४७ ४-50/2012-2014 म्हणे मंत्रालयातून जी.आर. निघाला की, मंदिरात येताना भाविकांनी पादत्राणं मंदिराबाहेर काढूनच आत जावं. मंदिरापुढील चौकीदार रोज जी.आर.ची अंमलबजावणी होते की नाही पाहायचा. एक दिवस एक भाविक अनवाणीच आला. चौकीदारानं त्याला हटकलं, म्हणाला, “तुम्ही जी.आर. वाचला नाही काय? मंदिरात जाण्यापूर्वी चपला बाहेर काढूनच आत जावं. भाविक म्हणाला, ' होय, म्हणून तर मी अनवाणी आलो. चौकीदार म्हणाला, नाही चालणार, प्रथम घरी परत जा, चप्पल घालून या. मंदिराबाहेर काढा, मगच मंदिरात जा. मला वाटतं या पथकाचंही म्हणणं असंच आहे. विद्यार्थी शंभर टक्के हजर असतील तर त्यांना गैरहजर ठेवा, मग गुण घ्या. विशेष गरजा निर्माण करा, मग गुण घ्या. मुलांचं स्थलांतर घडवून आणा, मग गुण घ्या. खरं तर, अशा मूल्यमापनातून शाळेचा आरसा मुख्याध्यापक आणि शिक्षकांपुढे यावा, पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची संधी व प्रोत्साहन मिळावं, ही अपेक्षा असताना त्याचा वरील पद्धतीनं वापर करणारे अधिकारी शिक्षणक्षेत्रातील भयावह प्राणी वाटू लागतात. महत्त्वाचा भाग आहे. तसंच “मूल आपल्या कुवतीप्रमाणं शिकतं', प्रत्येकाचा शिकण्याचा काळ हा वेगवेगळा असतो*, मूल स्वत: शिकतं हे मान्य केलं गेल्यानंतरही मुलांची ज्या पद्धतीनं तपासणी केली जाते, ते अधिक धक्कादायक आहे. मी वरती दिलेल्या प्रसंगातच इतिहास आणि भूगोलाच्या विविध प्रश्‍नांची उत्तरं देणाऱ्या, गणिती क्रिया आणि श्रुतलेखन उत्तम असणाऱ्या मुलीला गट शिक्षणाधिकाऱ्याचं नाव काय, गटविकास अधिकारी कोण आहेत, ज्ञानरचनावाद म्हणजे काय, असेही प्रश्‍न विचारले गेले. इयत्ता चौथीच्या मुलीला ज्ञानरचनावाद विचारणं म्हणजे स्वत:ची वैचारिक आणि शैक्षणिक दिवाळखोरी जाहीर करणंच नाही का? शाळा आणि शिक्षकांवर फुली मारणाऱ्यांना नामदेव ढसाळांच्या शब्दात बदल करून विचारावंसं वाटतं, या शाळा तपासनिसांची श्रेणी कंची.......... ?* 8 गजानन देशमुख, मांजरखेड, ता. चांदूर, २००५च्या शैक्षणिक आराखड्यात “सर्वसमावेशकता? हा अतिशय शर्मिला रो ह्या समाजशासाच्या अभ्यासक, स्त्रीवादी विचारवंत आणि पुणे विद्यापीठातील ख्त्री- अभ्यासकेंद्राच्या संचालिका होत्या. विद्यार्थ्यांचं सन्मानपूर्वक आणि मनापासून ऐकून घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी विद्यार्थीप्रिय शिक्षिका, ही त्यांची आणखीन एक महत्त्वाची ओळख होय. विशेषत: संधी-वंचित विद्यार्थ्यांना वेळ आणि चाकोरी यांच्या पलीकडे जाऊन त्या सर्वतोपरी मदत करत असत. स्त्रीवादाशी आणि जाति-अंताच्या विचारांशी असणारी त्यांची बांधिलकी त्यांच्या सर्व विचार, कृती आणि लेखनातून दिसून येते. विविध विद्याशाखा आणि लिंगभाव / स्त्री अभ्यास यांच्या कप्पेबंद बांधणीला प्रश्न विचारत ते मुक्त आणि लिंगभाव -संवेदनशील कसं करता येईल यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या होत्या. पालकनीती परिवाराच्या वतीनं शर्मिला रेगेंना आदरांजली. जि. अमरावती येथे शिक्षक आहेत. 9$४6$पाती72(छतक्ष.0० ग्य सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण : बेैठक-वृत्त शिक्षणहक्काचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्रयोगशील शिक्षक, तज्ज्ञ आणि शिक्षणकर्मींनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करणारे, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण' हे संमेलन जानेवारी २०१२ मध्ये वर्धा येथे झाले होते. या उद्दिष्टाचा पाठपुरावा करून संलग्न मूद्यांची चर्चा करण्यासाठी २७ जुलैला मुंबईमध्ये एक बैठक झाली. प्रत्येक मूल शिकू शकते असा विश्वास बाळगून, वेगवेगळ्या पद्धती - साधनांचा वापर करून एखादा विषयघटक प्रत्येक मुलाला समजावा ह्यासाठी अनेक प्रयोगशील शिक्षक - शिक्षणकर्मी महाराष्ट्रात कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रितपणे काम करता यावे यासाठी इंटरनेट, मोबाईल फोन अशा तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करता येईल, काही संस्थांची उपलब्ध संकेतस्थळे (वेबसाईट) वापरता येतील किंवा नवे संकेतस्थळही सुरू करता येईल, असा विचार या बैठकीतून पुढे आला. हे काम पुढीलप्रमाणे केले जावे असे ठरले. ० शिक्षणहक्क कायदा व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मधील तत्त्वे आणि एम.एस.सी.आर.टीच्या अभ्यासक्रमानुसार हे काम असेल. ० एक शिक्षिका, एका वर्गात, एका विषयघटकासाठी करीत असलेला प्रयोग, त्यातील अनुभव, महाराष्ट्रातील असे अनेक प्रयोग, त्यांत सापडलेली समस्यांची उत्तरे संकेतस्थळावर असतील. « मूल चांगले शिकत आहे का याचे सहज वापरण्याजोगे विषयवार निकष संकेतस्थळावर असतील. ० शक्‍य तिथे स्थानिक व्यक्तींच्या सहभागाने प्रत्यक्ष गटचर्चाही होतील. ० वर्गातील बरीचशी मुले शिकत असतील तर न शिकणाऱ्यांपैकी आणखी एक मूल शिकविणे या उद्दिष्टाने काम व्हावे. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. न शिकणाऱ्या मुलाला शिकविता आले की आत्मविश्वास वाढतो, समाधान मिळते, उरलेल्या मुलांनाही शिकविण्याचे आव्हान स्वीकारावेसे वाटते. अशा पद्धतीने प्रत्येक मूल शिकणे आणि प्रत्येक शिक्षकाचा आत्मविश्वास वाढणे याकडे जाता येते. या योजनेबाबत तुमच्या सूचना 93॥९७040(9008॥.000) अथवा ९८१९१४४८९८ यावर कळवाव्यात. पालकनीती ७ ऑगस्ट २०१३ ।्ठ श्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now