सुलतानाचा ज्योतिषी | SULTANCHA JYOTISHI

Book Image : सुलतानाचा ज्योतिषी  - SULTANCHA JYOTISHI

More Information About Authors :

नीलाम्बरी जोशी - NIILAMBARI JOSHI

No Information available about नीलाम्बरी जोशी - NIILAMBARI JOSHI

Add Infomation AboutNIILAMBARI JOSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

बार्बरा आणि माईन- BARBARA AANI MAAIN

No Information available about बार्बरा आणि माईन- BARBARA AANI MAAIN

Add Infomation AboutBARBARA AANI MAAIN

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बायकोनं एक सुस्कारा टाकला आणि ती म्हणाली, “हे बघा. आत्तापर्यंत मी स्वत:ला खूप भाग्यवान समजत होते. पण सुलतानाचा प्रमुख ज्योतिषी राजवाड्यातच रहातो हे मला आज सकाळी कळलं. प्रमुख ज्योतिषाची बायको माझ्यापेक्षा जास्त महागडे आणि चांगले कपडे घालते. तिच्या हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांपुढे माझ्याकडचे दागिने मामुली आहेत. मी या असल्या आयुष्यात बिलकुल आनंदात नाहीये. तुम्ही सुलतानाचे प्रमुख ज्योतिषी बना. नंतरच मला आनंद लाभेल.” “माझ्या प्रिये, तू मत्सराग्रीत का बरं स्वतःला झोकून दिलं आहेस?” लाकूडतोड्यानं बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला. “आपण कष्टाळू लोक आहोत. या गोष्टी आपल्याला शोभत नाहीत. आपल्याकडे जे काय आहे त्यात तू आनंदी रहा.” तुम्ही एक वेळ उंटावरुन खड्ड्यात उडी मारुन तो खड्डा पार करु शकाल, पण मूर्ख माणसाला तर्कबुध्दिनं विचार करायला सांगू शकत नाही. लाकूडतोड्याच्या बायकोनं आता एकच लकडा लावला होता - सुलतानाच्या राजवाड्याच्या आत रहाण्याचा.. “जा” तिनं नवऱ्याला हुकूम सोडला. “तुम्ही सुलतानाचे प्रमुख ज्योतिषी होत नाही तोपर्यंत तुम्हाला या घरात जेवायला मिळणार नाही.” बिचाऱ्या लाकूडतोड्यानं आपल्या मानेमागे हातांची घडी घालून विचार करायला लागला. डोक्यावर एक छत असावं अशी लाकूडतोड्याची समजूतदार असल्यामुळे माफक अपेक्षा होती. ती त्याला जगण्यापेक्षा जास्त महत्वाची वाटत होती. त्याच्या लायकीपेक्षा आत्ताचं घर कितीतरी चांगलं होतं. खरं तर आहे यापेक्षा चांगलं घर आपला नवरा देऊ शकत नाही हे बायकोला समजायला हवं होतं. लाकूडतोड्याला चुकीच्या भविष्यवाणीचे घातक परिणामही ठाऊक होते. प्रमुख ज्योतिषी बनणं तर दूरच, त्याला आत्ताच्या कटकटींपासून मुक्तता हवी होती. जोपर्यंत त्याच्या मनात भीती होती तोपर्यंत त्याला कोणत्याच घरात - मग ती झोपडी असो वा राजमहाल शांतता लाभणार नव्हती. तेवढ्यात लाकूडतोड्याला एक युक्ती सुचली. ती सोपी आणि सरळ असल्यामुळे लाकूडतोड्यानं ती लगेच अंमलात आणायचं ठरवलं. सुलतानाला आपला ज्योतिषी बुध्दिमान वाटत असल्यामुळे, लाकूडतोड्यासारखा मूर्ख त्या पदाला कसा लायक ठरेल? असा विचार करुन आपण मूर्खासारखं वागलं म्हणजे सुलतान ज्योतिषावर विश्वास ठेवणंच बंद करेल असं त्यानं ठरवलं. ज्योतिषाच्या पदावरुन मुक्त झाल्यावरच तो अल्लानं दिलेलं आयुष्य आनंदात घालवू शकणार होता. त्या दिवशी तो दुपारपर्यंत थांबला आणि सगळ्या लोकांनी आपलं कामकाज थांबवल्यानंतर तो महालाच्या मधोमध उभं राहून जोरजोरात ओरडायला लागला..“सुलतान.. सुलतान.. कोणी सुलतानाला पाहिलं आहे का? त्वरा करा.. त्वरा करा.. आपल्याला पटकन सुलतानाला वाचवायला हवं.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now