हरी नारायण आपटे | Hari Naaraayan Aapate

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
4 MB
                  Total Pages : 
68
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :
गं. ब. ग्रामोपाध्ये - Gn. B. Gramopadhye
No Information available about गं. ब. ग्रामोपाध्ये - Gn. B. Gramopadhye
म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar
No Information available about म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जन्म आणि बालपण 09
तो ग्रंथालयात बसून वाचण्याचा. तेथे खास विद्यार्थ्याचे ग्रंथालय होते पण त्या वेळी
त्यात मराठी पुस्तके नव्हती. ती केवळ हरीच्याच प्रयत्नाने आणि अर्जविनंतीने या
ग्रंथालयात येऊ लागली. याच कॉलेजात त्याला अनेक मित्र लाभले. तो कोटीयुक्त
बोले म्हणून त्याच्या भोवती मित्रमंडळी जमत. गोल्डस्मिथच्या शी स्टूरप्स ट॒ काकर
या नाटकात त्याने टोनी लुम्किनचे काम केले तर समर्थ आणि पानसे यांनी अन्य
पात्रांची कामे केली. भारतीय खेळात त्याला विशेष रस नसला तरी तो टेनिस
चांगला खेळे आणि होडी वल्हवणे जरी त्याने कधी केले नाही तरी होड्यातून सफर
करण्यात तो रमे. वर्षाच्या अखेरीस तो प्रिलिमिनरी परीक्षेस बसला पण गणितात
नापास झाला आणि म्हणून तो विद्यापीठाच्या परीक्षेला बसू शकला नाही. आता
त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला की, त्याचे सहाध्यायी पुढे गेले होते आणि तो मात्र
मागे राहिला होता, म्हणून त्याच सुमारास नव्याने सुरू झालेल्या फर्ग्युसन कॉलेजात
जायचे त्याने ठरविले. या कॉलेजात वामन शिवराम आपटे (श्रेष्ठ संस्कृत पंडित)
गो. ग. आगरकर, व्ही.बी. केळकर आणि टिळक (नंतर लोकमान्य झालेले) ही
प्राध्यापकमंडळी संस्कृत, इतिहास, इंग्रजी, गणित आणि अन्य विषय शिकवीत.
हरीला प्रा. केळकरांचे इंग्रजी शिकवणे फार आवडायचे. नंतरच्या काळी दोघांची
दीर्घकाळ मैत्री जमली आणि ते परस्परांशी वाड्मयावर चर्चा करीत.
वर उल्लेखिल्याप्रमाणे त्या काळचे लोक रेनॉल्डची पुस्तके वाचीत आणि
डेक्कन कॉलेजात असताना हरीने मिस्टटीज ऑफ दि कोर्ट ऑफ लंडन वाचलेले
होते. आता त्याने त्याच्या पहिल्या दोन प्रकरणांचे भाषांतर केले. त्याचा हा प्रयत्न
त्याच्या मित्रांना आवडला. वैद्य यांनी ती दोन भाषांतरीत प्रकरणे पुणे वैभवच्या
संपादकाला दाखवल आणि त्यांनीही ती लगेच मधली स्थिती या नावाने आपल्या
पत्राची पुरवणी म्ह५[न छापली. या प्रकाशनाने मोठी खळबळ उडाली. रावबहादुर
व्ही.एम्. महाजनी आणि के.एन्. साने यांच्यासारख्या प्रसिध्द लेखकांनी या अनाम
लेखकाचे अभिनंदन करणारी पत्रे संपादकाकडे पाठवली. नाट्यकथार्णवच्या
संपादकानेही लेखकाचे अभिनंदन केले आणि पुढील प्रकरणाची आपण वाट पाहत
असल्याचे कळवले. पुणे वैभव च्या ज्या अंकात हरीची दोन प्रकरणे प्रसिद्ध झाली
होती त्याच अंकात त्याने कादंबरीच्या प्रयोजनावर एक लेख लिहिला होता आणि
त्यात त्याने व्हिक्टोरिया राणीच्या काळची कल्पना मांडली होती. त्या कल्पनेनुसार
समाजाच्या वास्तव चित्रणाच्या दारे रंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन करणे हे
कादंबरीचे प्रयोजन होते. हरीची कादंबरी तर ती प्रसिद्ध करणार्या पत्राच्या
धोरणाच्या विरोधी होती, पण वाचकांचा अनुकूल प्रतिसाद इतका प्रचंड होता की
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...