विचार शिल्प | Vichaarashilpa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vichaarashilpa by रा. ग. जाधव - Ra. G. Jadhavळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

More Information About Authors :

रा. ग. जाधव - Ra. G. Jadhav

No Information available about रा. ग. जाधव - Ra. G. Jadhav

Add Infomation About. . Ra. G. Jadhav

ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

No Information available about ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

Add Infomation AboutLakshman Shastri Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाटतात. मराठी निर्बंधांच्या पाठ्यपुस्तकात त्याच त्या जुन्या लेखकांचे तेच ते निबंध वर्षांनुवर्षे पहावयास मिळतात. नव्या ज्ञानाची व विचारकार्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे नव्या पिढीला नव्या विचारांची ओळख करून देण्याची संधी ह॒कते. इतिहास, धम, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक विचारवंतांचे ग्रथ समाविष्ट होत नाहीत. शास्त्रीजींसारख्या कितीतरी विद्वानांचे विवारप्रवर्तक लेखन आधुनिक मराठी विद्यापीठांत प्रवेश्वू नये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. श्रेष्ठ विचारवंतांचे छेखन नाना प्रकारे व नाना घाटांतून समाजापुढे येत राहिले पाहिजे. पण या बाबतीत आपली सामाजिक जाणोव बोथट आहे. *विचारशिल्य १ सादर करण्यामागे एका श्रेष्ठ विचारवंताचे महत्त्वाचे लेखन नमुना म्हणून तरी घरोघर पोहोचावे, अशी तळमळ आहे. एका मोठ्या ज्ञानगंगेचे हे पाटाचे पाणी आहे, ते सुलभपणे दारी यावे असे मनापासून वाटते. या पाण्याचा रंग महत्त्वाचा नाही; तर त्याची चव जीवनदायी आहे हे महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींच्या लेखनाचे सोंदर्य विचारांत आहे, दलीत नाही. याचे कारण शाल्रीजींची विचार करण्याची पद्धतीच शुद्ध तर्कसंगतीबर भर देऊन शुद्धविवार घडविणारी आहे. तिला लालित्याची गरज जाणवत नाही. मुद्दाम विचार खुलबावा, असे त्यांना वाटत नाही. पंडिती विचाररीतीमध्ये लाहित्याला वाव नसतो असे नाही; पण त्याची आवश्यकता असतेच असेही नाही. “पात्र सोन्याचे असो मृत्तिकेचे ! वेड मजला आतल्या अमृताचे, ” अशी काहीशी बाह्य शैलीविषयी शाम््रीजींची कल्पना असावी. महत्त्व अमृताला आहे; ते सुवणेपात्रात आहे की मृत्यात्रात आहे याला नाही. पण याचा अर्थ शान्त्रीजींच्या लेखनांत रसिक विवेचनाची स्थळे नाहीत, असे नाही. शाख्रीजी माणूस म्हणून विलक्षण रसिकसंपन्न आहेत. ऐंद्रिय संवेदनांची श्रीमंती ते अनुभवू शकतात व व्यक्तही करू शकतात. पण यासाठी विचारग्रतिपादनाला छालित्याचा संकर ते ऊदसूट करीत नाहीत. “शेली म्हणजे व्यक्ती १? (*स्टाइल इज दी मॅन?) असे म्हटले जाते, ते शास्त्रीजींच्या लेखनदीलीला पूर्णपणे लागू पडते. शास्त्रीजी कोणत्याही गोष्टीकडे विचाररष्टीने पाह्यचे म्हटले, की एक प्रकारच्या तकशुद्ध गांभीर्याने पाहतात विचारांकडे क्रीडारृष्टीने पाहण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यामुळे वरवरच्या
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now