गावरान - गीता | Gaavaraan Giita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaavaraan Giita by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) ' मी म्हणालो * शहर गांवांत सुखाचीं साधनं असतात. पण इथं तीं नाहींत म्हणून कांहीं अडत नाहीं. आपण अगदीं पहांटे पासूनचा दिनक्रम घेऊं, शहरांत आम्हांला पहांटे उठायला घड्याळावर गजर लावून ठेवावा लागतो. पण मी इथं आल्यापासून पहांटे उठला नाहीं असं कधीं तरी झालेलं तूं पाहिलं आहेस काय! ” “मग तें कसं होतं, दादा?” “ अरे तुझा खुराड्यांत कोंडलेला कोंबडा अगदीं कसा वेळेवर ओरडतो ! गजर लावायला एखाद दिवस विसरली कीं घड्याळ मला कसं उठविणार पण कोंबड्याला गजर कुणी लावून ठेवला सांग ? तो अंधारांत असला तरी पहांट झाल्याचं त्याला नक्की समजतं. तसंच पहांट झाली कीं त्या शेजारच्या घरांतल्या बायका दळण घालून गाणीं म्हणूं लागतात. किती गोड गळा अन्‌ किती गोड गाणीं! राजे लोकांना जागे करायला पगारी भाट बडबडायला ठेवावे ठागत म्हणे. पण या प्रेमळ गाण्यांची सर त्यांना येईल काय ? दळण दळीत, घरकाम करीत, या घरच्या देवी इकडे उद्योग- झील पुरुषांना जागे कारतात, आणि उलट अवेळीं जाग्या झालेल्या आपल्या मुलांना, मांडीवर पडल्या पडल्या, गाण्याच्या नादांत झोंप आणतात. जाळ तीं कर्कश गजरीं घड्याळे. आणि ऊन्ह पडूं लागल्यावर तर नुसती सावली पाहून किती वाजळे असतील हें मी सांगूं शकतों. हवं कशाला घड्याळ !? “आतां चळ पुढं. शहर गांवांत सकाळीं घरच्या घरीं प्रातर्विधीची सोय असते. पण कोण ती तिथली घाण ! म्हणे पाण्यानं स्वच्छ होणारे नव्या पद्धतीचे संडास ! पण तिथंच कितीतरी डांस. आणि जर कां पाणी कमी पडलं म्हणञ मग? आहेच तुला मुंबईचा अनुभव ! उलट इथं शैपन्नास पाउलं चालत गेलों कीं प्रातर्विधीला किती तरी मनपसंत सोईच्या जागा ! या कामीं मारवाडी लोकांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. अगदीं शहर गांवच सोडलं तर, मारवाडी सकाळीं उठून प्रातविंधीला बाहेर लांब ' मेल्याशिवाय आढळायनचा नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now