तरुण हिंदु नागरिक | Taruna Hindu Naagarik

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Taruna Hindu Naagarik  by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अहंकार व॒ अभिमान डे आचर वट टी वटी टी अटी टी टी पटी वटी चिड टी फी वीट विटी पिळी टी वि अटी पी ची जिन जट चली ्टीिटजाच्न आ ल्न ्टा्शासाच्साीच्य जरी आ्नाच्न पनाच्य स्टाज्टीरनम आर्ट रर अरा किवा अहंकारनिष्ठ व्यकतीपासूनच, सगळ्या मनुष्यसमाजाची उत्पत्ति आहे. तेव्हां आतां आपण आपला अहंकार इतरांपासून वेगळा कसा प्रगट करणार ? याविषयीं आपणाजवळ काय साधन आहे ? तर अर्थात प्रारंभीं नाम व रूप ! वेदान्तातील ब्रह्माला देखील जेव्हां अनेक होण्याचा खेळ खेळावासा वाटला, तेव्हां त्याला नाम व रूप यांचाच आश्रय करावा लागला. म्हणूनच भिन्न पदार्थांना भिन्न नांवें व भिन्न ख्यें मिळालीं. मुळांत एकच व एकजिनसीच ब्रह्म असतां, या खेळांत अखेर वेगवेगळेपणा इतका साधला आहे कीं, जगांतील कोट्यानुकोटी वस्तूंपैकीं कोणतीही एक वस्तु दुसऱ्या कोणत्या हि वस्तूसारखी तंतोतंत असतच नाहीं. कांहींतरी सूक्ष्म असा वेगळेपणा हा राहातोच. अनुभवानें त्या वेगळंपणाचा परिचय होऊन वेगळेपणाच्या खुणा ध्यानांत राहातात, व त्या खुणांवरून एक व्यक्ति दुसरीहुन वेगळी अक्षी निवडून काढतां येते. प्रथमदर्शनीं आपल्याला सगळे गोरे युरोपियन लोक एका- सारखे एक वाटतात. पण स्वतः त्यांचें त्यांना तसें कधीं वाटत नाहीं. आणि, आपणही थोड्याशा परिचयानें हा इंग्रज, हा परेच, हा जर्मन, हा रशियन हा आर्मीनियन असे वेगवेगळे लोक हुडकून काढूं शकतों. आम्हाला चिनी माणसें क्वचित्‌ दिसतात म्हणून तीहि एकासारखीं एक वाटतात. पण ३५ ते ४० कोटी चिनी लोक न ओळखून काढण्याइतके एकासारखे एक असतील काय ? मुळींच नाहीं. अनेक धनगरांचीं मेंढरें रानांत मिसळलीं तरी जी तो धनगर आपलें मेंढरू ह॒टकन हुडकन काढतो च. जी गोष्ट ख्पाची, तीच नांवाची. खूप हें सुष्टिनिमित असतें, म्हणून रूपांत वेगळेपणा राखण्याची खबरदारी स्वतः सुष्टिच घेते. पण नांवांत वेगळेपणा राहुण्याची खबरदारी कांहीं युक्तिप्रयुक्तीने आपणालाच घ्यावी लागते, व ती आपण घेतों हि. प्रिय वाचका, स्वतः तुझेंच उदाहरण तू॑ घे. आणि नीट पहा बरें ! सगळ्या जगांत अगदीं थेट तुझ्याच नांवाचीं माणसें किती आढळतील ? मला नाहीं वाटत दहापांचहि आढळतील; व तीं आढळलीं तरी तुझ्याच जातींत किवा पोटजातींत आढळतील. आणि तींहि इतक्या लांबलांब ठिकाणीं असतील कीं, व्यव- हारांत तीं एकत्र येऊन त्यांमुळें गोंधळ होण्याचा संभव फारच कमी असतो. आपणा दक्षिणी हिंदुलोकांत व्यक्तिनामें हीं देवांचीं ठेवण्याची रीत आहे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now