श्रीनरसिंह सरस्वती | Shri Narasingh Sarasvati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Narasingh Sarasvati by रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

More Information About Author :

No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

Add Infomation AboutRamchandra Chintaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाद्वारांतील चिल्तन धे आधिक जुना नाहीं, खिस्तसनोत्तर काळांत संपूर्ण भारतांत भक्तीचा जो वेगवान्‌ खोत निर्माण झाला, त्याच्या उगमाच्या कांहींसे आगि-मागे दत्तात्रेय या देवतेचा उद्‌भव झाला असावा, असं माझ निरीक्षण आहे. खिस्त- सनाचे पहिलें सहक (इ. स. १ ते १००० ) वेचारिक आव्दोलनांनी, प्रयोगांनी आणि संघषीनी व्यापलेले होतं. या काळांत बौद्धधर्माने तांत्रिक साघनेचें स्वरूप चारण केले होत आणि त्या तांत्रिक साधनेच्या जटिल आचारांचा संभार हिंदु संग्रदायांनीहि उत्कटतेने अंगीकारला होता, रूढ सनातन परंपरेविरुद्ध बौद्ध, जेन आणि हिंदु अशा तिन्ही धर्मकक्षांतील समर्थ साधकांनी वैचारिक बंड उभारले होते, वेदविरोध; वर्णाश्रमातीतता, योगप्राघान्य) गुरुसंस्थेचे महिमान आणि एक प्रकारची उन्मुक्त चिंतन- शीलता या गुणविशेषांनी भारलेली सिद्धांची मांदियाळी या तिन्ही घमीत वावरत होती. या सिद्धांच्या आचार-विचाराने-विशेषतः बौद्ध सिद्धांच्या बंडखोरीन प्रतिष्ठित साधनाप्रणालीला आणि जीवनमूल्यांना आव्हानच दिले होतें, या आव्हानाने रुढ सनातन परंपरा अत्यंत अस्वस्थ बनली होती. परंतु या सनातन परंपरेचा एक गुणविशेष असा ' आहे कीं, ती सनातन असूनहि लवचिक आहे. बंडखोरीपुढें कांहींशी माधार घेईल, द्रणागति पत्करील आणि स्वतःचे उदर मोठें करून सारी बंडखोरी त्यांत रिचवून टाकील, थेट उपनिषत्काळापासून या दोन संघर्षशील प्रवृत्तींचा समन्वय घडवीत घडवीत सनातन परंपरा टिकून राहिली आहे. दत्तात्रेयाच्या जडण- घडणींतहि सनातनी आणि विद्रोही या दोन परंपरांचा संघर्ष आणि समन्वय कारणीभूत झाला आहे, ह आपणांस पुढें दिसून येईलच, खिस्त सनाच्या पहिल्या सहखकांतील सर्व वेचारिक खळबळीचें आणि प्रतिभावन्तांच्या समन्वयकारी सर्जनशीलतेचें स्पष्ट प्रतिबिंब दत्तंदवतेच्या उदय-विकासांत दिसून येतं, ह प्रतिबिंब न्याहाळण्यासाठी खिस्त सनाच्या पहिल्या सहखकांतील पुराणें, नव्य उपनिषदे आणि तांत्रिक साधनेचे साहित्य घांढोळून पाहिलें पाहिजे, या साहित्य-संभारांतील दत्तविषयक उल्लेखांचा उपसा करून दत्तात्रेयाचे प्राचान स्वरूप कसे दिसून येते; त्याचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार आपण या प्रकरणांत करणार आहोत,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now