संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन | Sanskrit Vidhechen Punaruziivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन - Sanskrit Vidhechen Punaruziivan

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन असें सहसा व्हावयाचें नाहीं. फार काय पण त्या वेळचा अग्रगण्य समाज- सुघारक राजा राममोहन रॉय हा स्वतः चांगला संस्कृत पडित असतांहि त्यानें इग्रजी शिक्षणाचीच तरफदारी करून कंप्रनीसरकारकडे अर्ज घाडला होता, ही गोष्ट सुप्रासिद्धिच आहे. राममोहन राय यांची सस्कृताची आवड व आर्यविद्येचा अभिमान मेकालेहून पुष्कळच अधिक होता यांत शका नाहीं. परंतु इंग्रजी भाषेच्या द्वारे युरोपिअन विद्या शिकविण्याच्या बाब- तींत त्या दोघांचें ऐकमत्य होतें ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. मेकॉलेच्या मनांत आर्यविद्येविषयीं तिरस्कार होता म्हणून इंग्रजी शिक- वावें असें त्याचें घोरण होतें; राममोहन राय याच्या मनांत आर्यविद्येचा यथार्थ अभिमान असतांहि, ती विद्या निःसंशय अपूर्ण आहे.व तिच्या पूर्णतेस भरती दाखल धालण्यासारखे इंग्रजी वाढ्ययांत पुष्कळच आहे, ह तो जाणत होता म्हणून इंग्रजी शिक्षणास त्याची अनुकूलता होती. मेकालेचें ज्ञान एकांगी होतें व राममोहन राय यांचे शान उभयांगीं होतें. तथापि, दोहोंनीं दिलेला अभिप्राय एकच होता. याच कारण आमच्या तरी नजरेस असें दिसतें कीं, भोतिक शास्त्र व इतिहास यांच्या शानाची या दोघांनाहि विशेष किंमत वाटत होती; व हें शान देणारे ग्रथ संस्कृत भाषेत फारसे नाहींत अशी दोघांचीहि खात्री असावी. धर्म, नीति, मानसशास्त्र वगैरेसंदंधानेंच वाद असता तर, मेकॉलेसारख्याचे तिरस्कार- युक्त आक्षेप खोडून काढणे कोणासह सहज शक्‍य झाले असते. आणि राजा राममोहन रॉयासारख्या सुधारक व स्वदेशाभिमानी विद्वानाखर मेकॉलेच्या पदरांत त्याच्या चुकीचं माप घालतां आलें असतें. पण त्या वेळ विद्येचा विचार झाला तो भौतिकशास्त्रविषयक ग्रंथाच्या गुणावगुणा- वरच झाला हँ निर्विवाद आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now