चन्द्रगुप्त नाटक | Chandragupt Naatak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
136
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र चंद्रगुप्त नाटक
राज०/-तेंही होणार नाहीं. नुसतं देवदशनाला जायचं असलं तरी
या वेळीं मी सोडणार नाहीं. आर्य चाणक्यांच्या आशेवरून राजसभा आतां
इतक्यांतच भरायची आहे. या वेळीं तरी राजवाड्याच्या मार्गात मला
गर्दी होऊं देतां कामा नये, जा बाबा, फिरून केव्हां तरी ये, नाहीं तर
राजाज्ञा घेऊन ये.
बाळि०:-( हंसून ) बरं आहे बाबरा ! तं. नाहीं सोडीत तर नको सोडू
आंत. काय पहा! मीं नवा राजासुद्धां अजुन पाहिला नाहीं डोळ्यांनीं, मग
मला राजाज्ञा कशी मिळणार १ एरब्हींच मला जातां आले तर पहातो.
मला या राजवाड्याचे गुप्त माग इतके चांगले माहीत आहेत, कीं मक्षे
डोळे बांधून जरी मल सोडलं तरी मी ते सारे फिरून येईन, राजवाड्यांत तूं
माझा प्रवेश होऊं न दिलास, तरी राजसभा आतां इतक्यांत भरणार
आहे ही वार्ता तूं मला सांगितलीस, हे तुझे माझ्यावर मोठे उपकार झाले.
ही राञसभा मला पाहिलीच पाहिजे. नंदांच्या वेळच्या राजसभा आणि
प्रस्तुतची ही चंद्रगुत्ताची राजसभा यांत सरस नीरस कसं काय दिसतं हें
मला पाहिलंच पाहिजे! बेस बरं बाबा तं खुदा राजद्वार राखीत | मुंगी-
बिंगीचा कुठं चुकून प्रवेश होईल कीं काय पहा. राजसमेंचा देखावा
पहायला मी तर 'चाललीच गुत मार्गानं, [ जातो. ]
राज०:-( हंसून ) निःस्ट्ह माणसं विक्षिप्त असतात असं म्हणतात त
कांहीं खोटं नाहीं ! [ जातो व पडदा पडतो. ]
ण
प्रवेश दुसरा.
स्थळ--पाटलीपुत्र नगरच्या राजवाड्यांतील सभामंडप,
[ मध्यभागीं उचासनावर आर्य 'चाणक्य बसला आहे. उजवीकडे राजा
खंद्ररुत्त नम्रपणे उभा आहे, डावीकडे सरदार, शिपाई वगरे दूर
उभ आहेत. ]
चाणक्यः-चेद्रगुतता, कुसुमपूरच्या लढाईचं वर्णन ऐकून माझं मन कसं
“समाघान पावलं, शाबास, शिष्य असावा तर असाच असावा, तूं आपल्या
पराक्रमाची शर्थ केलीस.
User Reviews
No Reviews | Add Yours...