पेशवाईच्या सावळींत | Peshavaaiichyaa Saavaliint

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshavaaiichyaa Saavaliint  by नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar

More Information About Author :

No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar

Add Infomation AboutNarayan Govind Chapekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२), नाण्यांच्या नावांचे लेखन एकाच तऱ्हेचे बुद्धिपुरस्सर ठेवलें नाही. उ. सिक्का, दिक्का दोर्नाह रीतींनी हा शब्द लिहिलेला आढळेल. मंडळांत वाचण्यासाठी मी ज्या नोंदी अगर मजकूर कच्च्या वहीत उतरून घेतला होता तो सवंच प्रस्तुत पुस्तकात छापला गेला नाही. ह्यास्तव अनुमान- सिद्धीला आवश्यक वाटला तेथे त्या वर्दीतून अधिक मजकूर प्रस्तावनंत समाविष्ट केला आहे. ह्या पुस्तकार्ची अकरा प्रकरण आहेत, एकंदर मजकुराची फाळणी विषया- नुसार केली आहे; तयापि ह्या कार्मी हलगर्जीपणा झाला आहे ही गोष्ट कबूल करणे भाग आहे. द्विरुक्तीच्या दोषाचे समथन करावयाचे झाल्यास एकच रकम पण अनेक विषयांसंबंधाने तिला महत्त्व येऊ शकत असें म्हणतां येईल. परंतु अशा रीतीने खरा दोष उडवून मोकळं होणे ह्यांत ह॒टवादीपणाच दिसून येण्या- सारखा आहे. खासगाीवाल्यांचे कागद वाचून मीं एक स्वतंत्र लेख लिहिलेला मंडळाच्या त्रेमासकात प्रसिद्धहि झाला होता; परंतु अनवघानाने तो ह्यांत सामील करावयाचा राहेला. ही चुकी प्रस्तावना लिहावयास घेतल्यावर नजरेस आली; त्यामुळे तो “संकीर्ण” ह्या शेवटल्या प्रकरणांत घालावा लागला. २ रा. बर. वाड ह्यांच्या पेशव्यांच्या रोजनिशांप्रमाणे “पेशवाईच्या सावलींत?* हा आधारपम्रंथ आहे. दोनहि ग्रंथांचे स्वरूप एकच; फरक इतकाच की, पहिल्या ग्रंथांत पेशवे व भोसले ह्यांच्या रोजनिशांतील उतारे प्रायः घेतलेले आहेत, तर प्रस्तुत पुस्तकांत पेशव्याचे नोकर व चिपळूणकरांसारखे व्यापारी ह्यांच्या बम[खतवातील रकमांचा उपयोग बव्हंशी केलेला आहे. ठुळशीबागवालळे, कल्याणचे सुभेदार, खासगीवाले, वेद्य व चिपळूणकर ह्यांची दसरें तपासून त्यांतील माहितीचा झा पुस्तकाकरता उपयोग केला आहे. पेकी, ठुळशीब्रागवाले व चिपळूणकर ह्यांचे कागद भा. इ. सं, मंडळांतच होते. खासगीवाले यांच्याकडील कागद खोल्मपूरचे के. रा. ब. साठे ह्यांच्यामाफैत मला मिळाले, वेद्य व कल्याणचे सूमेदार ह्यांची माझा ओळख असल्यामुळे मी मागतांच त्यांनी आपलीं दत्तर माझ्या स्वाघीन केलीं. तुळशीब्रागवाल्यांच्या चामड्याच्या पुठ्याच्या शिवलेल्या वह्या आहेत. कीर्दवह्ीला रोजनामा म्हटलेले असून त्या सालची दुसरी वही म्हणजे खतावणी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now