माझा नाटकी संसार १ | Maajhaa Naatakii Sansaar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माझा नाटकी संसार १  - Maajhaa Naatakii Sansaar 1

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझा नाटकी संसार फा क नी होण्याच्या आशेला अंकुर फुटला आणि पुढं पाऊल टाकायला सुरवात करण्यास उत्तेजन आलं. त्या योगायोगाच्या सामथ्यांवरच आजवर एवढा मागे काढतां आला. ज्यांच्या पायाशीं बसण्याचीही व्यावहारिकटष्टया माझी लायखी नव्हती अशा थोर आणि माननीय व्यक्तींच्या खांद्याला खांदा भिडवून आवडत्या क्षेत्रांत मला लढतां आलं--इतकंच नव्हे, तर अशा सामथ्येशाली व्यक्तींच्या मनगटाला मनगट घासूनही आपण कांही कतेबगारी दाखवित आहोंत, असा भास होण्याइतकी सुसंधि लाभली. म्हणूनच आज मला माझ्या नाटकी संसाराच्या पसाऱ्याची बखर करणे साध्य झाले. या माझ्या कफियतीकडे' पहातांना, “* सहानुभूतीनं पहा * असं म्हणण्याच्या वेळीं, “ सहानुभूति * या शब्दाचा अर्थ व्यापक करावा लागेल. अनुभूति सारखी असायला--सह-अनुभूति असायला-त्याच क्षेत्रांत त्याच प्रकारचं काये ज्यांनीं केलं असेल त्यांच्याकडेसच ही याचना करावी लागेल. पण या क्षेत्रांतील मागं माझ्यासारखाच आक्रमण करणाऱ्या व्यक्तींशी माझी ही याचना नाही-- अनुभूतांशीं नाहीं. प्रेक्षकांशी आहे. तटस्थ, मध्यस्थ, आणि विरोधक या सर्वानी आपापल्या दृश्टिकोणाप्रमाण या माझ्या इतिहासाकडे पहातांना, तो एका माणसाचा इतिहास आहे, हे ध्यानांत ठेवायला विसरू नये, एवढंच माझं मागणं आहे. ३ झ $$ अज्ञाणत्या आठवणी माझ्या नाटकी संसाराला प्रत्यक्ष सुरवात केव्हां झाली हें सांगण्यापूर्वी तो संसार सुरू व्हायला कारणं काय झालीं आणि केव्हांपासून झालीं, हें मी आधीं सांगणार आहें. अगदीं लहानपणची आठवण. त्यावेळीं माझं वय चारपांच वर्षाचं असेल. पहिलं नाटक पाहिल्याची ती आठवण अजूनही डोळ्यासमोर आहे. नाटक ध्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now