साहित्य आणि संसार | Saahitya Aani Sansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य आणि संसार  - Saahitya Aani Sansaar

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक्षर वाड्ययाचा गुणविशेष ७ केवळ, त्याच एका विवक्षित राष्ट्राला त्यांच्याविषयीं आफुलकी वाटावी असें नव्हे, तर एकंदर मानवजातीला त्यांविषयीं जिव्हाळा वाटावा असा कांहीं तरी गुण त्यांच्या ठिकाणीं असतो. (मनुष्यामनुष्यांत ज़ अनेक भद प्रसंगोपात्त व स्थलपरत्वाने निमाण झाले आहेत त्यांच्या गढूळ पाण्याखालीं कमलपत्राप्रमाणें शोभणारे अखिल मानवजातीच्या अतः करणाचे एकत्व असल्याची साक्ष पटविणाऱ्या गोष्टी या विचित्र संसा- राच्या व्यवहारांत फार थोड्या आहेत. पण त्या थोड्या गोष्टीतील अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी कोणती असें विचारले, तर “ अक्षर वाड्यया 'च्या पदवीला पोचलेल्या ललित कतींची परंपरा अर्सेंच उत्तर द्यावे लागेल. प्रथम दद्शनीं या प्रकाराचें कितीहि आश्चर्य वाटलें, तरी थोड्याशा विचाराअंती त सहज नाहींसे होण्यासारखे आहे. देशपरत्वे व कालपरत्वे मनुष्यामनुष्यांत अनेक भेदभाव निर्माण होतात खरे; परंतु मानवी अंतः- करणाचे कांहीं धर्म असे आहेत, कीं त्यांस अविनाशी म्हटलें पाहिजे. राग, द्वेष, वात्सल्य, प्रणय, असूया, लोभ, अहकार इत्यादि विकार मनुष्यमात्राच्या अंतःकरणांत कोठेंहि आणि केव्हांहि असणारच. हे विकार प्रगट होण्याच्या तऱ्हा भिन्न भिन्न असतील; परंतु, त्यांचे मूल- स्वरूप म्हणून कांहीं तरी आहे, आणि ते शाश्वत आहे. मानवी संसारांतील सारीं लहान मोठीं सुखदुःख या विकारांच्या क्रियेप्रतिक्रियैतूनच निमाण होत असतात, व त्यामुळे या सुखदुःखांचा बाह्य आकार जरी स्थल- कालपरत्वे बदलला, तरी त्यांचेहि मूलस्वरूप शाश्वत आणि अचल असते. अमर ठरलेल्या ललित कृती या शाश्वत आणि सववसामान्य मनोधमीच्या आणि सुखदुःखांच्या अधिष्ठानावर उभ्या असतात, म्हणूनच त्यांपासून मिळणारा आनंद कोणाहि सह्दय मनुष्यास केव्हांहि मिळूं शकतो, आणि त्या ललित कृती जरामरणाच्या पलीकडे जाऊन बसतात. “ इतिहासांत सन आणि नांवें यांबेरीज कांहीं खर नसते; उलट नाटकांत अगर कादंबरीत सन आणि नांवें यांखेरीज सव गोष्टी खऱ्या असतात १ असें अ एका पंडिताने म्हटले आहे त्यांत मोठें मम आहे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now