सन्दर्भ - अंक 99 | SANDARBH- ISSUE 99

SANDARBH- ISSUE 99 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उल्लेख करते. दारा शुकोहने शेतीबद्दलची निरीक्षणे व नोंदींचे संकलन केले होते. “अमान-अल्‌-अठ्ठाह' करवी केलेल्या त्या नोंदीचे एक पुस्तक उपलब्ध आहे. त्याचे नाव 'नुसूरवा दर फन्नी फुलहत' म्हणजे 'शेतीची कला! त्यातही अशा दोन प्रकारच्या चण्यांचा उल्लेख आढळतो. “लागवडीपूर्वी चोवीस तास गरम पाण्यात भिजवून ठेवले तर मोठे दाणे पैदासता येतात, ' असाही त्यात शेरा आहे. पूर्वी पांढरे चणे आणि लाल-काळे-पिंगट चणे असा भेद सांगितला जाई. आईन-ए-अकबरी 'मध्ये “काबुली चणे असा स्पष्ट उल्लेख आढळतो; मात्र पांढरे मोठे' म्हणजे काबुली चणे वगळता इतर चणे देसी* चणे हे नामकरण अलीकडे विसाव्या शतकातले असावे. उदाहरणार्थ, वॅटच्या ग्रंथात देसी' चणे हे आताचे रूढ व्यापारी वर्णन आढळत नाही. अल्लाउद्दिन खिलजीच्या काळातील पिकांची वर्णने मिळतात. त्यावरून पावसाळ्यात 'उडीद व मटकी आणि पावसाळ्यानंतरच्या मोकळीकीनंतर 'चणे' आणि त्यानंतर 'गह्‌' किंवा बार्ली असा पिकांचा क्रम असे. पूर्वीपासूनच पावसानंतर मिळणाऱ्या वाफशावर 'चणे* घेण्याची पद्धत रूढ असावी. खेरीज अन्य डाठींप्रमाणेच गहू, ज्वारीच्या जोडीने मिश्र पीक' म्हणून चण्याची लागवड करत असावेत. वॅटने शैक्षणिक संदर्भ अंक - ९९ नोंदविलेल्या आकडेवारीनुसार गव्हाबरोबर घेतलेल्या चण्याचा दर हेक्‍टरी उतारा बराच जास्त आढळतो, मात्र निव्वळ चण्याच्या शेतातील उत्पादन कमी आढळते. काबुली चण्याची ख्याती आणि मिजास पूर्वीपासून आहे. 'आईन-ए- अकबरी'मध्ये नोंदलेल्या किंमतीनुसार इतर चण्यांच्या जातींपेक्षा काबुली चणे दुप्पट किंमतीला मिळायचे. चण्याच्या साठवणुकीबद्दल एक विशेष रूढ पद्धत आढळते. राख आणि तेल मिसळून ती चण्याला लावून चणे साठविण्याचा रिवाज आहे. ही पद्धत रोमन व अरबी लोकांची आहे; मात्र अन्य डाळींत ती नजरेस यावी अशा प्रमाणात आढळत नाही. जुन्या काळात अन्यधान्यांच्या पिठात डाळीचे पीठ कालवून शिजविले जाई. “भाजणी या नंतरच्या 'साठवणुकी' पिठाचा हा पूर्वावतार असावा आणि त्या काळचे इन्स्टंट फूड' देखील. चरकसंहिता 'चण्याचे सूप* पिण्याची शिफारस करते. बहुधा हिंदुस्थानातही अरबी -इराणी लोकांप्रमाणे चण्याचा रगडून केलेला ताजा 'वाटणा'सारखा रगडा ऊर्फ 'हुम्मुस' हा पदार्थच प्रचलित असावा. आजही मध्यपूर्वेमध्ये कोणत्याही प्रकारच्या 'नान' अथवा रोटीबरोबर हेच कालवण म्हणून खाह्ले जाते. बारीक दळून केलेल्या पिठाच्या पिठल्याऐवजी जाडसरपणे रगडलेल्या ताज्या १७
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now