सन्दर्भ - अंक 97 | SANDARBH - ISSUE 97

Book Image : सन्दर्भ - अंक 97 - SANDARBH - ISSUE 97

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चुका करणे म्हणजे अक्कल चापरणे लेखक : रवीकान्त * अनुवाद : यशश्री पुणेकर दीपालीला गणिताचा गृहपाठ दिला होता. प्रत्येक पानावर चारपाच शाब्दिक गणितं होती. त्यातलंच एक होतं '१५ ट्रकमध्ये ३००० तांदळाचे कट्टे (अर्धपोतं) मावतात तर ८ ट्रकमध्ये किती कट्टे बसतील?' दीपालीला गणित सोडवता येत होतं. शिकवलेल्या पद्धतीनुसार पहिल्या पायरीपर्यंत गणित तिनं सोडवलं. पण इतकी मोठी संख्या बघून तिच्या मनात शंका आली. त्यामुळे तिनं एका ट्रकमध्ये बसणाऱ्या कट्ट्यांच्या संख्येतलं एक शून्य खोडून २०० च्या ऐवजी २० कट्टे असं केलं. त्याप्रमाणे ८ ट्रकमध्ये १६० कट्टे असं उत्तर आलं. तिचा हा गृहपाठ पाहून अनितानं जरा दटावूनच विचारलं, काय हे दीपा? पहिल्यांदा बरोबर उत्तर लिहून त्याच्यावर काट का मारलीस? चांगलं बरोबर आलेलं उत्तर खोडून चुकीचं लिहीलंस! पहिलं जसं सोडवलं होतंस तेच बरोबर आहे. आता पुन्हा नीट कर.” तेव्हा तिनं कारण सांगितलं. शध मी तिथेच बसून हा सगळा प्रकार पाहात होतो. मी अनिताला म्हणालो, अगं उत्तर चुकलं म्हणून चिंता करू नकोस. दीपानं फक्त गणित सोडवायचं म्हणून यांत्रिकपणे सोडवलं नाही, तर हे उत्तर बरोबर आहे का चूक याचा विचारही केला. चूक असेल तर ते कसं दुरुस्त करायचं याबद्दलही उपाय शोधला आहे, आता ते दुरुस्त करण्याच्या नादात तिनं उत्तर चुकवून ठेवलं खरंच. पण गणित सोडवताना तिनं जी पद्धत वापरली ती गणितच नव्हे तर कोणताही विषय शिकताना उपयुक्त ठरणारी आहे. '' मी अनिताला विचारलं, तुला काय वाटलं होतं, दीपानं पहिल्या पायरीपर्यंत गणित केल्यावर काय विचार केलेला असेल? तिला संख्या छोटी करावीशी का वाटली?'*'* अनिताच्या म्हणण्यानुसार त्या पानावस्च्या इतर उदाहरणांची उत्तरे दशक संख्येतच होती, त्यामुळे दीपाला वाटलं की याचं उत्तर इतकं मोठं कसं येईल म्हणून तिनं एक शून्य खोडलं शैक्षणिक संदर्भ अंक - ९७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now