पालकनीति - जून 2013 | PALAKNEETI - JUNE 2013
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
24
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पारंपरिक धनगरी गझी नृत्य अथवा मातीचे बैल किंवा मडकी बनवण्याचा
यासारख्या पारंपरिक कुंभार-व्यवसाय यांचाही अभ्यास मुलं करतात.
हा दृष्टिकोन मिळाला बंगळुरूच्या ॥॥0|8 -0४700क्ष00 01 श्राँ5 या
संस्थेकडून. या संस्थेनं क.निं.बा. व पुण्याच्या रेवाचंद भोजवानी अकॅडमी
या शाळांचा एक संयुक्त प्रकल्प सुमारे तीन वर्ष राबवला होता. त्यातून
कलेकडे शिक्षणाचा व एकूण जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून बघायला
क.निं.बा. शिकली. आपल्या आसपास आढळणाऱ्या नैसर्गिक व
मानवनिर्मित वस्तूंकडं बघण्याचा, त्याचा सुयोग्य वापर करण्याचा दृष्टिकोन
॥-/ नं दिला.
आणि इतर अनेक उपक्रम...
इयत्ता पाचवीपासून मुलं संगणक हाताळतात. पहिल्या दोन महिन्यात
टायपिंगवर हात बसला की मुलांना प्रोग्रॉमिंगसारखं सॉफ्टवेअर शिकवलं
जातं. मुलं आपल्या कथांवर चित्रं काढतात, त्यांना वेगवेगळे इफेक्ट्स
रंगात दंग...
देऊन स्लाईड शोज तयार करतात. शिक्षकही यू-टूबसारखी नव्या
काळातली साधनं वापरून आपल्या अध्यापनाला पुष्टी देतात.
परिसरात निसर्गवाचनासाठी भ्रमंती करणं, वृक्षगणना, परसबागेची
जोपासना, औषधी वनस्पतींची लागवड, फटाकेमुक्त दिवाळी, कागदाचा
पुनर्वापर यासारखे अनेक उपक्रम शाळेत सातत्यानं चालू असतात.
बालसंसद
दर वर्षाच्या सुरुवातीलाच बालसंसदेची निवडणूक होते. लोकशाही
पद्धतीनं गुप्त मतदान करून नवं मंत्रिमंडळ निवडलं जातं. दररोजच्या
स्वच्छतेवर लक्ष ठेवणं, बालक्रीडोत्सव आयोजित करणं, शाळेतील
विविध कार्यक्रमांचं शिक्षकांच्या मदतीनं नियोजन आणि संकलन,
मुलांच्या लहानसहान समस्या सोडवणं यासारखी कामं मंत्रिमंडळ पार
पाडतं.
शिकण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम - प्रकल्प
वार्षिक प्रकल्प हे क.निं.बा.चे वैशिष्ट्य आहे. एक-दोन वर्ग किंवा
कधीकधी संपूर्ण शाळा मिळून देखील एक विषय घेऊन आपापल्या
टप्प्यांवर त्या विषयाचा विविध अंगांनी अभ्यास करते. मिळालेली
माहिती, त्यातून काढलेले निष्कर्ष, त्यातून तयार झालेली नवी समज
असं सगळं चित्रं, कविता, आलेख, प्रतिकृती यांच्या माध्यमातून
मांडलं जातं. हे प्रदर्शन चांगलं मोठं असतं, आणि ते पाहण्यास सर्व
फलटणकरांना निमंत्रण असतं.
प्रकल्पाचे विषय मुलांच्या रोजच्या आयुष्याला, परिसराला स्पर्श
करणारे असतात. त्यामुळं मुलांना ते मांडता येतात. एखाद्या विषयाची
सखोल माहिती मिळवण्याची व त्यातून शिकण्याची प्रक्रिया मुलांच्या
ओळखीची होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
फलटणचा भूगोल, इतिहास, पन्नास वर्षांपूर्वीचं फलटणचं पर्यावरण
यासारख्या मुलांच्या परिसराशी संबंधित विषयांबरोबरच महापूर, वीज,
बालक-हक्क, हिंसा यासारखे विषयही या माध्यमातून मुलांनी हाताळलेले
आहेत.
बालवाडीच्या भातुकलीच्या कोपऱ्यामध्ये मुलगेसुद्धा साडी नेसून
घर-घर खेळतात, स्वयंपाक करतात, भांडी धुतात, अगदी मेकपही
करतात. प्रस्थापित स्त्री-पुरुष स्टिरीओ टायपिंग'ला क.निं.बा. थारा
देत नाही. बालवाडीत नाही आणि पुढंही नाही. वैचारिक बैठक पक्की
असल्यानं या बाबतीत संस्थाचालकांना तात्त्विक संघर्ष करावा लागत
नाही.
फलटणच्या दुष्काळी प्रदेशाची भौगोलिक पार्श्वभूमी, (७०० वर्षांपासून
इतिहासाची आणि महानुभाव पंथाची धार्मिक पार्श्वभूमी, बिरोबा-धनगरांची
सांस्कृतिक पार्श्वभूमी या विस्तीर्ण आणि समृद्ध वातावरणात कमला
निंबकर बालभवन सेंद्रीय पद्धतीनं रुजली. येथे येणाऱ्या मुलांबरोबर
वाढली आणि बहरली. चिंतनशील नेतृत्व आणि शिक्षकांनी तिला
उपक्रम, कृती आणि प्रकल्पांचं खतपाणी घातलं.
आज पंचवीस वर्षं झाली ! कमला निंबकर बालभवनला अनेक
लोक भेटी देतात. कौतुकानं बघतात, भारावून जातात. कमला निंबकर
बालभवन समाजाला काय देऊ शकतं? उपक्रम व प्रकल्प विषयांची
यादी नव्हे तर विचार आणि परिस्थितीचं भान ठेवून शाळारूपी रोपट्याची
निगा कशी राखायची याचा मंत्र ! त्यातून प्रकल्प विषय आणि शैक्षणिक
उपक्रम निरंतर बाहेर पडत राहतील !
०.
तक्षाप्र10९ब'(ळ00008॥.007)
मंजिरी निमकर, माजी मुख्याध्यापिका क.निं.बा.
संचालिका व सचिव, प्रगत शिक्षण संस्था, फलटण.
पालकनीती ७ जून २०१३
-/०
त्र
User Reviews
No Reviews | Add Yours...