सन्दर्भ - अंक 98 | SANDARBH - ISSUE 98
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
82
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सहकार्याची जाणीव झाली होती. याचा अर्थ
असा की वनस्पती आणि बुरशी दोघांनाही
वाढण्यासाठी, बहरण्यासाठी एकमेकांना पूरक
भूमिका फायदेशीर ठरली आणि हळूहळू,
करोडो वर्षांच्या प्रवासात सहजीवनाची ही
प्रणाली विकसित झाली.
वर्तमानकाळात ८०% वनस्पतींच्या
मुळांशेजारी बुरशी आढळते. बीजातून
झाडाचा अंकुर जमिनीवर येतो आणि मुळं
जमिनीत खाली जातात तेव्हाच बुरशीची
वाढ मुळाभोवती सुरु होते. तिचे पातळ तंतू
तिथे आपलं जाळं पसरवायला लागतात.
शर्करा आणि पाणी तसंच खनिज द्रव्याची
देवाणघेवाण सुरु होते. पुढे हे तंतुजाल इतकं
पसरतं की दुसऱया वनस्पतीच्या मुळाशी
जोडलं जातं. या तंतुजालाच्या माध्यमातून
वनस्पतीही एकमेकींशी पाणी आणि
खनिजाची देवाणघेवाण करतात आणि आपलं
जीवन मजबूत करतात. याच सहजीवनाच्या
बळावर जमिनीवर जीवसृष्टी भक्कमपणे उभी
आहे.
याचा अर्थ असा नाही की बुरशी
आणि वनस्पतीचा संबंध फक्त मैत्रीचाच आहे.
परजीवी बुरशी कित्येक वेळेला वनस्पतीमध्ये
रोग निर्माण करतात आणि त्यांच्या मृत्यूला
कारणीभूत ठरतात. पण सहजीवनाच्या
तुलनेत याचं प्रमाण नगण्य असतं. आपलं
जीवन वनस्पतींवर अवलंबून आहे आणि
वनस्पती बुरशीच्या आधारे उभ्या आहेत.
शैक्षणिक संदर्भ अंक - ९८
आपण बुरशीला तुच्छ मानतो. घाणेरडी
आणि गलिच्छ म्हणतो हे किती चुकीचं
आहे. गलिच्छ दिसणाऱ्या या बुरशीनेच
सहजीवनाचा नवा पायंडा पाडून उत्क्रांतीमध्ये
मोठा पल्ला गाठला आहे आणि सजीवांच्या
इतिहासात एका नव्या आणि गौरवशाली
अध्यायाची सुरुवात केली आहे.
खोत फीचर्सच्या एप्रिल २०१५ च्या अंकातून साभार
लेखक : माधव गाडगीळ, हार्वर्ड विद्यापीठातील
पी एच डी नंतर १९७३ ते २००४ या काळात
भारतीय विज्ञान संस्थान बेंगळूरू इथे पर्यावरण
शास्त्रात संशोधन. जैव-विकास, कॉन्जर्वेशन
बायोलॉजी, ह्यूमन इकोलॉजी आणि नैसर्गिक संसाधन
व्यवस्थापन तसंच पर्यावरणीय इतिहास हे त्यांच्या
आवडीचे विषय आहेत. पर्यावरण संरक्षणात त्यांचे
विशेष योगदान आहे.
हिंदी अनुवाद : अरविंद गुप्ले, प्राणीशास्त्र विषयात
उच्च शिक्षणात अध्यापन, उज्जैन इथे प्राचार्य म्हणून
काम, १९९७ मध्ये प्रशासन अकादमी भोपाल मधून
निवृत्त. एकलव्यच्या शैक्षणिक कार्यक्रमात अनेक
वर्षांपासून सहभागी.
मराठी अनुवाद : यशश्री पुणेकर
१७
User Reviews
No Reviews | Add Yours...