विज्ञान युग -1 | VIGYAN YUG -1
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)फर्मी यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो ते रोम विद्यापीठात प्राध्यापक म्हणून
रुजू झाल्यावर. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई नि अवघ्या सव्वीस वर्षीय शास्त्रज्ञाला
हे पद मिळणे, अपवादात्मकहि होते. तथापि फर्मी यांनी आपली या पदावर झालेली
नेमणूक सार्थ ठरविली.
'_ अणुयुगाची
द्वारे उघडणारा.
प्रतिभावंत
_ शास्त्रज्ञ
(1 डॉ. राहूल गोखले
प्रख्यात शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक
विजेता भौतिकीविज्ञ एन्रिको फर्मी यांच्या
जन्मशताब्दीचे हे वर्ष (जन्म : २९ सप्टेंबर
१९०१). फर्मी यांना दीर्घायुष्य लाभले नाही.
२९ नोव्हेंबर १९५४ रोजी, वयाच्या अवघ्या
त्रेपन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र
आयुष्याची ऐन उमेदीची वीस वर्षे त्यांनी
भौतिकशाखाच्या संशोधनात व्यतीत केली.
नियंत्रित अणुकेंद्रीय भंजन विक्रिया साखळी
(चेन रिअक्शन) साध्य करून पहिली
प्रायोगिक अणुभट्टी (रिअँक्टर) उभारली. या
क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांना
१९३८ सालचा नोबेल सन्मान भौतिकशास्त्र
विषयात प्रदान करण्यात आला.
२८ :7 विज्ञानयुग 0 मे / २००१
फर्मी यांचे नाव अणुभट्टीशी जडले गेले
असले, तरी त्यांचे कार्यक्षेत्र तेवढेच नाही.
किंबहुना या शोधाकडे ते पुढे वळले.
तेत ब पिला येते त्याचे शिक्षण झाठे व.
१९२२ मध्ये क्ष-किरणांवरील प्रबंधासाठी
त्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली.
इटालियन सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावर
गॉटिंगेन विद्यापीठात त्यांनी संशोधन केले.
लायडन विद्यापीठात ते १९२४ मध्ये दाखल
झाले व पॉल एव्हरेनफेस्ट यांच्याबरोबर त्यांनी
काम केले. फर्मी यांनी आपल्या संशोधन
कार्यास सुरुवात ही सैद्धांतिक यांत्रिकी
(स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स) विषयातून केली.
फ्लॉरेन्स विद्यापीठात असताना, त्यांनी
अत्यंत कमी तापमानाला वायूच्या रेणूंच्या
होणाऱ्या वर्तनाचे गणितीय स्पष्टीकरण
_ देण्यासाठी सांख्यिकीय नियम शोधून काढले.
_ * हेच संशोधन डीरॅक यांनीहि स्वतंत्रपणे केले
होते. त्यामुळे हे नियम फर्मी- डीरॅक सांख्यिकी
यानावाने ओळखले जातात. या सांख्यिकीचे
पालन करणाऱ्या कणांना फर्मिऑन असे
संबोधले जाते. हे महत्त्वपूर्ण संशोधन केले,
तेव्हा फर्मी यांचे वय अवघे तेवीस वर्षांचे होते,
हे लक्षात घेतले म्हणजे या
.. « भौतिकशास्त्रज्ञाच्या प्रतिभेचा अंदाज येऊ
शकतो,
मात्र फर्मी यांच्या कर्तृत्वाला खरा बहर
आला, तो ते रोम विद्यापीठात प्राध्यापक
म्हणून रुजू झाल्यावर. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे
मानले जाई नि अवघ्या सव्वीस वर्षीय
शास्त्रज्ञाला हे पद मिळणे, अपवादात्मकहि
होते. तथापि फर्मी यांनी आपली या पदावर
झालेली नेमणूक सार्थ ठरविली. एमेलिओ सेग्रे
हे फर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.
मिळविणारे पहिले संशोधक व नंतर त्यांचे
सहकारी. सेग्रे यांनी फर्मी यांच्या अनेक
आठवणी सांगितल्या आहेत. सेग्रे, रसेटी,
अल्माडी इत्यादींसह फर्मी यांनी रोम
विद्यापीठात संशोधकांचा संच तयार केला.
या संशोधकसंचाने संशोधनावर जसा भर
दिला, तसाच भर लाल फितवृत्ती प्रशासनात
कमी करण्यावरही दिला. उ
रोम येथे सुरुवातीस पुंजविद्युत गतिकीतील
आणि अण्वीय, रेण्वीय नि अणुके द्रीय
वर्णपटविज्ञानातील विभिन्न सैद्धांतिक
समस्यांविषयी संशोधन केले. १९३४ मध्ये
जोलिओ-क्युरी यांनी कृत्रिम किरणोत्सर्गाचा
शोध लावला. या शोधातून न्युट्रॉनचा उपयोग
कसा करता येईल, याकडे फर्मी यांचे लक्ष
वेधले गेले. न्यूट्रॉनच्या भडिमाराने मूलद्रव्यांचे
अणुकेद्रीय रूपांतर होते काय, हे त्यांनी
तपासून पाहण्यास सुरुवात केली. पहिल्या
आठ मूलद्रव्यांच्या बाबतीत अपयश
आल्यानंतरहि त्यांनी प्रयोग सोडून दिला
नाही. मात्र फ्लोरिनने यश दिले. तेव्हा आपले
तरुण विद्यार्थी व सहकाऱ्यांना त्यांनी
आपल्याला साहाय्य करण्याचे व संशोधनाची
नवनवी दालने उघडण्याच्या कामी हातभार
लावण्याचे आवाहन केले. अणुकेद्रातील
एका न्यूट्रॉनचे एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन व
एक न्यूट्रिनो यांतील कणांत क्षयरूप रूपांतर
होते, ही कल्पना आधारभूत धरून फर्मी यांनी
१९३४ मध्येच अणुकेंद्रीय बीटा-उत्सर्जनाने
होणाऱ्या क्षयासंबंधीचा (थिअरी ऑफ॑
बीटा-डिके) सिद्धांत प्रसिद्ध केला. त्यानंतर
दोन एक वर्षे इटालियन भाषा येणाऱ्या
भौतिकशास्त्रज्ञांना खूप मागणी होती. कारण
'सिसेरा सायंटिफिका' या नियतकालिकात
फर्मीचे अनेक निबंध प्रसिद्ध होत व त्याचा
अनुवाद केला, की जगभरच्या शास्त्रज्ञांना .
प्रत्येक निबंधातून काही ना काही नवी माहिती
मिळे. या सर्व घडामोडींमुळे इतका परिणाम
झाला, की रोम हे काही काळ आण्विक
जगताचे के द्रबिंदू बनले ! फर्मी यांच्या
महत्त्वपूर्ण संशोधनाचे कौतुक लॉर्ड रुदरफोर्ड
यांनी त्यांना पत्र लिहून केले. ' नवीन सुरुवात
करणाऱ्याच्या दृष्टीने वाईट नाही, असे फर्मी
यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द (नॉट बॅड फॉर
विज्ञानयुग (7 मे / २००१ 00 २९
User Reviews
No Reviews | Add Yours...