महाराष्ट्र - दर्शन | Mahaaraashtra Darshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
288
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६२ क क महाराष्ट्-दर्शन
लागतो. असें वाटते की, आतां हा समुद्रावेरीं जाऊन पोहोचणार. समुद्राचे
पाणीही उकळू लागणार. धरित्रीवरील जीवांप्रमाणेंच जलचरेंही बिचारी
तडफडून जीव टाकणार !
पण याच वेळीं दुसरे एक महाभूत जीत्रसृ्टीच्या साहाय्यासाठी धांवत.
सोसाव्याचे वारे वाहूं लागतात. पसरू लागलेला लाव्हा रस त्या वाऱ्यांमुळे
गोठूं लागतो. जागच्या जागीं थिजूं लागतो. त्याच्या घड्यांवर घड्या पडूं
लागतात. हळू हळूं त्याचा संकोच होतो, आणि बनतें एरथ्वीच्या बाह्य
भागावरलें एक अभेद्य अर्से कवच. सारी धरित्री वितळली, तरी हें
वितळत नाहीं.
हळूं हळूं हे कवच निवून थंडगार होतें. वारा वाह्ातच असतो. चहूं
दिद्यांतून तो आपल्याबरोबर मांती, धूळ, बीजे, असें नाना परीचे सरजन-
साहित्य घेऊन येतो. मग त्या कवचावर पावसाची शिंपण होतांक्षणी पुनः
गवते रुजू लागतात. रोप धुमारतात. वेली पसरतात. थोड्याच काळांत
सि पूर्वी होती, तशी होते-प्रसन्न, नवनवोन्मेषशालिनी.
तर शास्त्रज्ञांच्या मत आपला हा महाराष्ट्र या जातीचा कवच-ग्रदेश
आहे. फार पूर्वी कधींतरी झालेल्या एका भूकंपामुळें या प्रदेशाची रचना
झाली आहे. त्या कवचाच्या अंतरंगाचें अस्फुट दर्शन आपल्यालाही
घडूं शकतें.
आपण आपल्या पर्वतमालांवर एकदां सहज नजर टाकावी. सह्याद्रीचे
थर एकदां नीट न्याहाळावेत. म्हणजे आपल्या ध्यानीं येईल, की वरवर
पाहातां जरी हा पाताळावेरीं गेलेला काळाकभिन्न पाषाण एकर्सथ वाटत
असला, तरी वस्तुतः हा तसा नाहीं. हे थरावर थर रचले आहेत. मोठ-
मोठया नद्यांच्या दरडी अजश्ाच रचलेल्या असतात. तळाद्मीं एक संस्कृति
नांदलेली असते. पुढें येतो महापूर. तें सगळें जीवन पाण्याखालीं विलीन
होते. वर जमतो चिखलाचा थर. कांही वर्षांनीं त्या चिखलावर रोप
रुजतात, आणि पुनः नवें जीवन उषःकालाचीं गीते गाते. पुनः एकदां
महापूर. पुनः चिखलाचा थर. पुनः नरव जीवन. कृष्णा, तापी, नर्मदा
अश्या थोर थोर नद्यांच्या कांठीं असलेल्या या जातीच्या दरडी, म्हणजे इति-
हाससंशोधकांना केवढें खाद्य !
User Reviews
No Reviews | Add Yours...